Back
सोलापुरात आषाढी वारीत एसटीने कमावले 83 लाख रुपये!
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 09, 2025 04:04:33
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातून आषाढी वारीसाठी सोडलेल्या ज्यादा गाड्यांच्या माध्यमातून एसटीला 83 लाख रुपयांचे उत्पन्न, यंदाच्या आषाढी वारीत एसटीची चांगली कमाई
- सोलापुरातून आषाढी वारीसाठी सोडलेल्या ज्यादा गाड्यांच्या माध्यमातून एसटीला 83 लाख रुपयांचे उत्पन्न, यंदाच्या आषाढी वारीत एसटीची चांगली कमाई..
- पाच दिवसात 1774 एसटी कडून करण्यात आल्या जादा फेऱ्या..
- एसटी महामंडळाकडून पाच दिवसात एक लाख 52 हजार किलोमीटरचा प्रवास, मागील वर्षे 58 हजार किलोमीटरचा करण्यात आला होता प्रवास
- आषाढीनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी सोलापुरातून 260 एसटी बसेसची करण्यात आली होती सोय..
- सोलापूर जिल्ह्यातील गाव तिथे एसटी या योजनेतून वारकरी भाविकांची एसटी महामंडळाकडून करण्यात आली होती सोय..
- 3 जुलै ते 7 जुलैपर्यंत गाव तिथे एसटी या योजनेतून 83 हजार वारकरी भाविकांनी घेतला लाभ..
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowJul 09, 2025 09:10:17Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Kidnapping
Feed on - 2C
---------------------------
Anchor - चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला महिना उलटूनही अटक न केल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेतर्फे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. हदगाव तालुक्यातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 6 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपिंवर अपहरणासह पोकसो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली पण मुख्य आरोपीला महिना उलटूनही अटक करण्यात आली नाही. महिना उलटूनही आरोपीला अटक न करण्यात आल्याने बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेने हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. अपहरण आणि पोकसो सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचीन्ह निर्माण होत आहे. तपास अधिक-र्यावर कारवाई करावी अशी मगणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. लव्ह जिहाद मधून हे अपहरण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
Byte - मोर्चेकरी
----------------------------
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 09:05:41Raigad, Maharashtra:
स्लग - सरकारी कर्मचारी , शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा .......
अँकर - सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटना सदन इथून निघालेल्या मोर्चाची हिराकोट तलावाजवळ सांगता झाली. सुधारित पेन्शन संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करावी, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचारी, शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर, कार्याध्यक्ष कैलास चौलकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलं.
2
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 09:04:27Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहेय..तर ९ जुलै ते १५ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहेय..अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, निर्गुणा, काटेपूर्णा, मन, पठार, गौतमा आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेय...पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झालीय त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहेय...वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये तर या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत..तर पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये तर जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये ,वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी , वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहेय..
Byte : राजेंद्र कौसल, हवामान विभाग , अधिकारी
0
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 09, 2025 09:03:57Palghar, Maharashtra:
पालघर - कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या , सर्व कामगारांना 26 हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा , शेतकऱ्यांना 12 तास अखंडित विज पूरवठा द्या , विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा , मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था यासह विविध मागण्यांसाठी सीपीएमच्या नेतृत्वाखाली पालघर मध्ये आज रास्ता रोको करण्यात आला . दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली रोखून धरला होता . यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक साधारणतः तासभर ठप्प झाली असून दोन्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याच पाहायला मिळालं . सरकार दडपशाही पद्धतीने कायदे आणत असून सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आला . या रास्ता रोकोत सीपीएम सह आशा वर्कर आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देखील सहभाग दर्शवण्यात आला .
बाईट - विनोद निकोले - डहाणू आमदार सीपीएम .
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 08:37:29Dindori, Madhya Pradesh:
अँकर:-दिंडोरी भागात मे महिन्यात अवकाळी त्यानंतर जून महिन्यात सलग झालेल्या पावसाचा फटका डाळिंब बागाना बसला असून बागावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच शिवाय पावसाच्या संतातधरमुळे फळाना तडे जाण्या बरोबर फळ गळून पडू लागले आहे यांचा फटका तब्बल 300 हेक्टर वरील बागाना बसत असल्यामुळे शेकडो शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डाळींब बागायतदारांनी केली आहे...
4
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 08:36:48Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_SCHOOL_ISSUE1
( single file sent on 2C)
टायटल:-- झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, मे महिन्यात वादळाने छप्पर उडून गेल्यानंतर पावसाळी दिवसात खुल्या रंगमंचात शिक्षण घेणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूरच्या शाळेसाठी जिल्हा परिषदेने मंजूर केले सहा लाख रुपये, याशिवाय गावातील सरपंच भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात वर्ग खोल्यांची केली व्यवस्था, सोनापूरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेची दुरावस्था झी 24 तासने पुढे आल्यानंतर शिक्षण विभागाने उचलली पावले
अँकर:-- झी 24 तासवर बातमी म्हणजे परिणामाची हमी. सोनापूरच्या शाळेला आता छप्पर मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द परिसरातील सोनापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर मे महिन्यात वादळाने उडून गेले होते. शाळा सुरू झाल्यानंतर पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पावसाळी दिवसात त्यांना खुल्या रंगमंचात शिक्षण घ्यावे लागत होते. यासंबंधीची बातमी झी 24 तास ने लावून धरल्यावर चंद्रपूर ते मुंबई खळबळ उडाली होती. जि. प. शिक्षण विभागाने खडबडून जागे होत सोनापूर जि. प. मराठी शाळेसाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान या दोन वर्ग खोल्या गावातील सरपंच भवन येथे स्थानांतरित करण्यात येत असून एक महिन्याच्या कालावधीत छप्पर तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सोनापूर येथील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
बाईट १) अश्विनी सोनवणे-केळकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
2
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 08:35:56Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
sangli breaking
Sng_shkatipith_
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी गव्हाण मध्ये शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी रोखली, अधिकारी शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादी..
अँकर - नागपूर-गोवा महामार्गाला सांगली जिल्ह्यातुन प्रखर विरोध होत आहे.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे दुसऱ्या दिवशीही शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखून धरली आहे.मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी शेतातून हाकलून लावले आहे.कालपासून शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गव्हाण येथे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.मात्र शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे,दुसऱ्या दिवशीही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी पासून रोखून धरले,यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला आहे,मात्र आक्रमक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे,त्यामुळे गव्हाण येथे महामार्गाची मोजणी दुसऱ्या दिवशीही होऊ शकली नाही.
बाईट - दिगंबर कांबळे - जिल्हाध्यक्ष - शेतकरी कामगार पक्ष - सांगली.
2
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 08:35:28Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 0907_WARDHA_STUCK
- वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील चानकी गावात 4 नागरिक पुरात अडकले
- चानकी गावात जुने गावठाण येथे अडकल्याची माहिती
- बचावासाठी प्रशासनाकडे विडिओ काढून केला संपर्क
- स्वतः जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल
- रेस्क्यू टीम ला बोलावून अडकलेल्या काढण्याचा प्रयत्न सुरू
- चारही जण छत्तीसगड येथील रहवासी असून बांधकाम कामगार असल्याची माहिती
- अडकलेले नागरिक प्रशासनाच्या संपर्कात
3
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 08:11:05Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_MSEDCL_STRIKE
( single file sent on 2C)
टायटल:-- महाराष्ट्र वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर, चंद्रपुरात महावितरण मुख्य कार्यालयावर भर पावसात निदर्शन
अँकर:-- महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण आणि समांतर वीज परवाना धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर 86 हजार वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. चंद्रपुरा बाबू पेठ येथील महावितरण मुख्य कार्यालयावर भर पावसात आंदोलन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. समांतर वीज परवाना धोरणाअंतर्गत टॉरंट पॉवरला १६ आणि अदाणीला ८ विभाग देण्याचे अर्ज आयोगाने स्वीकारले आहेत. या निर्णयामुळे महावितरणसह तीनही वीज कंपन्यांच्या अस्तित्वावर आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे. २२ जुलै रोजी आयोगाकडे जाहीर सुनावणी आहे. मात्र ही सुनावणी केवळ औपचारिक असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. खाजगीकरण धोरण रद्द करणे, समांतर वीज परवाना आणि ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण थांबवणे, रिक्त पदांची भरती, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत सामावून घेणे, पेन्शन लागू करणे, प्रकल्पांचे खासगीकरण थांबवणे आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी रेटल्या आहेत.खासगीकरणाच्या धोरणाविरोधात एकजुटीने संपात सहभागी व्हावे आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.
बाईट १) शशांक बंडीवार, अध्यक्ष, कृती समिती
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 09, 2025 08:10:48Nashik, Maharashtra:
feed send by mozo
reporter-sagar gaikwad
slug-nsk_kamgar_morcha
केंद्र शासनाने काढलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात नाशकात मोर्चा
अँकर
नाशिकच्या गोल्फ मैदान पासून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे... आपल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सिटु हा मोर्चा काढण्यात येत आहे... या मोर्चात शेकडो कार्यकर्ते कामगार सहभागी झाले आहे... कामगारांच्या बाजूने कायदे करा, त्याची अंमलबजावणी करा, कामांच्या तासात वाढ करू नका , कोणत्याही क्षेत्रात निश्चित कालीन रोजगाराला मान्यते देऊ नका... अशा विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे.... आठ तासाचे कामासाठी तीस हजार रुपये किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मासिक पेन्शन एस आय मध्ये लागू करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
8
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 08:10:20Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय..गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला...पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्कारा करता नातेवाईकाची प्रचंड तारांबळ उडाली..गावातील शेवटचा थांबा स्मशानभूमी सुद्धा दुर्दशेला पोहचलेली आहेय..
या गावात पावसाळा आला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते. डोळ्यावर पाणी, पायाखालून चिखल, आणि चितेसाठी ओलसर लाकडं, मृतदेहाची अखेरची यात्रा अपमानास्पद बनलेली आहेय..स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरते, त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो,पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे मात्र आजवर कोणतीच हालचाल नाहीय..
त्याचबरोबर स्मशानभूमीत एकही व्यवस्थित शेड नाहीय..जेव्हा कोणाच्या घरी दुःख कोसळतं, तेव्हा त्यांना आधार हवा असतो. पण या गावात, मरणाच्या क्षणी सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतंय, ही गोष्ट फक्त दुःखद नाही तर अमानुष आहेय...
Byte : विनोद राजगुरे ,
ग्रामस्थ हिरपूर
11
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 09, 2025 07:43:48Thane, Maharashtra:
माजिवडा पेट्रोल पंप समो अशार प्लस बिल्डिंग या बांधकाम बाधित इमारतीमध्ये कलर कामाकरिता उभारण्यात आलेल्या Gondola Cradle (ओपन लिफ्ट) मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे एक कामगार इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरती सुमारे पंधरा तास अडकला होता.
सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कापूरबावडी पोलीस अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF टीम), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२ - पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडर वाहनासह, महावितरण कर्मचारी व ०१- खाजगी जनरेटर उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
अशार प्लस बिल्डिंग या बांधकाम बाधित इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सदर व्यक्ती अडकला होता.
सदर घटनास्थळी खाजगी जनरेटरच्या सहाय्याने विद्युत पुरवठा सुरू करून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF टीम), अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी व महावितरण कर्मचारी यांच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे...
11
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 09, 2025 07:43:42Thane, Maharashtra:
*महिलेची पैशाची बॅग घेऊन पळणारा चोरट्याला कळवा पोलिसांनी केली अटक*
*चोरटा cctv मध्ये कैद*
Anc -ठाण्यातील कळवा मनिषा नगर शारदा अपार्टमेंटमध्ये भर दुपारी सुमारे ३:३० वाजता इमारतीत चोरीची घटना घडली आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेला पगाराची १२,००० रक्कम मिळाल्यानंतर ती घरी जात असताना ही घटना घडली. पगार झाल्या नंतर ती महिला घरी परतत असताना तिची पैशांची बॅग चोरट्याने इमारतीच्या जिन्यावरून चोरून पळवल्याची घटना घडली आहे.. सदर चोरट्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे...आरोपीवर पूर्वी देखील गुन्हे उघडकीस कळवा पोलिसांनी आणले असून अधिकचा तपास कळवा पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे...
9
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 07:43:33Nashik, Maharashtra:
nsk_netmetering
feer by 2C
vidoe 5
Anchor १० किलोवॅटपेक्षा जास्त वीज वापर जे उद्योजक अथवा वीजग्राहक करत आहेत त्यांना नेट मीटरिंगचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतल्याने उद्योजक संतप्त झाले आहेत.. आजतागायत सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना नेट मीटरिंगमध्ये उद्योजकांना वीज बिलात सवलत मिळत होती. आता मात्र नेट मीटरिंगचा लाभ मिळणार नसल्याने एकूण जे वीज बिल येईल ते कुठल्याही प्रकारची सवलत न मिळता संपूर्णपणे भरावे लागेल. या निर्णयाचा महाराष्ट्र चेंबरने विरोध केला आहे. नाशिकमध्ये या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत शासनाच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला
Byte संजय सोनवणे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स नाशिक अध्यक्ष
6
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 07:43:20Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
निळवंडे धरणाच्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडावे...
माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे विखे पाटिल यांना पत्र...
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लिहिले पत्र....
भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाण्याची समाधानकारक उपलब्धता...
या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होतोय मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे...
बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांकडे मागणी...
10
Share
Report