Back
बीडमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीची छेडछाड; गुन्हा दाखल!
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 05:02:38
Beed, Maharashtra
बीड: हे राम; बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? पुन्हा एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड, गुन्हा दाखल...
Anc- बीड जिल्ह्यात शाळकरी अल्पवयीन मुलींची छेडछाड काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बीड शहरातील उमाकिरण या खासगी संस्थेतील शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याच्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर केज मध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढण्यात आली.. ही घटना ताजीच असताना पुन्हा एकदा केज तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीला भक्ष्य करण्यात आले आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला वर्षभर पाठलाग करून त्रास देत असल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजच्याच छेडखानीला असाह्य झालेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने थेट केज पोलिस ठाणे गाठून मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अखेर ऋषिकेश गलांडे या आरोपीविरुद्ध छेडखानी आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. पोलिस आता आरोपीच्या शोधात आहेत.
दिवसेंदिवस मुलींच्या होत असलेल्या छेडखानी वरून बीड जिल्ह्यात दहशतीचे वातवरण पसरले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 11:35:11Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - लैंगिक अत्याचार व आत्महत्या प्रकरणी संवर्धना नाटक दुसऱ्या दिवशी करगणी ग्रामस्थांचं गाव बंद आंदोलन..
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी दुसऱ्या दिवशीही करगणी गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला आहे.तसेच आटपाडी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी देखील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
सोमवारी करगणी मधील एका इयत्ता दहावीचे शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता,तर आटपाडी पोलिसांच्या कडून कारवाईत दिरंगाई झाला,असा आरोप करत आटपाडी पोलीसांची चौकशीची मागणी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
बाईट - सोमनाथ सरगर - पीडित मुलीचे काका,करगणी, आटपाडी.
बाईट - महेश सरगर - नातेवाईक, करगणी ,आटपाडी.
व्ही वो - दरम्यान लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करत प्रमुख संशयित राजू गेंड सह
चौघांना अटक करण्यात आली आहे,तसेच पुढील तपास विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे आटपाडी स्पष्ट केले आहे.
बाईट - विनय बहिर - पोलीस निरीक्षक, आटपाडी.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 11:31:00Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_PRIVATIZATION_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार वीज कंपन्यांचे खाजगीकरण करत असल्याने या विरोधात देशातील आणि राज्यातील वीज कर्मचारी संपात उतरले असुन आज त्यांनी कजगिकरण थांबविण्यासह इतर 14 मागण्यांसाठी आज एकदिवसीय संप पुकारला आहे.या संपात वाशिम जिल्ह्याच्या 6 उपविभागातील 32 उपकेंद्रात कार्यरत 450 महावितरण आणि महापारेषण चे वीज कर्मचारी सामील झाले आहेत.या संपात सामील सर्व कामर्मचाऱ्यांनी वाशिम च्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.यावेळी खाजगीकरण थांबविण्यासह 14 रखडलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीतर याहून ही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
बाईट प्रभाकर लहाने,जिल्हा समन्वयक,कृती समिती
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 11:07:01Pune, Maharashtra:
pimpri tweet
kailas puri Pune 9-7-35
feed by 2c
ANCHOR - अहिल्यानगर बोगस जीआर प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असली तरी त्यावर कारवाई होईल असं वाटत नसल्याचे मत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केले. विजय कुंभार यांनी फेक जीआर प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी ट्विट करत याबाबत कारवाईची मागणी केली होती. दोन महिन्यापूर्वी अहिल्यानगर बनावट जीआर च प्रकरण समोर आलं आहे मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने यामध्ये मोठे आयएएस अधिकारी मंत्री यांचाही समावेश असण्याची शक्यता कुंभार यांनी व्यक्त केली. याच संदर्भात विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas puri wkt+ vis
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 09, 2025 11:06:22Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_suicide
ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्याने 16 वर्षीय युवकाने केली आत्महत्या
अँकर
ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक रोड परिसरात घडली आहे.... सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव आहे... सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायना नगर येथील जय भवानी रोड येथे राहत होता... गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईल खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं... तो मोबाईल मध्ये अनेक वेळा गुंतून असायचा काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेम मध्ये तो पैसे हरला आणि या पैसे हल्ल्याच्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलय...या घटनेने परिसर हळहळला आहे. सम्राटच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.. घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती, मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे...मुख्य म्हणजे, या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का... हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे...
बाईट- नातेवाईक
2
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 10:42:02Raigad, Maharashtra:
स्लग - पत्रिकेत नावं का येत नाही त्याच्या कारणांचा शोध घ्या ...... राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला सल्ला ....... पत्रिका प्रकरणी राष्ट्रवादीला दोष देण्यात अर्थ नाही ........ ती पत्रिका सरकारी होती आमचा संबंध नाही ..... जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांचा खुलासा ........
अँकर - रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभाच्या पत्रिकेत तटकरे कुटुंबीय वगळता अन्य कुणाची नाव न आल्याने भाजपाचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपली नावं का येत नाही याचा शोध ज्यांनी त्यांनी घ्यावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिलाय. डायलिसिस सेंटर साठी आदिती तटकरे यांनीच प्रयत्न केले होते. आणि ही पत्रिका आम्ही केली नव्हती ती सरकारी होती त्यामुळे आम्हाला दोष देण्यात अर्थ नाही असंही मधुकर पाटील यांनी म्हटलंय.
..............
धैर्यशील पाटील यांच्या नाराजी नंतर आयत्यावेळी पत्रिका बदलण्यात आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ताठरच दिसते आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका युती म्हणून घेतली जाते मात्र रायगडात राष्ट्रवादीची भूमिका युतीसाठी अडचणीची ठरू शकते. आधीच जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीतून विस्तव जात नाही. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधील वादाचा नवा अध्याय रायगडात सुरु होण्याची शक्यता आहे.
बाईट - मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस
11
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 10:41:47Shirdi, Maharashtra:
Anc - कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाच्या वतीने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.. विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते..
V/O - कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल रद्द करा, जनतेच्या लोकशाही अधिकारांची गळचेपी करणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्या, सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करा, किमान वेतनवाढ लागू करा, असंघटीत क्षेत्रात मोडणाया सर्व कामगारांना प्रॉव्हिडंड फंड, पेन्शन, वैदयकीय सेवा इत्यादी सुविधांचे अधिकार द्या अशा विविध मागण्या कामगार संघटनांच्या आहेत.. या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे..
Byte - राजेंद्र बावके, कामगार नेते
9
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 09, 2025 10:38:10Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये पसरली डेंग्यूची साथ..
मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट.
परिस्थिती सुधारली नाही तर जन आंदोलन करणार...मनसे माजी आमदार प्रकाश भोईर
Anc कल्याण मध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. शहरात डेंगूचे किती रुग्ण आहेत याचा आकडा केडीएमसी कडे नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त केला गेला. तसेच केडीएमसीच्या हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे, केडीएमसी आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आरोग्य बाबत योग्य ते काळजी घ्यावी.एवढेच नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे परिस्थिती सुधारली नाही तर जनआंदोलन करावे लागणार मनसे चे माजी आमदार प्रकाश भोईर यांचा इशारा दिला आहे
बाईट प्रकाश भोईर माजी आमदार मनसे
10
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 10:37:48Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण!
रहिवाशाने कानशीलात लगावत घेतला हाताचा चावा
बाहेर भेटल्यावर चाकूने मारण्याचीही दिली धमकी
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amb boy beating cctv
Anchor : अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडलीये. या मुलाला ५ कानशिलात लगावत या विकृताने हाताचा चावाही घेतला. ही संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी विकृत रहिवासी कैलास तनवाणी याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Vo : अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल जियम सोसायटीत ४ जुलै ही घटना घडली. या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवाणी आला, त्याने तू मोहित का दोस्त है ना? अशी विचारणा करत थेट या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या लहानग्याच्या तब्बल ५ कानशिलात लगावत त्याने प्रतिकार करण्यासाठी हात मध्ये आणला असता या विकृताने त्याच्या हाताचा चावा घेतला. हा सगळा प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. दरम्यान, ही मारहाण करताना कैलासच्या हातात चावी आणि मोबाईल असल्यानं या लहानग्याला अंतर्गत दुखापत झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याबाबतचा तपास असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे.
Byte पीडीत मुलगा ,आणि त्याचे वडील
Byte रमेश पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
6
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 10:34:07Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_FLLODY_VILLAGE
( single file sent on 2C)
टायटल : वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका बसलाय. ग्रामस्थांच्या मदतीसाठी बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. गोसेखुर्द धरणामधून वैनगंगा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाण्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय. नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव आदी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना हलविले जाणार आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.8 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आलाय. चिमूर तालुक्यात 151 मिलिमीटर, ब्रह्मपुरी तालुक्यात 145 मिलिमीटर, नागभीड तालुक्यात 150 आणि सिंदेवाही तालुक्यात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बाईट १) सतीश मसाल, तहसीलदार, ब्रह्मपुरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 10:33:52Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_MNS_TOLL_RADA_POLICECASES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोल प्लाझाची तोडफोड केली. टोल प्लाझावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही टोल आकारला जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनावर प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता नियमितपणे टोल वसूल केल्याचा आरोप केला.या तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोधा टीम तयार करण्यात आलं असल्याची माहिती वाशिमचे पोलिस अधीक्षक तारे यांनी दिली.दरम्यान,या आंदोलनाचे मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांनी समर्थन केले असून, “सुविधा नसताना टोल आकारला जात आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांनी योग्य ती प्रतिक्रिया दिली,” असे त्यांनी म्हटले.
बाईट: अनुज तारे,पोलीस अधीक्षक वाशिम
बाईट:राजू किडसे,मनसे जिल्हाध्यक्ष
3
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 10:30:51Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_SDRF
FILE - 2 VIDEO, 4 IMAGE
पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना SDRF च्या पथकाने काढले सुखरूप बाहेर....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततदार सुरू होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही गावांना पुराच्या पाण्याने वेळा दिलेला आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात सहा शोध पथक व बचाव पथक कार्यरत आहेत.
SDRF 02 पथक, DDRF 02 पथक
होमगार्ड 2 पथक, कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. तर भंडारा शहराला लागून भोजापूर येथे काही लोक पुराच्या पाण्यात अडकलेली होती त्यांना पुरातून बाहेर काढण्याकरीता SDRF शपथकाने बचाव कार्य करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविलेले आहे.
4
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 09, 2025 10:30:44Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये 3 दिवसांपासून सततधार पाऊस सुरु असल्याने मारेगाव तालुक्यातील कोसारा वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे. पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने राळेगाव- वडकी- खैरी- कोसारा- वरोरा- चंद्रपूर मार्ग बंद पडला आहे.
पुराचे पाणी अनेक शेतामध्ये शिरले असून शेटपिकांचे मोठे नुकसान होतं आहे.
3
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 09:44:28Shirdi, Maharashtra:
Anc - साईंच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे.आज उत्सवाचा पहिला दिवस असून आजपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिर परिसरात साई भक्तांचे लक्ष वेधून घेणारे साईबाबांच्या फोटोंचे प्रदर्शन गुजरात येथील साईभक्त जिज्ञेश रजपूत यांनी भरवलय.. साई भक्त रजपुत यांनी साईबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत साईबाबांचे हयातीत असताना पासूनच्या फोटोंची सामग्री करत त्याचबरोबर पुस्तकांमधून आणि सोशल मीडियाहून सर्व जुने आणि नवीन फोटो एकत्र करत जवळपास 1800 ते 2000 फोटोंचे प्रदर्शन या साईभक्तानी भरवलय.. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरत येथील साईभक्ताने साईबाबांच्या जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा दिलाय.. साई मंदिर परिसरामध्ये भरवलेलं हे प्रदर्शन सर्व साई भक्तांचे लक्ष वेधून घेतय..प्रदर्शनाच्या ठिकाणांहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
wkt/121 कुणाल जमदाडे साईभक्त
12
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 09, 2025 09:43:59Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर . बिबट्याचा मुक्त संचार नरपड येथील कल्पेश पाटील यांच्या वाडीत लागलेल्या कॅमेरात कैद . काल पहाटे याच बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला . हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू . मागील अनेक महिन्यांपासून या परिसरात असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण . बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश .
12
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 09, 2025 09:43:46Yavatmal, Maharashtra:
Anchor : बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सततधार पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे. धो धो पावसात गाव खेड्यामध्ये शेतकरी या पदयात्रेत सामील होत आहेत. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत असल्याने, आता लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला.
बाईट : बच्चू कडू
9
Share
Report