Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

उल्हासनगर के सार्वजनिक शौचालय पर कब्जा, महिलाएं सुरक्षा खतरे में

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 15, 2025 01:30:44
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात सार्वजनिक शौचालयाची  दुरवस्था ,शौचालयाचा ताबा गर्दुल्यांकडे Ulh toilet Anchor  उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील ओटी सेक्शन भीम नगर येथील सार्वजनिक शौचालयाची अक्षरशः दुरवस्था झालीय,  दुरुस्ती होत नसल्याने ह्या शौचालयाचा ताबा गर्दुल्यानी घेतला आहे . त्यामुळे येथील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलंय, या शौचालयाच प्लास्टर कोसळले असून वीज पुरवठा खंडित आहे,दरवाजे ,खिडकी नाहीय तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालय,कधीही ह्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जातंय,आज मनसेचे सचिन कदम यांनी शौचालयाची पाहणी करत लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महापालिकेला  दिलंय, Byte सचिन कदम byte स्थानिक महिला चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Sept 15, 2025 03:31:10
Raigad, Maharashtra:स्लग - आरसीएफ नोकर भरतीवरून सत्ताधारी शिवसेना आक्रमक ...... स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी ...... शिवसेनेकडून आज पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन ....... अँकर - अलिबाग जवळच्या थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील नोकर भरती संदर्भात सत्ताधारी शिवसेना आक्रमक झाली आहे. आरसीएफ प्रकल्पाचा विस्तार होतोय . त्यासाठी होणाऱ्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे तसेच जे प्रकल्पग्रस्त गेली ४० वर्षे नोकरीपासून वंचित राहिले आहेत त्यांना प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. एकीकडे प्रशासनाशी चर्चा सुरू ठेवत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने आक्रमक केलं जाणार आहे. बाईट - महेंद्र दळवी आमदार
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:20:31
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 03:20:11
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_JALTARA_WAGES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकल्पनेतून वाशिम जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात आलेली ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा’ही योजना शेतकऱ्यांसह मजुरांसाठीही उपयुक्त ठरली.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी जलतारे खोदून दगडगोट्यांनी भरून भूजल पुनर्भरणाची मोठी कामगिरी केली.या उल्लेखनीय प्रकल्पाची दखल घेऊन त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून जिल्ह्याला अभिमानाचा मान मिळाला आहे. मात्र,या योजनेत प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या मजुरांची आर्थिक अवस्था मात्र बिकट झाली आहे.कारण,काम पूर्ण होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही मजुरांना अजूनपर्यंत मजुरी मिळालेली नाही.केंद्र सरकारकडून अकुशलमजुरांच्या मजुरीसाठी चा निधी राज्य शासनाला उशिरा उपलब्ध होत असल्याने जलतारा योजना असो वा घरकुल योजना,त्यात काम करणाऱ्या मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नाही.अतिवृष्टीमुळे हाताला दुसरे कोणतेही काम उपलब्ध नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. गावोगावी मजुरांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.त्यामुळे शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून सर्व मजुरांचे थकलेले पैसे अदा करावेत,अशी जोरदार मागणी होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:17:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn road protest av Feed attached ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी मागणी करूनही रस्ते दुरुस्त केल्या जात नाही.. त्याच्याच विरोधात संभाजी नगर जिल्ह्यातील एका सरपंचांने अनोखा आंदोलन केले आहे थेट पाण्यात लोळत त्यांना प्रशासनाला लाखोली वाहिली आहे.. सरपंच मंगेश साबळे यांचे अनोखे आंदोलन आहे.. गेवराई पायगाव – बोरगाव अर्ज हा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. दररोज या रस्त्याने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अनेक वेळा शासन व प्रशासनाला कळवूनही दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी अक्षरशः पाण्यात व चिखलात झोपून अनोखे आंदोलन केले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 15, 2025 03:16:48
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_TULJA विधिवत पूजेने आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात, तुळजाभवानी चांदीच्या पलंगावर निद्रस्त. Anchot महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकीनिद्रेला विद्युत पूजाने सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस विधिवत सुरुवात झाली आहे. सायंकाळी सात वाजता पंचामृत अभिषेक झाल्यानंतर रात्री आठ वाजता मंदिरातील सोळा घराण्यांतील मुख्य भोपे पुजाऱ्यांनी आपल्या मानाच्या आरत्या आईसाहेबांना ओवाळल्या. त्यानंतर देवीच्या अंगाला भांडारा लावून, मूर्ती खाद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी नेण्यात आली. या निद्रेला घोर निद्रा असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महिषासुरासोबत होणाऱ्या युद्धापूर्वी ही निद्रा दिली जाते. वर्षातून २१ दिवस चालणारी ही परंपरा यंदा १४ ते २२ सप्टेंबरपर्यंत पार पडणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 03:16:23
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_BANJARA(9 FILES) जालना |  बंजारा समाजाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा.. अँकर | बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात बंजारा वेशभूषेत महिला भगिनी दाखल होणार आहेत. जो पर्यंत बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा ईशारा बंजारा आंदोलकांनी दिलाय.. बाईट - अविनाश चव्हाण, आंदोलक.. बाईट : राजेश राठोड, आमदार,विधान परिषद, काँग्रेस
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:15:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn ghati hospital av Feed attached छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  'पीजी'च्या ८५ जागा वाढणार आहेत. त्यासाठी मंजुरीही मिळाली आहे, त्यामुळे घाटीतील 'पीजी'च्या जागा २०० वरून थेट २८५ होणार आहेत. प्रारंभी ५० जागा वाढणार असल्याची चिन्हे होती. ही संख्या ८५ वर गेली आहे. यात क्लिनिकलच्या २९ जागा आहेत. 'एमडी' हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम असून, तो एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर केला जातो. पीजी'च्या जागा वाढणार असल्याने घाटीतील रुग्णसेवेला वाढीव डॉक्टरांचा हातभार लागेल. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आणि उपचाराची उपलब्धता या दोन्ही पातळ्यांवर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होणार आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:05:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नर्तिका पूजा गायकवाडची पोलीस कोठडी आज संपणार - गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी नर्तिका पुजा गायकवाड ची आज पोलीस कोठडी संपणार - आज दुपारनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार - गोविंद बर्गे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांचा तपास भरकटल्याची चर्चा.... - राज्यातील अनेक कला केंद्राचे मालक आणि पूजा गायकवाडच्या मैत्रिणींचा तपास मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही - नर्तिका पूजा गायकवाड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही आरोपींना अटक नाही - नर्तिका पुजा गायकवाड हिच्या वाढीव दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत कोणते नावे खुलासे समोर आले हे पाहणे महत्त्वाचे - नर्तिका पुजा गायकवाड हिच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार हे आज स्पष्ट होणार आहे
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 03:04:53
Ratnagiri, Maharashtra:( मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याच्या दोन फ्रेम करून बातमी घ्यावी) रत्नागिरी- भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या दोन मंत्र्यांमध्ये रंगले वाकयुद्ध मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा दिला सल्ला रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टाॅक आहे मोठा नाव न घेता नितेश राणेंचा उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला होता टोला नितेश राणेंच्या या टोल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर भगवी शाल दिली ते बरं केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही ज्याचे जळते त्यालाच कळते, सेवाभावी संस्थेमध्यून मी मोठा झालोय नितेश राणे उदय सामंत
3
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:02:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn paithan rain av काल नुकसानीचे 2 ठिकाणचे ड्रोन  फुटेज पाठवले आहे, संभाजी नगर हुन प्रातिनिधिक  ते वापरा दोन्ही पौठांचे आहेत... गेली दोन दिवस संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे..पैठण तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार दिसला. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान १० मंडळांत अतिवृष्टी झाली असून, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या, पत्रे उडाली, तर काही घरांमध्ये पाणी शिरले. सौर विद्युत पंपाचे पॅनलही पडले. खुलताबाद, कन्नड तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता. या दमदार पावसाने २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात  नांदर, हर्षी, जायकवाडी, दादेगाव, बालानगर, ढोरकीन परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाचे पीक आडवे झाले. तर, कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांत पाणी साचले होते. मोसंबी बागेतही पाणी साचून झाडे कोसळली. या सगळ्यांचे पंचनामे सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:01:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारची इच्छा कमी पडतेय - सोलापुरात स्वराज्य संग्राम संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय मेळावा. - मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे. - छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही एकही वीट रचली गेली नाही. - स्वराज्य संग्राम संघटना आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करणार. - स्मारक तयार करण्याबाबत सरकारची इच्छा शक्ती कमी पडत आहे आणि विरोधकही काही बोलत नाहीत.. - स्वराज्य संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी राज्य सरकारला दिला इशारा. Byte : तानाजी शिंदे, स्वराज्य संग्राम संघटना, संस्थापक अध्यक्ष
0
comment0
Report
Advertisement
Back to top