Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी: भगवे मफलर पर नितेश राणे बनाम उदय सामंत का तंज-तकरार

PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 03:04:53
Ratnagiri, Maharashtra
( मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याच्या दोन फ्रेम करून बातमी घ्यावी) रत्नागिरी- भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या दोन मंत्र्यांमध्ये रंगले वाकयुद्ध मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा दिला सल्ला रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टाॅक आहे मोठा नाव न घेता नितेश राणेंचा उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला होता टोला नितेश राणेंच्या या टोल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर भगवी शाल दिली ते बरं केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही ज्याचे जळते त्यालाच कळते, सेवाभावी संस्थेमध्यून मी मोठा झालोय नितेश राणे उदय सामंत
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 15, 2025 05:03:12
Yavatmal, Maharashtra:AVB मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या दिग्रस येथील अरुणावती धरण पूर्णतः भरले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याच्या उद्देशाने सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले असून १३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावर वसलेल्या दिग्रस, आर्णी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने धावंडेचे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. धावंडेचे पाणी अरुणावती धरण पात्रात जमा होते. त्यामुळे अरुणावती प्रकल्पाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अद्यापही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. अशा परिस्थितीत अरूणावती धरण तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 15, 2025 04:49:50
Yavatmal, Maharashtra:WKT यवतमाळ जिल्ह्यात परतीचा प्रवास करणारा पाऊस धुमाकूळ घालत आहे, यंदा सुरुवातीपासूनच सततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अनेक भागातील शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर ही बहरलेली पिके सडायला सुरुवात झाली आहे, सोयाबीनच्या पिकावर बुरशीचा प्रकोप झाला आहे. तर कपाशीची पातेगळ होऊन, बोंडं अपरिपक्व स्थितीत गेली आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून जगवलेली पिके, हातची गेली आहे. आता कुठलेही उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी चिंतित आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 04:49:21
Parbhani, Maharashtra:अँकर- मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून जाहीर केलं होतं आम्ही सत्तेत आल्याबरोबर कर्जमाफी करू आता ते म्हणतायेत दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू मग तुम्हाला शेतकऱ्यांना पाय घासून घासून मरतांना बघायचं आहे का ही तर रावणाची वृत्ती असल्याचा घणाघात माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलाय, महाराष्ट्रात मटका,गुटखा,खंडणी वसुली सुरू आहे, गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात वाईट अवस्था आहे. मग हे सगळं सुरू असतांना तुमचे मंत्री पालकमंत्री काय करतायेत. या सगळ्या अवैध धंद्यामुळे राज्यात गुंडागर्दी वाढत चाललेली आहे.मग या परिस्थितीतीला तर मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत ना मग त्यांना आक्का नाहीतर काय म्हणायचं असा सवाल उपस्थित करीत माजी मंत्री बच्चू कडू राज्यात मुख्यमंत्री फडणविसच मोठे आक्का आहेत यावर ठाम आहेत. यापूर्वी आपला देश धर्म म्हणून जळत होता. त्यामुळे राजकीय लोकांना आता जात धर्म पेटवूनच लोकांना मूळ मुद्यापासून समस्यापासून दूर ठेवायचं आहे. कालांतराने जातीयवाद कमी होईल असं वाटत असतांना तो वाढतोय. महापुरुषांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करून करून यांनी त्यांच्या विचाराला श्रद्धांजली देण्याचे काम केले आहे. हैदराबाद गॅजेट लागू केले पण सरसगट नाही असा त्यात शब्द वापरलाय,गॅजेट फक्त पुरावा म्हणून वापरला जाईल,मग याच्यात सगळं संपला ना, मराठवाड्यात कोतवाल बुकच्या नक्कली सापडत नाहीत,त्यामुळे पुरावा म्हणून इतर काही वापरता येत नाही. त्यामुळे राक्षसभवन असेल,सातारा किंवा हैद्राबाद गॅजेट असेल हे पुरावा म्हणून वापराव,2001 चा कायदा आहे,कोणीतरी पाटील जातीच्या दाखल्यावरून हायकोर्टात गेल्या होत्या. त्यावेळी कुठल्याही जातीचा व्यक्ती पुराव्या अभावी आरक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्याला प्रतिज्ञा पत्रावर त्या व्यक्तीला जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करता येईल असं म्हटलं आहे. अस परिपत्रक आहे,हा जुना कायदाच आहे,हा काही आता भेटलेला नाहीये अस बच्चू कडू प्रतिज्ञा पत्रावर कुणबी प्रमाणपत्र द्या या शासनाने काढलेल्या जीआरवर बच्चू कडू म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केलीयआमचे परभणीचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... 121 बच्चू कडू -माजीमंत्री
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 04:35:41
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_WARDSTRUCTURE _OBJECTION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून एकूण ४० आक्षेप दाखल झाले होते.त्यावरील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांची बाजू ऐकली व संबंधित स्थानिक संस्थांकडून स्पष्टीकरण मागवले.या सुनावणीचा अहवाल तयार करून ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.आता निवडणूक विभागाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रभाग रचना निश्चित होणार असून, उमेदवार व राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 15, 2025 04:35:06
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_RESHAN_STORE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यात 16 रेशनची दुकाचे परवाने रद्द, एक निलंबित; धान्यांमध्ये तफावत आढळल्याने पुरवठा विभागाची कारवाई अँकर :- अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्याने ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. यातील १६ दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. या दुकानदारांना २० लाख १४ हजार १६५ रुपयाचा दंड ठोठाविला आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून रेशनकार्डधारकांना सुविधा मिळण्याकरिता त्यांना धान्य मिळण्यास त्रास होवू नये याकरिता विविध पथकांकडून एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान तपासणी मोहिन राबविली होती. यामध्ये १९१६ रेशन दुकानांपैकी १५६१ दुकानांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ९२ दुकानांमध्ये आकस्मिक भेट देण्यात आली. तर प्राप्त तक्रारीवरुन १३ दुकानांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांचे आदेशावरुन करण्यात आली. या तपासणीमध्ये ३५ दुकानदार किरकोळ दोषी, एक दुकानदार मध्यम व १६ दुकानदार हे गंभीर दोषी आढळून आले. असे एकुन ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गंभीर दोषी आढळलेल्या १६ दुकाने रद्द केली असून मध्यम दोषी आढळलेले एक दुकान निलंबीत केले आहे. या सर्व दुकानदारांवर २० लाख १४ हजार १६५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे धान्यांचा काळा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 04:34:54
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- गृहराज्यमंत्री योगेश कदम byte -- on दौरा --- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिलीय त्या अनुषंगाने कोकण दौरा होतोय. माझ्याकडे जनतेशी निगडित महत्वाची खाती आहेत. त्या खात्या मार्फत जनतेचे प्रश्न सोडविले जातील. संघटना बांधणी आम्ही लहाणपणा पासून अवगत केली आहे. शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेना साथ दिलीय. On संघटना बांधणी --- संघटना बांधणी हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. On संभाव्य निवडणुका --- भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर त्यावर आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू... मात्र महायुतीचा झेंडा नक्की फडकेल... Byte --- योगेश कदम, मंत्री feed on desk
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 04:19:51
4
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 15, 2025 04:19:37
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri chain kailas puri Pune 15-9-25 feed by 2c for web also Anchor - सोनसाखळी, घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून चार मंगळसूत्र, एक दुचाकीसह सहा लाख 53 हजार 156 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. गौरव अनिल सरोदे अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० ऑगस्ट रोजी रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. तसच १ सप्टेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. एका मागोमाग झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्हयाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेश देण्यात आले होते. त्या अनुशंगाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सलग ५ दिवस रावेत आणि चिखली परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासून रावेत येथे लाल हुडी परिधान करुन महीलेच्या गळयातील चैन चोरी करणारा आरोपी व चिखली इथ निळा हुडी परिधान करुन महीलेच्या गळयातील मंगळसुत्र चोरी करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सी.सी.टी.व्ही. कॅमेरा चेक करत आरोपी हा चाकण परिसरामध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. तिथे पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला. सापळा लावले ठिकाणी आरोपीस पोलीस असल्याचा संशय आल्याने तो तेथुन पळुन गेला असता पथकाने सुमारे १५ कि.मी. पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेतले
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 15, 2025 04:17:29
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- सर्वत्र जोरदार पाऊस फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरासह जिल्हा सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे काल दुपारपासूनच सुरू असलेला पाऊस जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा होत आहे या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाला असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जनावर आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 04:15:51
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_DAM_OVERFLOW रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.मृद व जलसंधारण विभागाच्या ८५ लघु प्रकल्पांपैकी तब्बल ८४ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या ७५ पैकी ६४ लघु प्रकल्पांनी शंभर टक्के जलसाठा गाठला आहे. याशिवाय सोनल व एकबुर्जी हे दोन मध्यम प्रकल्प आधीच गच्च भरून वाहू लागले आहेत.एकूण १३८ प्रकल्पांमध्ये सरासरी ९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 15, 2025 04:00:38
Kolhapur, Maharashtra:Kop Murder CCTV Update Feed:- 2C Anc:- कोल्हापूर शहरातील फुलेवाडी मध्ये गुंडांनी घरात घुसून रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख याचा निर्घृण केला होता.. या खुनाची धक्कादायक दृश्ये CCTV मध्ये कैद झाली होती. या CCTV च्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी दहा ते बारा गुन्हेगारांपैकी प्रमुख चार संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवल आहे. खुनाच्या पहिल्या दिवशी एकूण सात संशयतांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानंतर पोलिसांनी खुनात सहभाग असणाऱ्या चौघा संशयताना अटक केलीय. इतर आरोपीच शोध सुरू आहे. खून केलाय. महेश राजेंद्र राख असं खून झालेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे.. आठ ते दहा जणांनी केलेल्या हल्ल्यात महेश राख मृत्यू झाला असून त्याचा मित्र विश्वजीत भाले हा गंभीर जखमी झालाय. हल्लेखोर आणि विश्वजीत भाले यांच्यात किरकोळ कारणावरून रात्री वाद झाला होता, या वादातून रात्री उशिरा हल्लेखोर विश्वजीत भाले याच्या घरी दाखल झाले, ही घटना कळताच रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख त्या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी हल्लेखोरांनी महेश राख आणि त्याचा मित्र विश्वजीत भाले यांच्यावर एडका तलवार अशा धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात महेश राख हा घटनास्थळीच मृत्युमुखी पडला तर विश्वजीत भाले हा गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. या घटनेच्या निमित्ताने कोल्हापुरात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top