Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर नाले में फंसे रिक्षाचालक सतीश शिंदे अभी भी लापता

AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:20:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात शनिवारी रात्री वाहून गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा अद्याप शोध नाही सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात शनिवारी रात्री वाहून गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा अद्याप शोध नाही अंधार पडल्याने रविवारी रात्री मोहीम थांबवण्यात आली, आज पून्हा शोध मोहीम केली जाईल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जवानानी या नाल्यात बोटीच्या माध्यमातून जाऊन देखील पाहणी केली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सतीश शिंदे यांचा शोध लागलेला नाही
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 15, 2025 05:35:20
Buldhana, Maharashtra:स्टोरी - मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत विभागाचे जाळ्यात... शेतकऱ्यांकडून वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी घेतली लाच .. दोन लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ पकडला.. अकोला लाचलुचपत विभागाची कारवाई.. Anchor - बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा येथील तहसीलदार हेमंत पाटील यांना अकोला येथील लाचलुचपत विभागांच्या पथकाने शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.. याप्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील केलीय... मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांनी एका शेतकऱ्याला वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी एकरी 50 हजार रुपयांची अशी एकूण चार एकराचे दोन लाख रुपयांची मागणी केली होती.. ठरल्याप्रमाणे तहसीलदार पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी दोन लाख रुपयांची लाच घेतली . दरम्यान अकोला येथील लाच लुचपत विभागाचा पथकाने त्यांना रंगरहाथ पकडले .. त्यामुळे महसूल विभागत खळबळ उडालीय आहे ..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 05:34:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील नागझरी आणि भोगावती नदीला आला पूर, तालुक्यातील अनेक गावांचा तुटला संपर्क - जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भोगावती आणि नागझरी नदीला आला पूर - नदीकाठच्या अनेक गावांचा तुटला संपर्क - पुरामुळे हात्तीज ते वैराग पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प - भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे हिंगणी ते मळेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प - दरम्यान शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने सोयाबीन, कांदा, उडीद यासह पालेभाज्यांचे मोठे नुकसान - जवळगाव मध्यम प्रकल्पाचा सांडवा 3500 क्युसेसने तर हिंगणी प्रकल्पाचा सांडवा 2000 क्युसेसने वाहण्यास सुरुवात - नागझरी नदीवरील पूल न ओलांडण्याच्या प्रशासनाच्या सूचना - पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 15, 2025 05:31:41
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1509ZT_MAVAL_BHEGDE_PRAVESH Total files : 04 Headline: मावळ मधील बापू भेगडे यांचा आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश सोमाटने येथून शक्ती प्रदर्शन करत बापू भेगडे मुंबई कडे रवाना Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मोठा राजकीय बदल आता प्रत्यक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापू भेगडे हे आज शेकडो समर्थकांसह भाजप प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्यासह विधानसभा निवडणुकीत भेगडे यांना मदत करणाऱ्या पदाधिकारी यांची हकालपट्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातून केली होती. त्यानंतर आता कोणत्याच पक्षात नसलेले बापू भेगडे हे अखेरीस भाजपा प्रवेश करत आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत बापू भेगडे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेशासाठी मुंबई कडे रवाना झाले आहेत. बाईट : बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री (file.no.03) बाईट : बाबुराव वायकर (file no.04)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 05:17:07
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला Anc: बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल आहे. परिणामी परिसरातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय.. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत.. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 15, 2025 05:16:55
Pandharpur, Maharashtra:15092025 Slug - PPR_CORRIDOR_SWAMI file 01 ------ Anchor : देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला हिंदुत्ववादी नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध दर्शवला आहे. काशी आणि उज्जैन नंतर पंढरपुरात होणाऱ्या बहुचर्चित कॉरिडॉरला होत असणाऱ्या स्थानिकांच्या विरोधाला हिंदुत्ववादी नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या विराट हिंदुस्थान संगम या संघटनेची कायदेविषयक टीम पंढरपुरात येऊन कॉरिडॉर बाधितांशी नुकतीच चर्चा करून बैठक घेतली. या बैठकीमध्ये विराट हिंदुस्थान संघाचे जगदीश शेट्टी यांनी कॉरिडॉर बाधितांशी चर्चा करून वेळप्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.तसेच स्थानिकांच्या कॉरिडॉर विरोधाला पाठिंबा दर्शवण्यासाठी येत्या दोन महिन्यात डॉ.सुब्रमण्यम स्वामी पंढरपुरात विराट सभा घेणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 15, 2025 05:16:41
kolhapur, Maharashtra:नागपूर NGP Ganpati wkt live u ने फीड पाठवले ------------ बाईट - मूधोजी राजे भोसले 121 * *मस्कऱ्या हाडपक्या गणपतीची 237 वर्षांची जपलेली परंपरा* नागपूरातील आगळावेगळा सोहळा म्हणजे मस्कऱ्या गणपती उत्सव.. तब्बल 237 वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव आजही नागपूरकरांच्या उत्साहात रंगतो. इतर ठिकाणी विसर्जनाची धामधूम असते... त्यानंतर पितुपक्षात बसणाऱ्या या गणेशोत्सवाबद्दल जाणून घेण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशी शेलार सुद्धा पोहोचणार आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव साजरा केला... तो देशभर पोहचला.. आता विदर्भात बसणाऱ्या हाडपक्या गणपतीचा इतिहास त्यापेक्षा जुना आहे... भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी तो झी 24 तासशी बोलताना सांगितला... ------------------ 121 मुधोजी राजे भोसले..
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 15, 2025 05:03:12
Yavatmal, Maharashtra:AVB मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या दिग्रस येथील अरुणावती धरण पूर्णतः भरले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याच्या उद्देशाने सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले असून १३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावर वसलेल्या दिग्रस, आर्णी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने धावंडेचे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. धावंडेचे पाणी अरुणावती धरण पात्रात जमा होते. त्यामुळे अरुणावती प्रकल्पाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अद्यापही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. अशा परिस्थितीत अरूणावती धरण तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 15, 2025 04:49:50
Yavatmal, Maharashtra:WKT यवतमाळ जिल्ह्यात परतीचा प्रवास करणारा पाऊस धुमाकूळ घालत आहे, यंदा सुरुवातीपासूनच सततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अनेक भागातील शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर ही बहरलेली पिके सडायला सुरुवात झाली आहे, सोयाबीनच्या पिकावर बुरशीचा प्रकोप झाला आहे. तर कपाशीची पातेगळ होऊन, बोंडं अपरिपक्व स्थितीत गेली आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून जगवलेली पिके, हातची गेली आहे. आता कुठलेही उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी चिंतित आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 04:49:21
Parbhani, Maharashtra:अँकर- मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून जाहीर केलं होतं आम्ही सत्तेत आल्याबरोबर कर्जमाफी करू आता ते म्हणतायेत दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू मग तुम्हाला शेतकऱ्यांना पाय घासून घासून मरतांना बघायचं आहे का ही तर रावणाची वृत्ती असल्याचा घणाघात माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलाय, महाराष्ट्रात मटका,गुटखा,खंडणी वसुली सुरू आहे, गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात वाईट अवस्था आहे. मग हे सगळं सुरू असतांना तुमचे मंत्री पालकमंत्री काय करतायेत. या सगळ्या अवैध धंद्यामुळे राज्यात गुंडागर्दी वाढत चाललेली आहे.मग या परिस्थितीतीला तर मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत ना मग त्यांना आक्का नाहीतर काय म्हणायचं असा सवाल उपस्थित करीत माजी मंत्री बच्चू कडू राज्यात मुख्यमंत्री फडणविसच मोठे आक्का आहेत यावर ठाम आहेत. यापूर्वी आपला देश धर्म म्हणून जळत होता. त्यामुळे राजकीय लोकांना आता जात धर्म पेटवूनच लोकांना मूळ मुद्यापासून समस्यापासून दूर ठेवायचं आहे. कालांतराने जातीयवाद कमी होईल असं वाटत असतांना तो वाढतोय. महापुरुषांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करून करून यांनी त्यांच्या विचाराला श्रद्धांजली देण्याचे काम केले आहे. हैदराबाद गॅजेट लागू केले पण सरसगट नाही असा त्यात शब्द वापरलाय,गॅजेट फक्त पुरावा म्हणून वापरला जाईल,मग याच्यात सगळं संपला ना, मराठवाड्यात कोतवाल बुकच्या नक्कली सापडत नाहीत,त्यामुळे पुरावा म्हणून इतर काही वापरता येत नाही. त्यामुळे राक्षसभवन असेल,सातारा किंवा हैद्राबाद गॅजेट असेल हे पुरावा म्हणून वापराव,2001 चा कायदा आहे,कोणीतरी पाटील जातीच्या दाखल्यावरून हायकोर्टात गेल्या होत्या. त्यावेळी कुठल्याही जातीचा व्यक्ती पुराव्या अभावी आरक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्याला प्रतिज्ञा पत्रावर त्या व्यक्तीला जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करता येईल असं म्हटलं आहे. अस परिपत्रक आहे,हा जुना कायदाच आहे,हा काही आता भेटलेला नाहीये अस बच्चू कडू प्रतिज्ञा पत्रावर कुणबी प्रमाणपत्र द्या या शासनाने काढलेल्या जीआरवर बच्चू कडू म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केलीयआमचे परभणीचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... 121 बच्चू कडू -माजीमंत्री
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 04:35:41
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_WARDSTRUCTURE _OBJECTION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून एकूण ४० आक्षेप दाखल झाले होते.त्यावरील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांची बाजू ऐकली व संबंधित स्थानिक संस्थांकडून स्पष्टीकरण मागवले.या सुनावणीचा अहवाल तयार करून ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.आता निवडणूक विभागाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रभाग रचना निश्चित होणार असून, उमेदवार व राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 15, 2025 04:35:06
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_RESHAN_STORE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यात 16 रेशनची दुकाचे परवाने रद्द, एक निलंबित; धान्यांमध्ये तफावत आढळल्याने पुरवठा विभागाची कारवाई अँकर :- अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्याने ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. यातील १६ दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. या दुकानदारांना २० लाख १४ हजार १६५ रुपयाचा दंड ठोठाविला आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून रेशनकार्डधारकांना सुविधा मिळण्याकरिता त्यांना धान्य मिळण्यास त्रास होवू नये याकरिता विविध पथकांकडून एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान तपासणी मोहिन राबविली होती. यामध्ये १९१६ रेशन दुकानांपैकी १५६१ दुकानांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ९२ दुकानांमध्ये आकस्मिक भेट देण्यात आली. तर प्राप्त तक्रारीवरुन १३ दुकानांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांचे आदेशावरुन करण्यात आली. या तपासणीमध्ये ३५ दुकानदार किरकोळ दोषी, एक दुकानदार मध्यम व १६ दुकानदार हे गंभीर दोषी आढळून आले. असे एकुन ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गंभीर दोषी आढळलेल्या १६ दुकाने रद्द केली असून मध्यम दोषी आढळलेले एक दुकान निलंबीत केले आहे. या सर्व दुकानदारांवर २० लाख १४ हजार १६५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे धान्यांचा काळा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
1
comment0
Report
Advertisement
Back to top