Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर ट्रक ब्रिज से गिरा, CCTV फुटेज वायरल

SNSWATI NAIK
Sept 16, 2025 06:17:28
Navi Mumbai, Maharashtra
story slug - मुंबई पुणे एक्स्प्रेस वर ट्रक ब्रीज वरून खाली पडला मुंबई पुणे एक्स्प्रेस पर दुर्घटना ftp slug- nm express accident shots- video reporter- swati naik navi mumbai anchor मुंबई पुणे एक्सप्रेस वरून ट्रक खाली पडला. नवीन पनवेल जवळील टेंभोडे येथील ब्रिज जवळ घडला अपघात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू. भरधावं ट्रक चे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात.
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Sept 16, 2025 08:20:23
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 16, 2025 08:17:27
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1609ZT_MAVAL_MLA_SHELKE_N Total files : 03 Headline : राष्ट्रवादीतील बंडखोरांचा भाजपात प्रवेश आमदार सुनील शेळके यांचा पलटवार : ‘दिल्या घरी सुखी रहा...' Anchor : मावळ तालुक्यातील राजकारण म्हणजे सध्या बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य यांनी हाती कमळ घेत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. या प्रवेशाने जणू अजित पवार गटाच्या पटावरचं एक कोपऱ्यातलं प्याद उचललं गेलं. मात्र आमदार सुनील शेळके यांनी या हालचालीकडे एका राजकीय रणनीतीदारासारखं पाहिलं. त्यांनी थेट हल्ला चढवला आणि टोला लगावला “दिल्या घरी सुखी रहा”. त्याचबरोबर शेळके यांनी स्पष्ट केलं की, हे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हतेच तर पक्षातून हकालपट्टी होऊन भटकंती करणारे होते. बापू भेगडे यांच्या बंडखोरीनंतर उफाळलेल्या जुन्या विरुद्ध नव्या राष्ट्रवादीच्या वादातून आता एक वेगळाच पट उभा राहतोय. भाजपमध्ये गेलेल्या या पदाधिकारी आणि नेत्यांना घेऊन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी अजून एक डाव खेळला. पण यावर प्रत्युत्तर देताना सुनील शेळके यांनी दाखवून दिलं की, हा डाव असला तरी “राजकीय मात” अजून बाकी आहे. मात्र मावळच्या या राजकारणात कोण कोणाला चेकमेट करणार हे पाहणं अधिक रंगतदार होणार आहे.. बाईट : सुनील शेळके, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ (file no.03)
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 16, 2025 08:07:47
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 16, 2025 08:07:17
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: शिवसेना नेते विनायक राऊत बाईट मुख्य मुद्दे *ऑन : जिल्ह्यात जनता दरबार तर मंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग दौरा यातून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न* लोकांचे समस्या सोडविण्यामध्ये त्यांना फारसा काही रस दिसत नाही. मात्र, एकमेकांवर कुरघोडी करणे हे भाजप आणि शिंदे गटाकडून जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच एकाच कुटुंबाच्या हातात जिल्ह्याची सत्ता गेल्याने लुटारूंचा धंदा येथे सुरू झाला आहे. *ऑन: काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली मंत्री योगेश कदम यांची आढावा बैठक भाजपची पाठ* योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत. महायुतीचे ते होऊ शकत नाहीत आणि भाजपवाले त्यांना मान्यच करीत नाहीत. या जिल्ह्यासह महाराष्ट्र या टवाळखोरांच्या-दलालांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भिकेकंगाल व्हायला लागला आहे. त्यामुळे योगेश कदम आले काय, नितेश राणे आले काय!, येथील आढावा नितेश राणे यांनी घेतला पाहिजे. योगेश कदम यांना का यावे लागते? म्हणजे. नितेश राणे कार्यक्षम नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. हे नितेश राणे यांचे फेल्युअर आहे, हे योगेश कदम यांच्या दौऱ्याने सिद्ध झाले आहे. *ऑन: येत्या निवडणुकांवर योगेश कदम यांचे वक्तव्य* खरी शिवसेना आमचीच आहे. गद्दार गटाला शिवसेना म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. भाजपची रणनीती पाहिली तर भाजप येत्या निवडणुका एकहाती लढेल आणि शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावतील. *ऑन: राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा* सध्या महाराष्ट्र हा लुटारूंच्या हातात गेला असून सध्या जनतेच्या पैशाची लूट करायची आणि आपल्या ठेकेदाराचे खिसे भरायचे ही नीती सध्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. राज्याचे बजेट कोलमडलेले असताना सुद्धा शक्तिपीठ महामार्ग जो अदानीसाठी होत आहे. त्याला १ लाख कोटी पेक्षा खर्च होत आहे. मात्र, राज्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. *ऑन: जिल्हा परिषद निवडणूक रणनीती* येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. *ऑन: भारत आणि पाक सामना सट्टा यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर योगेश कदम यांचा टोला* या सामन्यावर किती सट्टा लागला हे समोर आणण्याचे काम योगेश कदम यांचे आहे. सट्टा थांबविणे, जुगार थांबविणे ही जबाबदारी तुमची आहे, संजय राऊत यांची नाही. म्हणूनच तुमच्यासारखा कमकुवत मंत्री राज्याला मिळाला आहे. पाक बरोबर सामना खेळण्याची हौस कशासाठी होती? याचा खुलासा करावा. बाईट: विनायक राऊत
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 08:06:04
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 08:05:10
Nashik, Maharashtra:nsk_nimase अँकर नाशिकमधील गाजलेल्या आकाश धोत्रे हत्या प्रकरणात उद्धव निमसेना प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. न्यायालयाने आरोपींना 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तपास यंत्रणेला अधिक माहिती गोळा करण्यासाठी व पुरावे सादर करण्यासाठी ही मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले. न्यायालयीन कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या चौकशीसाठी आवश्यक वेळ लागणार असल्याचे नमूद केले. या आदेशामुळे निमसेना प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निमसेना कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयानंतर संभ्रम आणि तणावाचे वातावरण आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 16, 2025 08:04:49
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 07:50:43
Beed, Maharashtra:बीड: धनंजय मुंडे बाईट pointers - कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये.. - बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे. बाकी sa सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. - मात्र स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र असताना बोलताना स्वर्गीय मुंडे साहेबांवर याच समाजाने प्रचंड प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. - अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे हे कोण आहेत, ते सोशल मीडियावर सगळ्यांना समजले आहे. - कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम आहे. - माध्यमांना चांगले कार्यक्रम दाखवता येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी होतात. इथे काही तरी झाले पाहिजे तेंव्हाच माध्यमांचा trp वाढतो... - काही विघ्नसंतोषी लोकांनी करवून आणलेला हा प्रकार आहे. - बंजारा वंजारा आम्ही एक म्हणतो कारण आम्ही भटके आहोत...
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 16, 2025 07:49:41
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यातील यंदा अति मुसळधार पावसामुळे जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, जवळपास सर्वच मंडळात अतिवृष्टी झालीय,पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळात तर तब्बल 219 मिली मीटर पाऊस एका रात्रीत झालेला आहे. अतिमूसळधार पावसामुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती असतांना ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची नुकसान आकडेवारी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केली नाही. सप्टेंबर महिण्यातील नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात यावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देऊन केलीय. यावेळी गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे आणि परभणीचे आमदार राहुल पाटील ही उपस्थित होते.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 16, 2025 07:49:30
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापुरातील आरटीओ अधिकाऱ्यांची केली खरडपट्टी - सोलापुरातील आरटीओ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावर किती वाहनांची ये - जा होते हा प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांची बोलती बंद - आरटीओचे अधिकारी कर्मचारी गणवेशात नसल्याच पाहून परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला संताप - मंत्री उपस्थित असताना सुद्धा अधिकारी, कर्मचारी गणवेशात कसे नाहीत? विचारला प्रश्न.... - आरटीओचे 20-25 अधिकारी, कर्मचारी महामार्गावरील ऑफिसमध्ये गणवेशात नव्हते... त्याच कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांसोबत ( माझ्यासोबत ) सेल्फी काढल्याचा केला खुलासा *चेकपोस्टवर वसुली करणारे कोण होते? उपस्थित केला प्रश्न.....* - आरटीओ अधिकाऱ्यांना हा सर्व अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश - आरटीओ चा त्रास फक्त सोलापुरातच नाही तर संपूर्ण राज्यात असल्याची दिली माहिती
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 16, 2025 07:47:17
Pandharpur, Maharashtra:16092025 Slug - PPR_ORNAMENT_JOIN file 03 ---- Anchor - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू शेकडो वर्ष मौल्यवान दागिने गाठवण्याचे काम सुरू, नवरात्रीच्या काळात रुक्मिणी पांडुरंगाचे रूप या दागिन्यांनी खुलणार विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात सोन्याच्या दागिन्यांसह हिरे मोती माणिक पाचू असे मौल्यवान दागिने आहेत. नवरात्रीच्या काळात देवाच्या खजिन्यातील सर्व दागिने नऊ दिवस परिधान करतात. त्यामुळे हे दागिने आणि त्यात सजलेले देवाचे रूप भाविक डोळे भरून पाहतात. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दागिन्यात प्रामुख्याने लफ्फा, कौस्तुभ मणी, बाजीराव कंठी, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, बोर माळ खड्यांची वेणी, मोत्यांचे मंगळसूत्र , पाचूची गरसोळी, शिंदे हार, नवरत्न हार , सोन्याचे पैंजण सोन्याचे गोठ असे विठ्ठलाकड 255 आणि रुक्मिणी कडे 101 प्रकारचे दागिने आहेत. देवाचे दागिने गाठवण्याचे काम मुस्लिम समाजातील पटवेकरी यांची तिसरी पिढी करत आहे. नवरात्री पूर्वी दिवसभर मंदिरात बसून प्रत्येक दागिना तपासून तो सैल झाला असेल तर त्याला पुन्हा गाठवणे अशी कामे एक सेवाभावी काम म्हणून केले जाते. ---- वन टू वन - राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बाईट - ताजुद्दीन पटवेकरी, मुस्लिम दागिने कारागीर,
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 07:46:40
Kolhapur, Maharashtra:Kop Back Bench WT Feed:- Live U Anc:- शाळेत एका मागोमाग एक बसलेली विद्यार्थी हे चित्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदलले आहे. पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नकारात्मकता वाढू नये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यू आकारामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यात पहिला ठरलाय.. VO 1:- पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हुशार असतात असा समज सर्वांचाच . पुढच्या बाकावरचे विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात असा समज कित्येक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळतोय. त्यामुळे शिक्षकांचे देखील नकळत पुढे बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडेच अधिक लक्ष असल्याचे दिसून आलं. त्यामुळे बॅकबेंचेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच एक वेगळी भावना निर्माण झालेली असते. हीच भावना दूर व्हावी यासाठी केरळच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेने बॅकबेंचर संकल्पना दूर करून यू आकारात बैठक व्यवस्था सुरू केली आहे. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली असून कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या रत्नाप्पाण्णा कुंभार आर के नगर शाळेत देखील गोलाकार विद्यार्थी रचना पाहायला मिळत आहे. या उपक्रमाचे शाळेच्या शिक्षकांनी कौतुक केल आहे. इतकच न्हवे तर वर्गात पुढं आणि बॅकबेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ही संकल्पना अधिक भावली आहे. Byte:- विनोदकुमार चव्हाण, शिक्षक विद्या मंदिर रत्नाप्पा कुंभार नगर Byte:- शिल्पा बेंची, विद्यार्थी Byte:-ओमकार उकंडे, विद्यार्थी VO 2:- केरळ राज्यात मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसण्याची यू पद्धत दाखवण्यात आली होती. त्यानुसार केरळ राज्याने बॅकबेंचर संकल्पना दूर करून यु आकारामध्ये बसण्याचे शैक्षणिक क्षेत्रातील नव मॉडेल समोर आणले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CO एस कार्तिकेन यांनी याच धरतीवर कोल्हापूर जिल्ह्यात त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केले आहे. Byte:- एस कार्तिकेन, CEO जिल्हा परिषद कोल्हापूर. VO 3:- या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहुन शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचे लक्ष असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळते. शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची देहबोली पाहू शकतात. सुरुवातीला ज्या शाळांमध्ये वर्गाची पटसंख्या कमी आहे अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी अशी बैठक व्यवस्था तातडीने केली आहे . या बैठक व्यवस्थेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळत असल्याचे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. खर तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन बदल अपेक्षित आहे. हाच बदल स्वीकारून कोल्हापूर जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यात पहिल्यांदा नव पाऊल टाकलय. त्यामुळे नव पाऊलवाट तुडवीत सर्वच विद्यार्थी समान पातळीवर शिक्षण घेत आपलं ध्येय गाठणार आहेत. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 07:45:41
Jalna, Maharashtra: FEED NAME |1609ZT_JALNA_JARANGE(5 FILES) जालना : ब्रेकिंग | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या मनोज जरांगे यांची मागणी कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली फोनवरून मागणी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका,आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरसकट मदतीचा निर्णय घ्या-जरांगे शेतकऱ्यांची मजा घेऊ नका अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करू-जरांगे अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंबड तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली आहे.अंबड तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा फटका बसला असून पिकं पाण्याखाली गेली आहेत.त्यामुळे जरांगे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी केली आहे.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय घ्या, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका असं आवाहन जरांगे यांनी राज्य सरकारला केलं आहे.शेतकऱ्यांची मजा घेऊ नका .शेतकरी खचल्यानं त्याला मदत करा अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल असही जरांगे म्हणाले आहेत बाईट : मनोज जरांगे पाटील
0
comment0
Report
Advertisement
Back to top