Back
कोल्हापुर में यू-आकार बैठक से बैकबेंचर की टेंशन खत्म
PNPratap Naik1
Sept 16, 2025 07:46:40
Kolhapur, Maharashtra
Kop Back Bench WT
Feed:- Live U
Anc:- शाळेत एका मागोमाग एक बसलेली विद्यार्थी हे चित्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदलले आहे. पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नकारात्मकता वाढू नये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यू आकारामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यात पहिला ठरलाय..
VO 1:- पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हुशार असतात असा समज सर्वांचाच . पुढच्या बाकावरचे विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात असा समज कित्येक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळतोय. त्यामुळे शिक्षकांचे देखील नकळत पुढे बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडेच अधिक लक्ष असल्याचे दिसून आलं. त्यामुळे बॅकबेंचेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच एक वेगळी भावना निर्माण झालेली असते. हीच भावना दूर व्हावी यासाठी केरळच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेने बॅकबेंचर संकल्पना दूर करून यू आकारात बैठक व्यवस्था सुरू केली आहे. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली असून कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या रत्नाप्पाण्णा कुंभार आर के नगर शाळेत देखील गोलाकार विद्यार्थी रचना पाहायला मिळत आहे. या उपक्रमाचे शाळेच्या शिक्षकांनी कौतुक केल आहे. इतकच न्हवे तर वर्गात पुढं आणि बॅकबेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ही संकल्पना अधिक भावली आहे.
Byte:- विनोदकुमार चव्हाण, शिक्षक विद्या मंदिर रत्नाप्पा कुंभार नगर
Byte:- शिल्पा बेंची, विद्यार्थी
Byte:-ओमकार उकंडे, विद्यार्थी
VO 2:- केरळ राज्यात मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसण्याची यू पद्धत दाखवण्यात आली होती. त्यानुसार केरळ राज्याने बॅकबेंचर संकल्पना दूर करून यु आकारामध्ये बसण्याचे शैक्षणिक क्षेत्रातील नव मॉडेल समोर आणले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CO एस कार्तिकेन यांनी याच धरतीवर कोल्हापूर जिल्ह्यात त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केले आहे.
Byte:- एस कार्तिकेन, CEO जिल्हा परिषद कोल्हापूर.
VO 3:- या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहुन शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचे लक्ष असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळते. शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची देहबोली पाहू शकतात. सुरुवातीला ज्या शाळांमध्ये वर्गाची पटसंख्या कमी आहे अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी अशी बैठक व्यवस्था तातडीने केली आहे . या बैठक व्यवस्थेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळत असल्याचे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. खर तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन बदल अपेक्षित आहे. हाच बदल स्वीकारून कोल्हापूर जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यात पहिल्यांदा नव पाऊल टाकलय. त्यामुळे नव पाऊलवाट तुडवीत सर्वच विद्यार्थी समान पातळीवर शिक्षण घेत आपलं ध्येय गाठणार आहेत.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 09:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 16, 2025 09:33:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:26:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:26:020
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:25:350
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 09:05:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:05:040
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 09:04:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:01:100
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 16, 2025 08:36:541
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:36:463
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 08:36:393
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 08:36:292
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 08:20:231
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:17:551
Report