Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: मनोज जरांगे ने पिक नुकसान पर सरसकट मुआवजे की मांग की

NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 07:45:41
Jalna, Maharashtra
FEED NAME |1609ZT_JALNA_JARANGE(5 FILES) जालना : ब्रेकिंग | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या मनोज जरांगे यांची मागणी कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली फोनवरून मागणी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका,आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरसकट मदतीचा निर्णय घ्या-जरांगे शेतकऱ्यांची मजा घेऊ नका अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करू-जरांगे अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंबड तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली आहे.अंबड तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा फटका बसला असून पिकं पाण्याखाली गेली आहेत.त्यामुळे जरांगे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी केली आहे.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय घ्या, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका असं आवाहन जरांगे यांनी राज्य सरकारला केलं आहे.शेतकऱ्यांची मजा घेऊ नका .शेतकरी खचल्यानं त्याला मदत करा अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल असही जरांगे म्हणाले आहेत बाईट : मनोज जरांगे पाटील
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 09:33:55
Buldhana, Maharashtra:मलकापूरात बांधकाम विभाग 'पाण्यात'; गुणवत्ता तपासण्यापूर्वी स्वतःचं कार्यालय बुडालं..! Anchor: गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्याला 'जलमय' केलं आहे, पण मलकापूरात तर चक्क जिल्हा परिषदेच्या उपविभागीय बांधकाम कार्यालयानेच 'पाणी पाणी'चा अनुभव घेतला! ज्या विभागावर बांधकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे, तोच विभाग गुडघाभर पाण्यात बुडाला. आता प्रश्न असा आहे, की ज्यांना स्वतःचं कार्यालय वाचवता येत नाही, ते बांधकामांची गुणवत्ता काय तपासणार? मलकापूर शहरातील या शासकीय कार्यालयात पाणी शिरल्याने महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रं आणि फर्निचर पाण्याच्या लाटेत वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रशासनाने नागरिकांना 'सुरक्षित राहा' असं आवाहन केलं, त्यांचंच कार्यालय पाण्याखाली गेल्याने आता प्रशासनाचीच सुरक्षा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळेवर काम करणं तर सोडाच, आता पाण्याच्या या लाटेमुळे फाईल्स भिजून कामाचा 'खेळ' आणखी लांबणार हे नक्की...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 16, 2025 09:33:25
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_BANJARA_BYTE तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 एसटी संवर्गाच्या आरक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज धडकला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अँकर :- अमरावतीत आज सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकच मिशन – एसटी आरक्षण अशा जोशपूर्ण घोषणा देत समाजबांधवांनी आपली ताकद दाखवली. मोर्चात महिलांचा व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हैदराबाद गॅझेट इतर जातींना जसं जाहीर केलं तसं बंजारा समाजाला सुद्धा जाहीर करावा व आदिवासींचे आरक्षण आम्हाला मिळावे अशी मागणी बंजारा समाजाने केली. यावेळी समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एसटी आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. बाईट :– आंदोलन
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 09:26:02
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1609ZT_JALNA_WOMEN_CARRY(7 FILES) जालना | 60 वर्षीय वृद्ध महिला नाल्याच्या पाण्यात गेली वाहून… जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील घटना... अँकर: जालन्यात 60 वर्षीय वृद्ध महिला नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे ही घटना घडली असून, शारदाबाई काशिनाथ शिरीसुंदर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथून जाणाऱ्या नाल्याला पूर आला होता. शारदाबाई आज सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर आल्या असता त्यांच्या घराजवळून नाल्याचे पाणी वाहत होता. यावेळी पाय घसरल्याने त्या नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्या. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी वृद्ध महिलेचा शोध सुरू केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 09:05:32
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 09:05:04
Jalna, Maharashtra: FEED NAME |1609ZT_JALNA_MLA_MARHAN(2 FILES) जालना : आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर दोन गटात तुंबळ हाणामारी,एक गट ऐकत नसल्याने खोतकरांनी एकाच्या लगावली कानशिलात दोन्ही लोकं ऐकण्यातले,दोघांना हटवण्यासाठी कानशिलात लगावली-खोतकर अँकर | जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच ही घटना घडली आहे. काल रात्री जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.यामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली.या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर बस स्थानक परीसरात पोहचले आणि त्यांनी वाहून गेलेल्या दुकानांची पाहणी सुरू केली.यावेळी दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटात खोतकर यांच्या समोरच हाणामारी झाली.दरम्यान खोतकर यांनीच दोन्ही गटातील लोकांची समजुत काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.यातील एक गट खोतकर यांनी समज देऊनही ऐकत नव्हता त्यामुळे खोतकर यांनी एकाच्या कानशिलात लगावली आहे.दरम्यान दोघांनाही हटवण्यासाठी कानशिलात मारावी लागली असं खोतकर यांनी म्हटलं आहे बाईट: अर्जुन खोतकर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 09:04:34
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Us Humani Story Feed:- Live U Anc:- सलग पडणाऱ्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात पावसाचा जोर मोठा असल्याने हा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना शिवारात आवश्यक असणारा वाफसा मिळालेला नाही. त्यामुळे उसावर तांबेरा, पोका बोंग, मावा करपा या किडीने ऊसाला पोखराला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन घटन्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकूण 3 लाख 91 हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे, त्यापैकी तब्बल 50% म्हणजेच सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचं पीक उभ आहे. यातील 20% हून अधिक ऊस पिकावर तांबेरा, पोका बोंग, मावा किडीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. Play Byte:- जालिंदर पांगारे, जिल्हा कृषी अधीक्षक कोल्हापूर
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 16, 2025 09:01:10
Parbhani, Maharashtra:अँकर - बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून काल आदिवासी बांधवाणी हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता,या मोर्चा पाठोपाठ आज बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंटवर बंजारा समाजाने भव्य रास्ता रोको सुरू केलाय. यामुळे छत्रपती संभाजीनगर,हिंगोली आणि नांदेड कडून येणारी वाहतूक ठप्प झालीय,या रास्तारोकोमध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव भगिनी एकवटल्या असून बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशात रास्तारोको मध्ये सहभागी झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेट मध्ये आमची एसटी प्रवर्गात नोंद हसून आम्हालाही हैदराबाद गॅजेट लागू करावे आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा पद्धतीची मागणी बंजारा समाजाकडून केली जात आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 16, 2025 08:36:54
Nashik, Maharashtra:Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nimse_cort नांदूर नाका परिसरातून राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील आरोपी उद्धव निमसे काल पोलिसात हजर उद्धव निमसेवर खुनाचा गुन्हा केला होता दाखल २० दिवसांपासून निमसे होता फरार आज निमसेला नाशिकच्या जिल्हा न्यायालय केले हजर न्यायालयात हजर केल्यानंतर निमसेला २० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली पोलिस पुढील तपास करत असून राहुल धोत्रे खून प्रकरणाला आता वेग येणार... अँकर:     नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पोळ्याच्या दिवशी धोत्रे आणि निमसे गटात तुफान हाणामारी झाली होती यानंतर यात राहुल धोत्रे या युवकाचा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता... मात्र ते वीस दिवसांपासून फरार होते... पोलिसांना गुंगरा देऊन अखेर काल ते पोलिसांना शरण आलाय.. आज त्यांना कोर्टात हजर केले असता 20 सप्टेंबरपर्यंत उद्धव निमसे यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे....या संदर्भात आता पोलीस पुढील तपास करत असून राहुल धोत्रे खून प्रकरणातील तपासाला आता वेग येणार आहे. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे कोणाचे मुख्य आरोपी असून हे स्वतः पोलिसात शरण आले आहे.... बाईट: शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 16, 2025 08:36:46
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 08:36:39
Jalna, Maharashtra:FEED NAME | 1609ZT_JALNA_SUCIDE(2 FILES) जालना | बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आणखी एकाची आत्महत्या.. राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या... मनेश जाधव असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव.. उद्या दिंडी महामार्गावरील लिंबखेडा येथे रस्ता रोको आंदोलन होणार... अँकर |  जालन्यात बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी एकाने आत्महत्या केलीय..मंठा तालुक्यातील लिंबखेडा येथील मनेश जाधव याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे, आता पर्यंत राज्यात तीन आत्महत्या झाल्या आहेत..काल बंजारा समाजाच्या वतीने जालन्यात मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चात मनेश हा सहभागी झाला होता,मोर्चा संपल्यानंतर त्याने घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केलीय, दरम्यान, उद्या दिंडी महामार्गावरील लिंबखेडा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 08:36:29
Beed, Maharashtra:बीड: नुकसानग्रस्त भागाची आमदार धनंजय मुंडेंकडून पाहणी... Anc- परळी तालुका व अंबाजोगाई परिसराला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून थेट शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदार तसेच मंडळ अधिकाऱ्यांना दिले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. तसेच सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी देखील यावेळी झालेल्या नुकसानीची व्यथा आमदारांपुढे मांडली.
2
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 16, 2025 08:20:23
1
comment0
Report
Advertisement
Back to top