Back
भिवंडी में तीन बोगस डॉक्टर गिरफ्तार, बड़ी मेडिकल धोखाधड़ी उजागर
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 08:18:19
Thane, Maharashtra
भिवंडीत तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल...
दहा वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर अटकेची कारवाई...
ॲंकर...
भिवंडी शहराची कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे. शहारातील झोपडपट्टी भागातील गरीब आणि अशिक्षित नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर दवाखाने थाटून बसलेत. मागील १० वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागनं पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आहे. भिवंडी शहरात तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळं बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी आपले दवाखाने बंद ठेवून पळ काढला आहे. भिमराव कावडे, मोहम्मद शमीम सिध्दीकी, मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ असं गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या पथकानं शांतीनगर परिसरातील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांच्या दवाखान्यावर कारवाई केली. त्यांच्याकडं बी.ई.एम.एस. या पदवीचं प्रमाणपत्र आढळलं. त्यांनाही शहरी भागात परवानगी नसताना त्यांच्याजवळ ॲलोपॅथीचे उपचार करण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधं आढळली. तर पथकानं तिसरी कारवाई गायत्रीनगर परिसरातील नूरी नगर डोंगरपाडा इथं केली. तिथं एका गाळ्यात मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ ही व्यक्ती दवाखाना थाटून बसली होती. त्याच्याकडं वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं आढळलं. त्याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथीचे वैद्यकिय उपकरणं आणि औषधे जप्त केली, असं डॉ जयवंत धुळे यांनी सांगितलं.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:530
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:390
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:400
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:091
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:443
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 14, 2025 10:00:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 10:00:420
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 09:36:212
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 09:33:020
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 09:15:103
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 09:03:571
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:47:573
Report