Back
महाराष्ट्र: ताडगाव जंगल से जहाल नक्सली शंकर भिमा महाका गिरफ्तार
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 10:45:53
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1409ZT_GAD_NAXAL_ARREST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलातून शंकर भिमा महाका या जहाल नक्षल्यास पोलिसांनी केली अटक, महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते दोन लाखांचे बक्षीस, एन आय ए ला खुनाच्या प्रकरणात हवा होता हा नक्षली
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तिरकामेटा जंगल परिसरामध्ये गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान दलाची दोन पथके नक्षलविरोधी अभियान राबवित असताना या जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आला. जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केल्यावर त्याचे नाव शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय 32 वर्षे, रा. परायनार, तह. भामरागड, जि. गडचिरोली असल्याचे उघड झाले. हा पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल नक्षली असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. जानेवारी 2022 मध्ये एकूण 2 कोटी रुपये किंमतीच्या 19 वाहनांची नक्षल्यानी जाळपोळ केली होती. त्यात हा सामील होता. त्याच्यावर 01 जाळपोळ, 01 खून व इतर-02 असे एकूण 04 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते. तो राष्ट्रीय तपास संस्था- एन आय ए ला एका खुनाच्या प्रकरणात हवा होता. जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 109 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 14, 2025 12:35:021
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 12:20:380
Report
MKMohammed Khan
FollowSept 14, 2025 12:03:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 11:45:510
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 11:15:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:363
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:472
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:378
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:304
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:390
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:095
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:444
Report