Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूरमध्ये तुळशी माळ बनवण्याची अद्भुत कहाणी!

SACHIN KASABE
Jun 29, 2025 06:34:10
Pandharpur, Maharashtra
29062025 Slug - PPR_TULSHI_MAAL feed.on 2c file.02 ----- Anchor - विठोबाचा भक्त म्हणजे वारकरी आणि त्याला ओळखण्याची सोपी खुण म्हणजे गळ्यात १०८ मण्यांची तुळशीच्या लाकडांची माळ , आषाढी एकादशी निमित्ताने या तुळशी माळ बनवण्याची लगबग पंढरीत सुरू आहे पंढरपूरमध्ये शेकडो वर्षांपासून येथील काशीकापडी समाज तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आला आहे. तुळशीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातून त्यांचे मणी करून हा समाज वर्षभर तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय करीत असतो. पंढरपूरमध्ये चार मोठ्या यात्रां सोबत रोज येणाऱ्या भाविकांच्या देखील माळ घालण्याची संख्या मोठी असल्याने वर्षभर हा समाज माळा बनविण्याचे काम करीत असतो. पंढरपूर बरोबरच आळंदी, देहू, पैठण, मुक्ताईनगर अशा सर्वच संतांच्या गावात जाऊन हा समाज बनविलेल्या माळा विकायचे काम करीत असतो. मंदिर परिसरातील प्रत्येक लहान मोठ्या व्यापाऱ्याकडे या तुळशीच्यामाळा वर्षभर विकल्या जातात. आजही वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या खऱ्या तुळशीच्या माळा हा काशीकापडी समाज वर्षभर हाताने बनवत असतो. या समाजातील 200 पेक्षा जास्त तरुण सध्या तुळशीच्या माळा बनविण्याचा व्यवसाय करीत असतात. तुळशीच्या लाकडाला कातून मणी बनविले जातात आणि या मण्यांपासून माळ बनवली जाते. बनविलेल्या मण्यांच्या माळा ओवायचे काम या समाजाच्या महिला करीत असतात. या माळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जप माळ, पाचपट्टी माळ, दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ, डबलपट्टी, चंदन माळ, कातीव माळ असे यांचे प्रकार असून या माळेची किमत 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत असते. वारकरी संप्रदायात ही तुळशीमाळ देवाच्या पायाला लावून आपल्या गुरु अथवा महाराजांच्याकडून गळ्यात घातली जाते ------ Byte - तुळशी माळ कारागिर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement