Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

रायगडच्या कोर्लई समुद्रात संशयास्‍पद बोट, पाकीस्‍तानशी कनेक्‍शनचा संशय!

PRAFULLA PAWAR
Jul 07, 2025 10:06:59
Raigad, Maharashtra
टीप - मे महिन्यात गर्जा महाराष्ट्र साठी पोर्तुगीज लोकांची नॉलिंग भाषा यावर आपण कोरलई गावची स्टोरी केली होती. त्यात कोरलई गाव आणि समुद्र किनाऱ्यांचे भरपूर व्हिडिओ आणि ड्रोन शॉट्स आहेत. स्‍लग – रायगडच्‍या कोर्लई समुद्रात संशयास्‍पद बोट ......... बोट पाकीस्‍तानी असल्‍याचा संशय .......जिल्‍ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ......... ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती ........ तटरक्षक दलाकडून बोटीचा शोध सुरू ........ सुरक्षा यंत्रणांच्‍या सक्षमतेवर प्रश्‍नचिन्‍ह ........... अँकर – रायगडच्‍या कोर्लई समुद्रात काल रात्री एक संशयास्‍पद बोट आढळून आली. या बोटीचे कनेक्‍शन थेट पाकीस्‍तानशी असल्‍याचं सांगितलं जातंय. मात्र या बाबत पोलीस किंवा महसूल यंत्रणा काहीच बोलत नसल्‍याने नागरीकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. दुसरीकडे सागर सुरक्षा यंत्रणांच्‍या सक्षमतेबाबत देखील प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित होत आहे. व्हिओ 1 – मुरूड तालुक्‍यातील कोर्लई जवळच्‍या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्‍पद बोट आढळून आली. याची माहिती पोलीसांना मिळताच सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सतर्क झालेल्‍या पोलीस यंत्रणेने कोर्लई किनारी धाव घेतली. पोलीसांसह समुद्राशी संबंधित संर्व यंत्रणा कामाला लागल्‍या. सर्वत्र नाकाबंदी करण्‍यात आली. झाडाझडती सुरू झाली. परंतु यंत्रणेच्‍या हाती काहीच लागलं नाही. रात्री या बोटीचा एक लाल दिवा खोल समुद्रात चमकताना दिसत होता. सकाळपासून तोही दिसायचा बंद झाला. तटरक्षक दलाची बोट या संशयास्‍पद बोटीचा शोध घेते आहे. बाईट – प्रशांत मिसाळ, माजी सरपंच कोर्लई व्हिओ 2 – या संशयास्‍पद बोटीसंदर्भात पोलीस किंवा अन्‍य यंत्रणा काहीच बोलत नसल्‍याने या घटनेचे गुढ अधिकच वाढले आहे. या बोटीचे थेट पाकीस्‍तानशी कनेक्‍शन असल्‍याची चर्चा सुरू झाल्‍याने ही बाब तितकीच गंभीर आहे. मुंबईला लागून असलेला रायगडचा किनारा नेहमीच संवेदनशील राहिलाय. मार्च 1993 मध्‍ये झालेल्‍या मुंबईतील साखळी बॉंबस्‍फोटात वापरलेले आरडीएक्‍स रायगडच्‍या शेखाडी किनारी उतरवण्‍यात आले होते. तेव्‍हापासून रायगडच्‍या किनारपटटीवर सागरी सुरक्षा यंत्रणांची नजर अधिक असते. मात्र ही संशयित बोट सागरी सुरक्षा यंत्रणांच्‍या नजरेतून सुटली कशी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्‍यातच यंत्रणा यावर अद्यापतरी काहीच बोलत नसल्‍याने त्‍याचे गुढ आणि गांभीर्य अधिकच वाढले आहे. बाईट 2 – अद्याप बाईट मिळालेला नाही (मुंबईतून बाईट घेवून वापरावा) फायनल व्हिओ – 18 तास उलटून गेले तरी बोटीचा कुठलाच थांगपत्‍ता लागत नाही. सध्‍या भारत पाकिस्‍तान मधील तणावाची स्थिती पाहता या संशयास्‍पद बोटीचा शोध लागणे आणि ती इथवर कशी आली याचा उलगडा होणे देशाच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्‍वाचं आहे. प्रफुल्‍ल पवार झी 24 तास रायगड
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top