Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

चिपळूणच्या मराठी शाळांची दुर्दशा: छत कोसळले तरी प्रशासनाचे दुर्लक्ष!

PRANAV POLEKAR
Jul 07, 2025 13:31:26
Ratnagiri, Maharashtra
चिपळूणमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची दुरवस्था – अर्धे छत जमीनदोस्त, प्रशासनाची डोळेझा,,,,? ही परिस्थिती आहे चिपळूण मधील गुढे डुगवे प्राथमिक शाळेची,,,,, एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेचा जागर सुरू असताना, चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळा मात्र उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या दिसून येतात. काही शाळांच्या इमारतींचे अर्धे छत कोसळूनही प्रशासन आणि शिक्षण खात्याचे पूर्ण दुर्लक्ष सुरु आहे. "मराठी भाषेचा अभिमान बोलायचा तरी मराठी शाळांचे काय?" असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. ग्रामस्थांनी वारंवार शासनाकडे शाळांच्या दुरुस्ती आणि नव्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवले, विनंत्या केल्या, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. काही ठिकाणी तर ग्रामस्थांनीच स्वखर्चाने नवीन इमारती उभारल्या, मात्र त्या इमारतींचीही अवस्था इतकी वाईट झाली आहे की गळतीमुळे एका खोलीत चार वर्गांचा घोळ भरवण्याची वेळ आली आहे. छतावरून पाणी टपकत असतानाच, मुलं खाली बसून शिक्षण घेत आहेत. पालक आणि शिक्षक यांच्यात भीतीचं वातावरण आहे – कधी काय कोसळेल सांगता येत नाही!" छतारूपी मरण सतत डोक्यावर, आणि शाळेचा उज्वल नव्हे तर अंधकारमय भविष्यकाळ समोर उभा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे टोलेजंग, एसी युक्त कॅम्पस जेथे बहरात आहेत, तिथे मराठी शाळा उदासवाण्या अवस्थेत धूसर होताना दिसतात. शिक्षणाचा दर्जा केवळ अभ्यासक्रमाने नव्हे तर शाळेच्या भौतिक सुविधांनीही ठरतो हे सरकार विसरतंय का, असा सवाल आता शिक्षणप्रेमींमधून होतो आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top