Back
वलांडी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात ठिय्या आंदोलन केले!
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 07, 2025 13:35:42
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- वलांडी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात एल्गार.... लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात महिलांचा ठिय्या...
AC ::- लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात मोठा आवाज उठवला आहे. गल्लोगल्ली सुरू असलेल्या देशी दारूच्या विक्रीला कंटाळून या महिलांनी थेट लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडक दिली आणि दिवसभर ठिय्या आंदोलन केलं.वलांडी गावात देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे... मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला. गावातील अनेक कुटुंबांचं आयुष्य या दारूमुळे उद्ध्वस्त होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा आणि गावातली दारू विक्री थांबवा, ही या महिलांची ठाम मागणी होती. अखेर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 31, 2025 03:33:48Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DAM_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अखेर अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सात दरवाजे उघडले, धरण परिसरात पर्यटकांची गर्दी
अँकर :– पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे अखेर 7 दरवाजे उघडण्यात आले आहे. 13 पैकी 7 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मध्य प्रदेश आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तीन दिवसापासून अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे सुरूच असून यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी.
WKT
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 31, 2025 03:32:31Nashik, Maharashtra:
nsk_japti
feed by mojo
ब्रेकिंग न्यूज
सिन्नर वळण रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर कारवाई
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्याने मुख्य अभियंता आणि लिपिक यांची खुर्ची ताब्यात
महामार्ग विभागाच्या कार्यालयात संगणक, प्रिंटर सुद्धा करण्यात आले जप्त
न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकऱ्यांची थेट कारवाई
माजी सरपंच बाजूनाथ शिरसाठ यांच्यासह 12 15 शेतकऱ्यांनी केलेल्या याचिकी नंतर न्यायालयाच्या नोटिशीवर कारवाई
अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून नाशिकमध्ये महामार्ग विभागा ला तीन वेळेस देण्यात आली होती मुदत
शेतकऱ्यांनी मिळवलेल्या नऊ जप्ती आदेशापैकी केवळ झाली दोन आदेशांची अंमलबजावणी
अद्याप सात आदेशांची अंमलबजावणी बाकी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भूसंपादनातील घोळ समोर
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 31, 2025 03:32:19Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत - रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर, माजी आमदार
ऑन जरांगे पाटील उपोषण..
- मी आमदार होतो त्यावेळी ही माझी बाजू मांडली
- सर्वसामान्य लोकांना शिक्षण आणि नोकरीच्या प्रॉब्लेम आहेत
- सर्वांना न्याय आणि भाकरीही मिळाली पाहिजे
- जरांगे पाटील यांचे आरक्षणाबाबत माफक अपेक्षा आहे
- मराठा समाजातील नागरिक श्रीमंत नाही, मराठवाड्यातील भाग हा रांजलेला गाजलेला आहे.
- पण मराठा मराठा जे म्हणतो, ती परिस्थिती आज नाही
- *मराठा समाजाची एक स्त्री आली होती मी स्वतः त्यांची फी दिली.*
- जरांगे पाटलांची मागणी सरकारने सोडवली पाहिजे
- *मागील नेत्यांनी आश्वासन दिली होती, आता ते सर्व सत्तेत आले आहेत*
- नेत्यांनी दहा वर्षांपूर्वी जे भाषणातून बोलले होते ते आता द्यायचा आहे
- धनगर समाजालाही देतो, म्हणले होते ते दिले का नाही माहित नाही मला
- *रवींद्र धंगेकर यांचा सरकारला घरचा आहेर*
- मुस्लिम समाजालाही देतो म्हणले होते, दिले का माहित नाही
- क्रांती करायला निघालेले ते लोक आहेत. त्यांना काय मिळू.. नाही मिळू... मात्र ते घेऊन येणार
- इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत
*ऑन राज ठाकरे विधान*
- राज ठाकरे बद्दल मी काय बोलणार, त्यांना जे माहिती आहे मला माहिती नाही
- एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचा चेहरा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली
- त्यांना बघून मतदान केलं आणि निवडून येताना त्यांचे मोठे योगदान
- राज ठाकरेंना वाटत असेल हे एकनाथ शिंदे सोडू शकत असतील मात्र ते त्यांचे मत आहे
- कुणी का होईना मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे
*ऑन पुणे महानगरपालिका..*
- आम्ही लढणारी लोक आहोत, जो मुंबईत होईल
- शिंदे साहेबांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी आपली यंत्रणा सुरू करायची
- पुणे असेल सोलापूर असेल कार्यकर्ते तयार आहेत
Byte : रवींद्र धंगेकर, माजी आमदार
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 31, 2025 03:17:32Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापूरकरांच्या लढ्याला मिळाले यश, डीजे लेझरवर गणेशोत्सव काळात दहा दिवस बंदीचे निघाले लेखी आदेश
- सोलापूरकरांच्या डॉल्बीमुक्ती लढ्याला अखेर मिळाले यश
- गणेशोत्सव काळात दहा दिवस डॉल्बी लेझरवर घालण्यात आली बंदी
- महाराष्ट्रातील फक्त एकमेव सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी फर्मान
- जिल्हा प्रशासनाच्या कठोर निर्णयाचे सोलापूरकरांकडून स्वागत
- शहर डॉल्बीमुक्त झाले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची करण्यात आली होती आंदोलन
- अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आला लेखी आदेश
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 31, 2025 03:16:48Nashik, Maharashtra:
ब्रेकिंग न्यूज –
शरद पवारांचा नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फुंकणार रणशिंग
१४ व १५ सप्टेंबर दोन दिवस शरद पवारांचा नाशिक जिल्हा दौरा
१४ सप्टेंबरला दिंडोरी येथे कार्यकर्त्यांचे शिबिर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार
१५ सप्टेंबरला नाशिक शहरात भव्य शेतकरी मोर्चा
कर्जमाफी, हमीभाव, विमा आदी मागण्यांवर होणार आवाज
दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 31, 2025 03:16:43kolhapur, Maharashtra:
नागपूर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे... ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे..
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे... तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी साखळी उपोषणाला पहिल्या दिवशी प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली... भाजपाचे आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी,खासदार नामदेव किरसान या सह अनेक आजी-माजी आमदार तसेच काही नेत्यांनी उपस्थिती लावत या आंदोलनाला पाठिंबा दिला
3
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 31, 2025 03:01:35Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Judge
Feed on - 2C
--------------------------
Anchor - मुसळधार पावासामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी न्यायाधीश चक्क ट्रॅक्टर मधून न्यायालयात पोहोचल्या. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी अतिवृष्टी झाली होती. अनेक शासकीय आणि खाजगी इमारतींना पाण्याने वेढा घातला होता. यामुळे अनेकाना कार्यालयात पोहोचता आले नाही. पण अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या चक्क ट्रॅक्टर वर बसून न्यायालयात आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोहोचल्या. अर्धापूर न्यायालयाला देखील पाण्याने वेढले होते त्यामुळे दुचाकी चार चाकी पोहोचणे अशक्य होते. यावर थेट न्यायाधीश महोदया ट्रॅक्टरवर बसून न्यायदानासाठी पोहोचल्या.
----------------------
1
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 03:01:26Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_new_citykink_bus
जानेवारीत सिटीलिंकच्या ताफ्यात येणार ५० 'ई-बसेस'
अँकर
केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला पीएम ई-बस योजनेंतर्गत १०० इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय... त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास नाशिकला ई-बसेस मिळणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया काही महिन्यांपासून महालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू होती. वीजजोडणीचे काम अंतिम मोकळा झालाय.... त्यामुळे पुढील वर्षीच्या जानेवारीत ५० ई-ब सेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको-लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला ५० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या ताफ्यात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेस आहेत. मात्र, यातील ५० डिझेल बसेस थांबविण्याच्या विचारात प्रशासन होते. त्या बसेसही सुरूच असणार आहेत. केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको-लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. नाशिक मनपाला पहिल्या टप्प्यात ५० बसेस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
2
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 31, 2025 03:01:11Yeola, Maharashtra:
अँकर
येवल्याची पारंपरिक हलकी,ढोल ताशांचा गजर,अग्रभागी गुरुमहाराजांचा रथ, यांची भव्य मिरवणूक काढून महापर्युषण पर्वाची सांगता भव्य, मिरवणुकीने झाली. टिपरी नृत्य आणि युवकांचे आनंदी नृत्य यांचेसह तब्बल तीन तास शोभायात्रा चालली.
येवला येथील गुलाबराव महाले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी हे 24 वे अठ्ठाई तप केले आहे. आठ दिवसांचे फक्त पाणी घेत निरंकार उपवास,अठ्ठाई तप,
केले. सार्थक समदडीया, वृषभ पटणी, नमिष्व पटणी यांनी प्रथम अठ्ठाई तप केले आहे.
रथाचे सारथ्य गुलाबराव महाले यांनी केले. छोटे मोठे उपवास करणारे,लहान बालकांनी देखील मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
2
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 03:01:03Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_murder_updet
३० तासांनी धोत्रेचा मृतदेह ताब्यात तम फरारच, तपास स्थानिक एसआयटीकडे...
अँकर
नाशिकच्या छत्रपती संभाजी नगर रोडवरील नांदूर नाका परिसरात पायावरून गाडी गेल्याच्या वादातून राहुल धोत्रे याला भाजप नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह कार्यकत्यांनी मारहाण करण्याचा आरोप झालाय. आठवड्यानंतर शुक्रवारी राहुलचा मृत्यू झाल्यावर निमसेंवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. मात्र, निमसेंना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा राहुलच्या नातेवाइकांनी घेतला होता. शनिवारी पोलिसांनी समजूत काढल्यावर ३० तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक एसआयटी स्थापन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
निमसे आणि धोत्रे गटात २२ तारखेला शुक्रवारी वाद झाले होते. त्यात निमसे गटाकडून राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. उपचार सुरू असताना शुक्रवारी राहुलचा मृत्यू झाला होता. यामुळे निमसेंवर खूनाचा गुन्हा दाखल झाल्याने ते फरार होते. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. वंचित व समाजाच्या वतीन गुन्हेगारांना तत्काळ अटक करा अशी मागणी केली होते. आयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकरणाची सहायक आयुक्त अंबड विभाग आणि गुन्हे शाखेकडून स्वतंत्र तपास करण्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला....
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 31, 2025 03:00:53Bhandara, Maharashtra:
आजाराला कंटाळून ५० वर्षीय ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या...लाखांदूर पोलिसात मर्ग दाखल
Anchor :- मागील काही दिवसापासून इसमाची प्रकृती बरी राहत नसल्याने त्याने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील झिरोबा येथील वनविभागाच्या नर्सरी येथे उघडकीस आली आहे.बुद्धेश्वर रासेकर (५०) रा लाखांदूर मृतक इसमाचे नाव आहे. मृतक बुद्धेश्वर मागील काही वर्षा पूर्वीपासून मद्यप्राशन करीत होता. मात्र मागील काही दिवसांपूर्वी त्याने मद्यप्राशन करणे सोडल्याने त्याची प्रकृती बरी राहत नव्हती.प्रकृती बरी राहत नसल्याने तो कोणताही कामधंदा न करता घरीच राहत होता.प्रकृती बरी राहत नसल्याने नेहमी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार करीत असण्याची माहिती मृतकाची पत्नी सीमा रासेकर यांनी तक्रारीत दिली आहे.
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 31, 2025 03:00:45Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3108_BHA_DEATH
FILE - 1 VIDEO 1 IMAGE
शौचाला गेलेल्या इसमाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू......चार दिवसांनी मिळाले मृतदेह.
Anchor : लाखनी तालुक्यातील मचारना येथील प्रकाश डोमा शेन्डे ( वय48 )हे चार दिवसांपूर्वी पहाटे शौचाला जात असल्याचे सांगून घरून गेले होते मात्र ते घरी परतलेच नाही. त्यामुळे घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली व पालांदुर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही केली. व शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र काही सुगावा लागला नाही. मात्र आता चार दिवसांनी त्यांचे मृतदेह घराशेजारी असलेल्या खोल पाण्याच्या डबक्यात तरंगताना दिसून आले आहे. मृतदेहाची तपासणी व घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्या. डबक्यात घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 31, 2025 03:00:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3108_BHA_HOUSE_COLLAPSE
FILE - 4 IMAGE
जीर्ण घराची भिंत कोसळली एक गाय व दोन शेळ्या ठार एक महिला व गाय गंभीर जखमी पशुपालकाचे अंदाजे १ लाख २२ हजाराचे नुकसान
Anchor :- भंडारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसात निलागोंदी येथे गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी जीर्ण घराची भिंत लगतच्या टेकचंद सिताराम वंजारी(वय ४२,रा.निलागोंदी, ता.लाखनी) यांच्या अंगणात व गुरांच्या गोठ्यावर पडली.या घटनेत अल्पभूधारक शेतकरी टेकचंद वंजारी यांची एक गाय,दोन शेळ्या व दोन कोंबड्या मलब्यात दबून जागीच ठार झाल्या.तर टेकचंद यांची पत्नी वैशाली वंजारी या गंभीर जखमी झाल्या.तसेच एक गाय गंभीर जखमी झाली असून गायीचा पाय मोडलेला आहे.जखमी वैशाली वंजारी या विटाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या होत्या.त्यांना पावडा व हाताने ओढून मलब्याबाहेर काढण्यात आले.जखमी महिलेला साकोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर आहे.जखमी महिलेच्या मानेला गंभीर जखम आहे.या घटनेत नुकसानग्रस्त शेतकरी टेकचंद वंजारी यांचे तलाठी पांचनाम्यानुसार १ लाख २२ हजार ५०० रुपयांच्या पशुधनाची नुकसान झाली आहे.
2
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 31, 2025 02:46:01Yeola, Maharashtra:
अँकर :- येवला नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता धारकांसंदर्भात शासन निर्णयानुसार अभय योजना लागू करावी या मागणी करता येवला नगर परिषदेचे माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन दिले आहे
कोरोना काळातील मंदीमुळे मालमत्ता धारक थकबाकीदार झाले आहे अशातच मालमत्ता थकबाकी वर न पाने दोन टक्के वाढीव व्याज आकारणे हे अन्यायकारक असून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बाईट :- डॉ संकेत शिंदे, माजी नगरसेवक,येवला
7
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 02:32:24Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_gus_spot
गॅस वेल्डिंग सिलिंडरच्या स्फोटात मालवाहू वाहनचालक ठार
अँकर
एका चारचाकी मालवाहू वाहनाचे गॅस वेल्डिंगचे काम करत असताना गॅस वेल्डिंग सिलिंडरचा अचानकपणे स्पोर्ट झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे.... या स्फोटात दुकानाजवळ ओट्यावर बसलेल्या वाहनचालक रामनाथ बाळकृष्ण सोमवंशी हे जागीच ठार झाले आहे.... पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनाजवळच्या महामार्गालगत समांतर रस्त्यावर रवींद्र गॅस वेल्डिंग नावाची लहान टपरी होती. याठिकाणी वाहनांचे गॅस वेल्डिंग करत दुरुस्तीची कामे करून दिली जात होती. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास वेल्डर रवींद्र पाटणकर यांच्याकडून सोमवंशी यांनी आणलेल्या वाहनाचे गॅस वेल्डिंगचे काम केले जात होते. यासाठी ते चारचाकीच्याखाली शिरलेले होते. यावेळी सोमवंशी हे येथील एका जवळच्या ओट्यावरच बसलेले होते. गॅस वेल्डिंग सुरू असताना वेल्डर पाटणकर यांना अचानक झटका बसला व काही क्षणातच गॅस वेल्डिंग सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी झालेल्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला..आजूबाजूला असलेल्या लोकांनी व दुकानदारांनी घटानस्थळाच्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळविण्यात आली
बाईट -स्थानिक नागरिक
10
Report