Back
पलावा पुलाच्या उद्घाटनावर राजकारण तापले, मनसे नेत्याची तीव्र टीका!
Kalyan, Maharashtra
अँटिकरप्शन विभागाने ठेकेदार ची आणि सेल कंपनीची चौकशी करावी... राजू पाटील
पलावा ब्रिज वरुण कल्याण डोंबिवलीत राजकारण तापले..
अनेक वर्षांपासून पलावा ब्रिज चर्चे नंतर ही राजकारण सुरु..
मनसे ठाकरे गटाने केले होते आंदोलन..
ठाकरे गट मनसे आणि शिवसेना शिंदे गटात जुंपली..
अर्धवट पुलाचे उदघाटन करणाऱ्या आणि पुलाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा ..ठाकरे गटाची मागणी..
"पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे..भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं ..सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत ..मनसे नेते राजू पाटील यांची टीका.
पलावा पुलावर चार तारखेला एकही अपघात नाही ,विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार - शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Anchor :- चार तारखेला उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे ठाकरे गट आमने-सामने उभे ठाकलेत.ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपक म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत या अर्धवट पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांसह पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर संतोष मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केलीये .तर मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका करताना ,"पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे..भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं ..सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत..या पुलावर लोकांचे बळी जातील त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून मगच पूल सूरु करावा अशी मागणी केली .
तर याबाबत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुलावर डांबर आणि ऑइल असल्याने बाईक स्लिप होत होत्या त्यामुळे स्टोन क्रेशर टाकला. या स्टोन क्रेशरचे फोटो टाकून विरोधक टीका करतात चार तारखेपासून आपण सुरू झालं पाच तारखेपासून आत्तापर्यंत एकही अपघात झालेला नाही . विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार असा टोला विरोधकांना लगावलाय .
Vo.. अनेक महिन्यांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला .मात्र पुलावरील रस्त्याच्या काही भाग गुळगुळीत असल्याने दोन दुचाकीस्वार पडून अपघात झाला त्यानंतर काही क्षणात पुन्हा पूल बंद करत युद्धपातळीवर या पुलावरील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले .तासाभराने पुन्हा पूल सूरु करण्यात आला .मात्र त्यानंतर पुलावरील रस्त्याची केलेली तात्पुरती डागडुजी टीकेचा विषय ठरली आहे .या पुलावर दुचाकीस्वाराना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .याबाबत ठाकरे गटासह आक्रमक मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय .
या पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली त्यामुळे अनेक अपघात होत आहेत या पुलाचे काम अर्धवट होते ..लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून उदघाटन करा अशी मागणी केली होती ..मात्र आम्ही उदघाटन करू या भीतीने त्यांनी अर्धवट पुलाचे उदघाटन केलं असा टोला नाव न घेता शिवसेना संजय गटाचे आमदार राजेश मोरे यांना टोला लगावला..पोलीस उपयुक्त यांना निवेदन दिले ज्यांनी या अर्धवट पुलाचे उद्घाटन केलं ज्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केलं त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे तर डीसीपी झेंडे यांनी याप्रकरणी सकल चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे देखील म्हात्रे यांनी सांगितले
Byte :- दिपेश म्हात्रे ( जिल्हा प्रमुख ठाकरे गट )
wkt... आतिश भोईर
डोंबिवली
पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे.. सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत-मनसे नेते राजू पाटील यांची सत्ताधार्यांवर टीका
घाई घाईत या फुलाचा लोकार्पण केलं त्यानंतर बाईच्या अपघात झाले फुल पुन्हा बंद केला.ग्रीट पावडर टाकून पूल पुन्हा सुरू केलाय .मात्र फुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे . सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाही कारण ते खाल्ल्या मिठाला जागतायत . दीडशे कोटींचा फुल सात आठशे कोटी पर्यंत पैसे खाण्यासाठी नेलाय . ऊन चालू करताना आमच्यावर टीका केली त्याप्रमाणे फुल तरी करायचा ना त्यांनी काहीही करायचं ते सहन करण्यात आला मी नाही त्यांचे मित्र पक्ष सहन करत असतील मनसे सहन करणार नाही . या पुलाचे साधे गार्डन लॉन्च केले तेव्हा फटाके वाजवले मात्र या पुलाचं लोकर पण करताना त्यांना भीती होती.. या पुलावर लोकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही करत आहोत या पुलाबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा लाच लुचपत विभागाकडे तक्रार करा ,पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देतील मात्र त्याला काही अर्थ नाही ..अत्यंत मोठ्या प्रमाणात एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे ,ठेकेदाराचे आणि त्याच्या इतर सेल कंपन्या त्यांची चौकशी करण्यात यावी तेव्हा इथलं काळं लबोर बाहेर येईल
Byte :-राजू पाटील( मनसे नेते माजी आमदार )
तर याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी चार तारखेला पूल लोकांसाठी खुला करण्यात आला होता . त्यानंतर काही अवधीत काही दुचाकी स्लिप झाल्या त्यानंतर हा रस्ता पुन्हा तासाभराकरता बंद करण्यात आला .डांबर आणि ऑइल असल्याने दुचाकी स्लिप झाल्या होत्या त्यामुळे पुन्हा दुरुस्ती करून स्टोन केशर वापरत तासाभराने हा रस्ता खुला करण्यात आला .मात्र काही विरोधकांनी टाकण्यात आलेल्या स्टोन केशरचे फोटो टाकून टीका करण्यात आली मात्र पुलावर कोणताही खड्डा नाही ,चांगला पूल झालाय ..चार तारखेपासून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही
चांगलं काम देणारं महायुतिचे सरकार आहे ,विरोधकांनी काय बोलायचं हे त्यांनी ठरवावं आम्ही विकासाच्या माध्यमातून टिकेला उत्तर देणार ,पत्रिपुल ,मानकोली पुलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जाणार ,लोकांना आमही काय देऊ शकतो याकडे आमचं लक्ष आहे असा टोला विरोधकांना लगावला.
Byte :- राजेश मोरे ( आमदार कल्याण ग्रामीन )
byte.. राजू पाटील
मनसे नेते.
byte.. दीपेश म्हात्रे
जिल्हा प्रमुख ठाकरे गट
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement