Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरमध्ये कामगारांचा रास्ता रोको: सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवा!

HPHARSHAD PATIL
Jul 09, 2025 09:03:57
Palghar, Maharashtra
पालघर - कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या , सर्व कामगारांना 26 हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा , शेतकऱ्यांना 12 तास अखंडित विज पूरवठा द्या , विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा , मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था यासह विविध मागण्यांसाठी सीपीएमच्या नेतृत्वाखाली पालघर मध्ये आज रास्ता रोको करण्यात आला . दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली रोखून धरला होता . यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक साधारणतः तासभर ठप्प झाली असून दोन्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याच पाहायला मिळालं . सरकार दडपशाही पद्धतीने कायदे आणत असून सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आला . या रास्ता रोकोत सीपीएम सह आशा वर्कर आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देखील सहभाग दर्शवण्यात आला . बाईट - विनोद निकोले - डहाणू आमदार सीपीएम .
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top