Back
सोनापूर शाळेसाठी 6 लाखांची मदत, झी 24 तासचा प्रभाव!
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 08:36:48
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0907ZT_CHP_SCHOOL_ISSUE1
( single file sent on 2C)
टायटल:-- झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, मे महिन्यात वादळाने छप्पर उडून गेल्यानंतर पावसाळी दिवसात खुल्या रंगमंचात शिक्षण घेणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूरच्या शाळेसाठी जिल्हा परिषदेने मंजूर केले सहा लाख रुपये, याशिवाय गावातील सरपंच भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात वर्ग खोल्यांची केली व्यवस्था, सोनापूरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेची दुरावस्था झी 24 तासने पुढे आल्यानंतर शिक्षण विभागाने उचलली पावले
अँकर:-- झी 24 तासवर बातमी म्हणजे परिणामाची हमी. सोनापूरच्या शाळेला आता छप्पर मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द परिसरातील सोनापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर मे महिन्यात वादळाने उडून गेले होते. शाळा सुरू झाल्यानंतर पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पावसाळी दिवसात त्यांना खुल्या रंगमंचात शिक्षण घ्यावे लागत होते. यासंबंधीची बातमी झी 24 तास ने लावून धरल्यावर चंद्रपूर ते मुंबई खळबळ उडाली होती. जि. प. शिक्षण विभागाने खडबडून जागे होत सोनापूर जि. प. मराठी शाळेसाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान या दोन वर्ग खोल्या गावातील सरपंच भवन येथे स्थानांतरित करण्यात येत असून एक महिन्याच्या कालावधीत छप्पर तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सोनापूर येथील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
बाईट १) अश्विनी सोनवणे-केळकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
15
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 14:35:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_SCHOOL_HOLIDAY
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर, तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उद्या देण्यात आली सुट्टी
अँकर:-- भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून प्राप्त माहितीनुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीपात्रामध्ये पूरनियंत्रणासाठी 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून, ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना दिनांक 10 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश फक्त ब्रह्मपुरी तालुक्यात लागू राहील. जिल्ह्यातील अन्य तहसीलांतील शाळा व शिक्षणसंस्था सुरू राहतील. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पार पाडावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
बाईट १) सतीश मसाल, तहसीलदार, ब्रम्हपुरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 09, 2025 14:35:02Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0907ZT_DAUNDCRIME
BYTE 1
दौंडमध्ये वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करून 1लाख 88 हजाराचा ऐवज लंपास..
Anchor:—दौंड तालुक्यातील देऊळगावराजे गावात रात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करत तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 75 वर्षीय पोपट अप्पासाहेब अवचर आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचे मंगळसूत्र गंठण, कर्णफुले,चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर घरातील पेटीतील दागिन्यांवरही हात साफ केला. मात्र आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बाईट:पोपट अवचर
8
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 09, 2025 14:34:52Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn university issue avb
feed attached
विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न...
औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या...
मुलाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने वाचला जीव, मात्र अजूनही ठाकरे शुद्धीत नाही...
संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुल सचिव पदावर ठाकरे या कार्यरत..
काही दिवसापूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर ठाकरे यांनी गंभीर आरोप केला होता.
त्यांच्या खोलीत आढळली सुसाईड नोट, सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव...
बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता
*सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे...*
मला संसार करताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास ऑफिसमध्ये होत आहे. ऑफिसमधील अधिकारी मुद्दामहून मला त्रास देत आहे. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे माझी जगण्याची इच्छा संपली आहे. कुलगुरू विजय फुलारी आणि प्राध्यापक प्रशांत अमृतकर दोघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास देत आहे. आई मला सांगायची कितीही त्रास झाला तर सहन करायचं. तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ऑफिसचे साहित्य चोर म्हणून माझ्यावर पोलीस ठाण्यात केस केली. ते माझ्या मनाला खूप लागला आहे आई... माझ्यावर घेतलेला हा आळा घेऊन पुढे मी जगू शकणार नाही. ऑफिसमध्ये मी खूप प्रामाणिकपणे काम केलं मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जोडीदाराशिवाय मी एकट जीवन जगत आहे, हे ऑफिसमधल्या लोकांना माहीत होतं. वरच्या अधिकाऱ्यांकडे मी या दोघांविरोधात तक्रारी केल्या होत्या. पण फुलारी यांचे पोलीस दलात मोठ्या पदावर नातेवाईक नोकरीला आहे. त्यांचे सगळ्या ऑफिसमध्ये आणि मंत्रालयात मित्र व नातेवाईक आहे. ते मला कधीच मदत करणार नाही. प्रशांत अमृतकरचे पण आहेत. त्यामुळे त्यांचे कुणीही काहीही करू शकत नाही. माझ्या तक्रारीची दखल ना पोलिसांनी घेतली, ना विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यांनी घेतली. यापुढे मला ते खूप त्रास द्यायला सुरुवात करतील. मग आता जगून काय करू, यांना देव कधीच माफ करणार नाही. ते मला नोटीस यासाठी देतात की मी विद्यापीठ सोडावा किंवा जीव, अशी परिस्थिती निर्माण करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे....
6
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 09, 2025 14:32:01Pandharpur, Maharashtra:
09072025
slug - PPR_COLLECTOR_WORKER
feed on 2c
file 03
------
Anchor - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची स्वच्छता कामगारांविषयी कृतज्ञता, त्यांच्या घरी जाऊन मानले आभार
आषाढी वारीमध्ये स्वच्छता हा प्रमुख मुद्दा असतो. पंढरपूर शहरात मेहतर समाजाचे सफाई कामगार वर्षानुवर्ष हे काम एक सेवा म्हणून करत आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या सफाई कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या या कामा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या घरी चहा नाश्ता घेतला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या या साधेपणाच्या माणुसकीचे कौतुक होतं आहे.
2
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 09, 2025 14:30:53Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबईत उडता पंजाब
navi mumbai drugs action
FTP slug - nm drugs story
byet- acp
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून नवी मुंबईतील बेलापूर मधील एका लॉज वरून धाड टाकून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे 40 ग्राम वजनाचे हेरॉईन ड्रग्स आढळून आले. दोघानाही पोलिसांनी अटक करून कसून चौकशीत आणखी सात आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडेही 80 ग्रााम हेरॉईन ड्रग्स सापडले,असे एकूण 45 लाख किमतीचे 120 ग्राम हेरॉईन ड्रग्स सापडले.या कारवाईत एकूण 9 आरोपी अटक केले असून नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी थेट पंजाब मधून आणलेले ड्रग्स पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले.तर याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले....
बाईट - अशोक राजपूत
सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल
2
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 09, 2025 14:30:34Kolhapur, Maharashtra:
Kop Bendur
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे गावात महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त सदृढ बैल जोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या 21 वर्षापासून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसर्गे गावातील बाळेश नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सदृढ बैल जोडी स्पर्धेत पंचक्रोशीतील ४० हून आधीक स्पर्धकाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बळीराजांने बैलांना रंगीबेरंगी हार घालून फुलांनी सजविले होते. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूरच्या निमित्ताने या स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धेतील विजेत्याना राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचे बक्षीस देवून गौरवण्यात आले..
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 09, 2025 13:36:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0907ZT_JALNA_CRIME(3 FILES)
जालना : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अँकर : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे.संभाजी जऱ्हाड आणि विशाल धोंगडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.यातील संभाजी जऱ्हाड याने त्याचा मित्र विशाल धोंगडे याच्याकडील तलवार आणून व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करून दहशत पसरवली.त्यामुळे पोलिसांनी दोन्हीही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तलवार जप्त केली आहे.तसेच तालुका पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
बाईट : पंकज जाधव,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,जालना
11
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 09, 2025 13:08:18Buldhana, Maharashtra:
बुलढाणा पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; दिसला त्याला चावला ; जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी; 14 जणांना घेतला चावा.
Anchor- बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आज दिवसभरापासून चांगलाच हैदोस घातला आहे.. शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षागार जयस्तंभ चौक हिरवे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल 14 जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे..जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासून एकापाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले यामध्ये लहान बालके युवक व महिलांचाही समावेश आहे.. हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते.. सर्वांना चावणारा कुत्रा एकच असल्याने या कुत्र्याला स्थानिकांनी युवकांनी मारून टाकल्याचेही सांगण्यात आले आहे.. तर जखमी असलेल्या 14 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे..
बाईट-डॉ. भागवत भुसारी,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक..
13
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 13:08:10Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात तरुणाने दुकानातील मोबाईल आपटून फोडले
ईएमआयवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Ulh mobile
Anchor : उल्हासनगरात एका तरुणाने मोबाईलच्या दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले मोबाईल आपटून फोडल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागातील एका मोबाईलच्या दुकानात ७ जुलै रोजी हा प्रकार घडला. या दुकानात अतुल नावाचा एक तरुण मोबाईल घेण्यासाठी आला आणि त्याने ईएमआयवर मोबाईल मागितला. मात्र दुकानदाराने आमच्याकडे ईएमआय वर मोबाईल मिळत नाही, असं त्याला सांगताच त्याला राग आला. याच रागातून त्याने दुकानदाराला शिवीगाळ करत काउंटरमध्ये ठेवलेले २ मोबाईल आपटून फोडले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
13
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 09, 2025 12:37:44Kalyan, Maharashtra:
मराठी आणि हिंदीचा वाद सुरू असतानाच कल्याण मध्ये शेकडो उत्तर भारतीयांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
काँग्रेस पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मराठी-हिंदी भाषेच्या संघर्षाचा वाद अजूनही तापलेला असतानाच, कल्याणमधील ‘उत्तर भारतीय जंबो भरती’मुळे शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ही भरती केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर भारतीय मतदारांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Byte :- विश्वनाथ भोईर (. शिवसेना शिंदे गट कल्याण पश्चिम आमदार )
13
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 09, 2025 12:32:36Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_MSMRA
साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली यामध्ये संघटना समन्वय समिती च्या वतीने कामगार हक्कासाठी याबरोबरच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय प्रतिनिधींना वैधानिक संरक्षण मासिक योग्य वेतन मिळावे. यासह अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपंचायत आणि कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...
बाईट: युवराज गोडसे
13
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:32:27Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकींग
SLUG- 0907_WARDHA_DEADBODY
- वर्ध्यात शेतकऱ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू
- वर्ध्याच्या भुगाव येथील घटना
- संतापलेल्या नागरिकांनी नेला महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनासमोर शेतकऱ्याचा मृतदेह
- वर्ध्यात शेतकऱ्याला शेतात विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू
- शेतकऱ्यांचा मृतदेह आणला महावितरण कार्यालयात
- वर्ध्याच्या भुगाव येथील धक्कादायक घटना
- प्रदीप उगेमुगे असं मृतक शेतकऱ्यांचे नाव
- तब्बल 2 तासापासून मृतदेह महावितरण च्या कार्यालयात, न्यायाची मागणी
- दुपारच्या वेळेस शेतामध्ये गेले असता विद्युत प्रवाहाचा झटका लागून झालं होता मृत्यू
- महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
- घटणेने वर्ध्याच्या महावितरण कार्यालयात तणाव
- पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
बाईट- मिलिंद भेंडे,गावकरी
12
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 12:11:52Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_ROAD_ISSUE
FILE - 9 VIDEO
भंडारा ब्रेकिंग
पहिल्याच पावसात वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलाची पिचिंग गेली वाहून..... 735 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला नवीन बायपास रोड.... पावसानी केली पोलखोल.... भविष्यात रस्ता खचण्याची शक्यता....
Anchor :- भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून भंडारा शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग 53 नवा बायपास रस्ता तयार करण्यात आलं... मात्र गेल्या तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते. तर याच पावसामुळे भंडारा जिल्ह्यातून जाणारा नवीन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले असून अगदी चार दिवसाआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या उद्घाटनापूर्वीसुद्धा आलेल्या पावसामुळे एका बाजूचे मुरूम माती व काँक्रीट सह पिचिंग वाहून गेल्याने या बायपासचा निकृष्ट दर्जासमोर आला होता. मात्र तरीसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण पार पडला. आता जेमतेम पावसाळ्याची सुरुवात असताना 735 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाचे असे हाल पाहायला मिळत आहेत. पुढे किती वर्ष हा बायपास टिकेल ?? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाची सखोल चौकशी करून स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे... तर पुलावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.....
WKT - प्रविण तांडेकर....
13
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:07:11Wardha, Maharashtra:
वर्धा अपडेट
SLUG- 0907_WARDHA_STUCK_UPR1
- वर्ध्याच्या चानकी गावात अडकलेल्या 4 मजुरांना सुरक्षित काढले बाहेर
13
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:07:03Wardha, Maharashtra:
वर्धा अपडेट
SLUG- 0907_WARDHA_STUCK_UPDATE
- वर्ध्याच्या चानकी गावात अडकलेल्या 4 मजुरांना सुरक्षित काढले बाहेर
अँकर - वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर आला आणि येथे देवळी हिंगणघाट या दोन तालुक्याच्या सीमेवर यशोदा नदी पात्रालगत असलेल्या चानकी या गावाजवळ चार बांधकाम मजूर पुराच्या दुसऱ्या बाजूला अडकले होते..रात्रीपासून हे मजूर दुसऱ्या बाजूला होते.. स्वतः जिल्हाधिकारी वान्मथी सी. चानकी गावात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिले व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या चारही मजुरांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. चारही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेय..
14
Share
Report