Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

भुलेश्वर घाटात आढळला अर्धवट जळलेला मृतदेह, खळबळ उडाली!

JAVED MULANI
Jul 04, 2025 16:34:09
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 0407ZT_DAUNDBODY FILE 1 भुलेश्वर घाटात आढळला अर्धवट जळलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह....उडाली एकच खळबळ.... मृत व्यक्तीच्या डोक्यात छातीवर आणि पाठीवर अन धारदार शास्त्राचे वार..... (*आवश्यकतेप्रमाणे बॉडी ब्लर करावी*) Anchor_ दौंड तालुक्याच्या भुलेश्वर घाटात अर्धवट जळलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २७ जून रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत भुलेश्वर घाट परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. या मृत इसमाच्या डोक्यावर, छातीवर व पाठीवर धारदार आणि तीव्र हत्याराने वार झाल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा पुरुषाचा हा मृतदेह असून यवत-भुलेश्वर रोडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर, शेरू रिसॉर्टकडे जाणार-या कच्च्या रस्त्याजवळ हा मृतदेह आढळून आला, याची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या मृत व्यक्तीच्या डोक्यावर छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत याशिवाय हा मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement