Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

बदलापूर गोळीबार: जगदीश कुडेकरवर जखमी अल्ताफ शेखचा गंभीर आरोप!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 04, 2025 17:32:20
Ambernath, Maharashtra
बदलापूरच्या गोळीबारात शिवसेनेच्या जगदीश कुडेकरांचं नाव! जगदीश कुडेकरने कट रचला - जखमी अल्ताफ शेखचा आरोप पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याचाही आरोप Bdl firing update Anchor : बदलापुरातील गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून या गोळीबारामागे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जगदीश कुडेकर यांचा हात असल्याचा आरोप जखमी अल्ताफ शेखने केलाय. तसंच जगदीश कुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून देण्याची मागणी अल्ताफने केली आहे. Vo : गोळीबार होण्यापूर्वी शनिवार आणि मंगळवारी दोन वेळा माझं दुकान जाळण्यात आलं होतं. यानंतर जगदीश कुडेकरने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही, आणि अखेर माझ्यावर जगदीश कुडेकरच्या माणसांनी गोळीबार केला, असा आरोप अल्ताफ शेखने केला आहे. याप्रकरणी जगदीश कुडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अल्ताफ शेखने केली आहे. याबाबत जगदीश कुडेकर यांनी मात्र अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Byte : अल्ताफ शेख, जखमी चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement