Back
वर्ध्यात सापांची तस्करी: चौघांना अटक, 13 विषारी साप जप्त!
Wardha, Maharashtra
*वर्धा*
SLUG- 0407_WARDHA_SMUGGING
- विषारी सापांची परदेशात तस्करी?
- तब्बल विविध प्रजातीचे तेरा साप वनविभागाने केले जप्त
- 13 साप बाळगणा-या चौघांना बेड्या
- वनविभागाची कारवाई
- अजगर, कोबरा, तस्कर, धामण, कवड्या अश्या विविध प्रजातीच्या सापाचा सामावेश
- चौकशीतून सत्य येणार समोर
अँकर - वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आजसरा येथे वनविभागाने तब्बल तेरा विविध प्रजातीचे साप बाळगणाऱ्या चौघाना अटक केलीय. अटक केलेले आरोपी हे विविध जिल्ह्यातील रहिवासी आहे.आरोपीकडून वनविभागाने जप्त केलेल्या सापांमध्ये अजगर, कोबरा, तस्कर, धामण, कवड्या अश्या विविध प्रजातीच्या सापाचा सामावेश आहे.परदेशात अजगर, कोब्रा यासारख्या विविध सापांची मोठी मागणी आहे. यामुळे हे सापांची परदेशात तस्करी करणारे रॅकेट तर नाहीय या दृष्टीनेही वनविभागाचा तपास सुरु आहे.
व्हिओ - हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे काही तरुणांकडे मोठ्या संख्येने साप असल्याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांना मिळाली. त्यानंतर उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांनी कर्मचाऱ्यांसहा आजनसरा गाठले. वनविभागाच्या चमूने संकेत लखपती पाठक (वय 25) रा. लावा, जिल्हा - नागपूर, शशिकांत रमेश बागडे (वय 35) रा. सुयोटोला, जिल्हा- गोंदिया, रुपेश दिलीप गुप्ता (वय 29) रा. कोहळे ले-आऊट, जिल्हा - नागपूर, स्वप्नील गजानन काळे (वय 30) रा. वाडी, जिल्हा - नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी वनविभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी केल्यावर मोठ्या संख्येने विषारी व बिनविषारी साप आढळले. या चारही व्यक्तींकडून वनविभागाच्या अधिका-यांनी 3 कोबरा, 2 तस्कर, 3 धामण, 2 अजगर, 1 कुकरी, 1 पानदीवड, कवड्या प्रजातीचा 1 असे एकूण 13 साप व कार, साप पकडण्याची स्टीक, 25 किलो तांदुळ असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वनविभागाने चारही आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
व्हिओ - बाहेर देशांमध्ये सापांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अजगर, कोब्रा यांना बाहेर देशात मोठी मागणी आहे. शक्यता आहे की यांची परदेशात तस्करी होत असेल.त्या दृष्टीने सुद्धा तपास केले जातं आहे. जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या भागातले आहे. वर्धा जिल्ह्यातील साप पकडत त्याच बाहेर प्रदर्शन करत होते की काय.नेमकं काय प्रकार आहे याचा पूर्ण तपास सुरू आहे. चौकशीतून सत्य पुढे येईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement