Back
शिरूरमध्ये डाळिंब चोरी: एक लाख 40 हजार रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश!
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 16, 2025 02:01:33
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Shirur Motewadi Dalimb Theft Open
File:03
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथे शेतकऱ्यांच्या शेतातून डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मस्क्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून चोरट्यांनी संदीप येलभर या शेतकऱ्यांच्या शेतातून एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या डाळिंबाची चोरी केली होती या प्रकरणी शिरूर पोलिसांनी कसून तपास करत आकाश काळे या आरोपीला अटक केलीय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 12:08:26Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_GAD_STUDENT_CANCER
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याने व्यक्त होत आहे चिंता, 309 विद्यार्थ्यांना तपासणीत पूर्व मुख कर्करोग निदान झाल्याची आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांची विधान परिषदेत माहिती, आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळातील विद्यार्थ्यांची एका अभियानात करविली होती तपासणी
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक आकडेवारी पुढे आली आहे. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी या संदर्भात विधान परिषदेत हा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी 2022 -23 ते 2024- 25 यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील आरोग्य तपासणीचे आकडेच पुढे ठेवले.
गडचिरोली आदिवासी उपविभागात 769 पैकी 304
भामरागड उपविभागात 1778 पैकी 487 तर
अहेरी उपविभागात 2163 पैकी 189 विद्यार्थी व्यसनाधीन आढळले
यापैकी एकूण 309 विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोग निदान झाले आहे. या सर्वांवर विभागाच्या वतीने उपचार करण्यात येत असून सर्वच आदिवासी आश्रम शाळांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे डॉ. उईके म्हणाले.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 16, 2025 11:38:080
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 16, 2025 11:37:42Pune, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Fired
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc: पुणे शहरालगत असलेल्या वाघोली येथे भंगार गोडावून ला भीषण आग लागली असून आगीत गोडावून पूर्णपणे जळून खाक झालंय, आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असून परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे.,.
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 11:35:23Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_CHP_VILLAGE_PKG_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या जिवती तालुक्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग झाला प्रशस्त, महाराष्ट्र- तेलंगणा या दोन राज्यांमध्ये या चौदा गावांच्या समावेशावरून होता वाद, मात्र सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागल्यानंतरही या गावातील नागरिकांना मिळत नव्हती जमीन विषयक कागदपत्रे, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आता प्रत्यक्ष कारवाईला होणार सुरुवात
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या जिवती तालुक्यातील 14 गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचा हक्काचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त झालाय. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे.
व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावामध्ये नागरिकांना महसूल अभिलेख पुरावे मिळण्यासाठी चा मार्ग प्रशस्त झाला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये या चौदा गावांबाबत वाद होता. मात्र यासंबंधी 28/08/ 1997 रोजी निर्णय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या बाजूने लागला. असे असले तरी महाराष्ट्र सरकारने या गावांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांना महसूल अभिलेख पुरावे दिले नाहीत.
त्यामुळे
परमडोली, मुकादम गुडा ,कोठा, महाराज गुडा, अंतापुर, येसापूर, लेंडीगुडा ,पळसगुडा, परमडोली -तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोला पठार
या 14 गावातील नागरिकांची महसुली दर्जा नसल्याने मोठी अडचण होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमाभागातील गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे आणि जिवती तालुक्यातील १४ गावातील ग्रामस्थ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वन जमिनींचे पट्टे देण्याचा निर्णयही महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून वनजमिनींवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत.
बाईट १) देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा
व्ही. ओ. २) दरम्यान गेली काही वर्षे 14 गावातील नागरिकांना महाराष्ट्र आणि तेलंगणा अशा दोन्ही राज्यांचे रेशन कार्ड ,आधार कार्ड ,दुहेरी सोयीसुविधा मिळत होत्या मात्र या गावांना महाराष्ट्रातील सोयी सुविधांसह जमीन पट्टे हवे असल्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. हा प्रश्न आता राज्य सरकार मार्गी लावत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे
बाईट २), ३) स्थानिक नागरिक, जीवती
व्ही. ओ. ३) या 14 गावांमधील भौगोलिक स्थिती बघता तेलंगणा राज्यातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने ही गावे सोयीची होती. मात्र तरीही बहुतांश मराठी भाषिक नागरिकांचे वास्तव्य असल्याने या नागरिकांनी चिकाटीचा संघर्ष चालविला होता. महाराष्ट्र सरकारने उशिरा का होईना त्यांच्या या पाठपुराव्याला प्रतिसाद दिलाय. प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होते याकडे मात्र त्यांचे लक्ष लागले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 16, 2025 11:02:54Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1607ZT_WSM_SAMBHAJI_BRIGADE_RASTA_ROKO
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेक, धक्का बुक्की आणि प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरातील पाटणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी,शिवसेना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
बाईट: गजानन भोयर,विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 16, 2025 11:01:47Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_rada
सातारा- साताऱ्यातील पोवई नाका परिसरात दोन टोळक्यांत हाणामारी झाली आहे. ही मारामारी महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत झाली असून, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
1
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 16, 2025 10:32:49Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1607ZT_MAVAL_TOLL_ISSUE
Total files : 05
Headline : मावळ मधील सोमाटने टोल नाक्याचा प्रश्न पुन्हा तापणार
टोल नाका बंद न केल्यास तळेगावकर नागरिक पुन्हा उतरणार रस्त्यावर
Anchor :
तळेगाव दाभाडे येथील सोमाटने टोल नाका अनेक वर्षांपासून बेकायदेशीर रित्या चालवला जात आहे. हा अनधिकृत टोल नाका बंद करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा मावळ मधील स्थानिक नागरिक एकत्रित होत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनामध्ये हा टोल नाका बेकायदेशीर असल्याने याच्यावरती कारवाई करण्यात यावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. तसेच स्वर्गीय किशोर आवारे यांनी हा टोल नाका बंद व्हावा म्हणून बेमुदत उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा टोल नाका बंद करण्यासंदर्भात सूचना केलेल्या होत्या. परंतु अद्याप पर्यंत हा टोलनाका बंद करण्यात आलेला नसल्याने टोल प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा टोल नाका बंद करून नागरिकांना टोल मधून व वाहतूक कोंडीतून सुटका करावी अन्यथा 22 जुलै पासून मावळ मधील स्थानिक नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
बाईट : अरुण माने, स्थानिक नागरिक (file no.04)
बाईट : सचिन भांडवलकर, स्थानिक नागरिक (file no.05)
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 16, 2025 10:31:17Virar, Maharashtra:
Date-16july2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR PROTEST
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मध्ये ओला उबेर चालकांचे अचानक आंदोलन
भाडे वाढीसाठी गाड्या अडवून आंदोलन
अँकर - वसई विरार शहरात ओला उबेर च्या चालकांकडून भाडे वाढीसाठी आंदोलन केले ... आज दुपारी विरार पूर्वेच्या साईनाथ सर्कल जवळ गाड्या अडवून आंदोलनाला सुरुवात केली..रस्त्यावरून जाणाऱ्या ओला उबेर च्या गाड्या अडवून भाडे रद्द करण्याची मागणी केली..चालकांनी भर रस्त्यात गाड्या अडवल्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती...
3
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 16, 2025 10:16:10Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यातील पाथरी सेलू रोडवरच्या देवनांद्रा परिसरातील धावत्या ट्रॅव्हल बसमधून नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतर चालत्या ट्रॅव्हलमधूनच त्या नवजात बाळाला फेकून दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय, हा अमानूष प्रकार पती-पत्नीच्या स्वरुपात कथित असलेल्या जोडप्याने केल्याचे उघड झालंय, पोलीस या प्रकरणात कसून तपस करीत आहेत,
व्हीओ- परभणीच्या पाथरी सेलू रस्त्यावर मंगळवारी सकाळी संतप्रयाग ही ट्रॅव्हल पुणे येथून सेलूमार्गे परभणीकडे जात होती. पाथरीपासून दोन किमीवर देवनांद्रा शिवारात कॅनाललगत या बसमधून बाळ रस्त्यावर फेकून दिल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आली, या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाथरी पोलिसांनी या विषयाला गंभीर्याने घेत पोलिस यंत्रणा अलर्ट केली आणि दोन तासांच्या आत ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना परभणीतून ताब्यात घेतले.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे जोडपे पती पत्नी असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. हे दाम्पत्यांने आंतरजातीय विवाह केला असून ते दीड वर्षांपासून पुणे येथील चाकण परिसरात राहात होते अशी माहिती आहे. पुरुष जातीचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात आलंय, शिवाय हे बाळ मयत जन्माला आले म्हणून घाबरून आपण हे बाळ फेकून दिल्याचे पोलिसांना या दाम्पत्याने सांगितले,
महिला 3 तासापूर्वी बाळंत झाल्याने तिला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन पाथरी पोलिस ठाण्यात हजर केलाय. याप्रकरणी हवालदार अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून ऋतिका मिलिंद ढेरे (रा. राहुलनगर, परभणी) आणि अल्ताफ मेहनुदिन शेख (रा. परभणी) या दोन आरोपींविरूद्ध अर्भकाचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने चालत्या ट्रॅव्हलमधून फेकून देऊन गुप्त विल्हेवाट लावली म्हणून संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार गुन्हा आला.
बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- या प्रकारामुळे नात्याला काळिमा फासण्यात आलाय,याबाबत पोलीस सविस्तर टॉअस करीत असून निकम बाळ बस मध्ये झालं होतं की अगोदर झालं होतं,हे दोघे खरोखरच पती पत्नी आहेत का याबाबत माहिती पुढे येणार आहे.
गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
2
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 16, 2025 10:12:10Raigad, Maharashtra:
स्लग - नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल ...... लाडक्या बहिणींचे संसार उद्धवस्त करू नका ..... देसाई यांची सरकारला विनंती ..... 1972 पासून बंद परवाने आताच कशाला ? ......
अँकर - राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय त्याचं स्वागत आहे पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही. एखाद्या महिन्यात पैसे नाही दिलेत तरी बहिणी रागावणार नाहीत पण त्यांचे संसार उद्धवस्त करू नका अशी विनंती त्यांनी केलीय. 1972 नंतर मद्य विक्री परवाने दिलेले नाहीत मग आताच का देताय असा सवाल तृप्ती देसाई यांनी सरकारला केलाय.
बाईट - तृप्ती देसाई , भूमाता ब्रिगेड
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 16, 2025 10:08:37Pandharpur, Maharashtra:
16072025
Slug - PPR_SAWANT_CRIME
feed on 2c
file 02
----
Anchor - मंगळवेढ्यात कडब्याच्या गंजीत जळालेला मृतदेह मनोरुग्ण महिलेचा असल्याचे आले समोर, दीर भावजयीने आपले प्रेम प्रकरण लपवण्यासाठी दिला मनोरुग्ण महिलेचा बळी
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत यांचे प्रेम होते. दोघांना एकत्र संसार करायचा होता. त्यासाठी किरण मृत झाली असा बनाव रचण्यासाठी तिचा प्रियकर निशांत याने एक मनोरुग्ण महिलेला हेरले. तुमच्या मुलाची भेट घालून देतो असे सांगून तिला पाठखळ येथे आणून जीवे मारले यानंतर त्याच मनोरुग्ण महिलेचा मृतदेह जाळून किरणने आत्महत्या केल्याचं भासवले. मात्र पोलिसांनी किराणचे फोन वरून कोणाला शेवटचा संपर्क झाला हे शोधले असता निशांतचे नाव समोर आले. यामुळे किरण जिवंत असल्याचे समोर आले.
कडब्यात जळालेल्या महिले बाबत निशांत कडून पोलिसांनी माहिती काढली असता पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले. यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटखळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटनेदिवशी या कडब्या च्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि कडब्याची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला. रात्री अडीचच्या सुमाराला कडब्याची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विझवायला आले. यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र किरणच्या मोबाईल वरील कॉल मुळे निशांत आणि किरणचे हे धक्कादायक कांड बाहेर आले.
आता सदर मनोरुग्ण महिला कुठली आहे याचा तपास मंगळवेढा पोलिस करत आहेत.
-----
Byte - दत्तात्रय बोरीगीड्डे, पोलिस निरीक्षक मंगळवेढा
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 16, 2025 10:08:08Kalyan, Maharashtra:
कल्याण पूर्व मध्ये मनसेचे अनोखे आंदोलन..
टॉवेल आणि बनियान घालून केडीएमसी ड प्रभाग मध्ये आंदोलन..
Anc..कल्याण पूर्व मध्ये अनेक महिन्यापासून दूषित पाणी येत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या ड प्रभात क्षेत्र कार्यालय मध्ये बनियान आणि टॉवेल घालून अनोखे असे आंदोलन करण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी आमदार निवास मधील कँटीन मध्ये बनियान आणि टॉवेलवर येऊन कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती अशाच वेशभूषेमध्ये मनसेचे कार्यकर्ते येऊन दूषित पाण्याच्या येत असल्याने आंदोलन केले. येणाऱ्या निवडणुकी मध्ये चागल्या प्रतिनिधींना निवडून द्या जेणेकरून स्वच्छ आणि चांगले पाणी मिळावे यासाठी आज मनसेकडून आंदोलन करण्यात आले
बाईट.. योगेश गव्हाणे
मनसे पदाधिकारी
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 16, 2025 10:03:46Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_NIDARSHANE
सातारा - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर संविधानवादी ,मानवतावादी , आंबेडकरवादी ,पुरोगामी संघटना त्याच बरोबर विविध पक्षाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली.या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन देखील करण्यात आले.तब्बल 4 तास ही निदर्शने सुरू होती. या निदर्शनात सातारा जिल्ह्यातील पुरोगामी पक्ष , संघटना , व्यक्ती , कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होते.
बाईट्स - भारत पाटणकर (श्रमिक मुक्ति दल अध्यक्ष)
पार्थ पोळके
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 16, 2025 10:01:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Pkg
Sng_drink_alart
स्लग - सांगलीच्या रॅचोने बनवले ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम..दारूमुळे होणारे अपघात टाळणार !
अँकर - सांगलीतील एका चहा विकणाऱ्याच्या मुलाने "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम" बनवली आहे.दहावीत शिकणारया प्रेम पसारे या विद्यार्थ्याने,हे तंत्र विकसित केले असून यामुळे दारूच्या नशेमुळे होणारे अपघात रोखता येणार असल्याचा दावा प्रेम याने केला आहे,पाहुयात
सांगलीच्या रँचोने बनवलेले जुगाड...
व्ही वो - दारूच्या नशेत गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात अनेकांचे जीव देखील जातात.पण आता दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी सांगलीतल्या एका दहावीतल्या विद्यार्थ्यांनी हायटेक तंत्र विकसित केले आहे.प्रेम नवनाथ पसारे असे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याने
"ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम"बनवली आहे.सेन्सरप्रणाली व मोबाईल ऍप बेस आधारित ही सिस्टीम असून गाडीमध्ये बसवल्यास दारू पिणाऱ्या व्यक्ती स्टेरिंगसमोर बसल्यास, त्याचा अलर्ट कॉल हा संबंधित मोबाईलवर जाणार आहे,जो सांगेल की आपला गाडीचा चालक हा दारू प्यायल आहे.इतकंच नव्हे तर हे तंत्र गाडीचं इंजन देखील बंद करेल,शिवाय गाडीचे लोकेशन संबंधित मोबाईलवर प्राप्त होईल,असा दावा प्रेम याने केला आहे.
बाईट - प्रेम नवनाथ पसारे - विद्यार्थी ,सांगली.
व्ही वो - प्रेम याचे वडील सांगली शहरातल्या मिरज रोडवर चहा विक्रीचा व्यवसाय करतात प्रेम आवडलांसोबत एकदा फिरायला गेल्यावर त्याच्या डोळ्या देखतच दारूच्या नशेत एक अपघात झाल्याची घटना घडली होती आणि यानंतर त्याने हे अपघात कसे रोखता येतात,यावर विचार सुरू केला आणि यातूनच प्रेम याने दीड वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या कल्पक बुद्धीने दारूच्या नशेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम विकसित केली आहे.
बाईट - नवनाथ पसारे - प्रेमचे वडील - सांगली.
व्ही वो - प्रेम याने बनवलेले ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम गाडीत बसवण्यासाठी अवघा पंधरा हजार रुपये इतका खर्च येतो,प्रेम याने ही आपली विकसित केलेली टेक्नॉलॉजीच्या पेटंटसाठी प्रेमाच्या वडिलांनी अर्ज केला आहे.
व्ही वो - सांगलीच्या या प्रेमची ही अनोखी आणि भन्नाट टेक्नॉलॉजी भविष्यात दारू पिऊन होणाऱ्या अपघातांना टाळू शकणार आहे,शिवाय वित्त व जीवित हानी देखील टाळता येईल,असा दावा प्रेम आणि त्याच्या वडिलांचा आहे,त्यामुळे आता प्रेमच्या टेक्नॉलॉजीची दखल वाहन कंपन्या आणि वाहनचालक-मालक घेतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 09:37:58Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_CHP_UBT_ROW_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पक्षाची जिल्हाप्रमुख पदे खा. संजय राऊत यांनी विकल्याचे आज सकाळपासून झळकले होते बॅनर्स, उबाठा शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात नोंदविली तक्रार, दोषींवर कारवाईची केली मागणी, दुसरीकडे उबाठा शिवसेना पक्षातील पदे खरेदी- विक्रीचा घोळ झाल्यानंतर पक्ष सोडलेल्या माजी जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी खा. संजय राऊत यांनीच जिल्ह्यातील शिवसेना विक्री बाजारात आणल्याचा केला आरोप
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील उबाठा शिवसेना पक्षात मोठे वादळ उठले आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे जिल्हा बँकेवर अविरोध निवडून आले. अध्यक्षपद ऑफर झाल्यानंतर त्यांनी थेट भाजपात प्रवेश घेतला. जिल्हाप्रमुख पद मिळवताना त्यांनी उबाठा शिवसेना खा. संजय राऊत यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप झाले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे असा आशय असणारे बॅनर्स आज सकाळपासूनच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात लागले आहेत. दहा ते पंचवीस लाख रुपये एवढा जिल्हाप्रमुख पदाचा दर असल्याचे फलकात सांगण्यात आले असून फशिवसेना असा उल्लेख करण्यात आलाय. खा. संजय राऊत यांचे कार्टूनरुपी चित्र देखील या बॅनरवर आहे. या घटनेनंतर खळबळ उडाल्यावर शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वरोरा पोलीस ठाण्यात हे बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय. दुसरीकडे रवींद्र शिंदे यांना जिल्हाप्रमुख नेमताना अन्याय झालेल्या कट्टर शिवसैनिक मुकेश जीवतोडे यांनी राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला होता.
त्यांनी आज उघडपणे खा. संजय राऊत यांनीच जिल्हाप्रमुख पदे विक्रीच्या बाजारात आणल्याचा पुनरुच्चार केलाय.
बाईट १) प्रशांत कदम, संपर्कप्रमुख, शिवसेना उबाठा
बाईट २) मुकेश जीवतोडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना ( शिंदे)
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report