Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगलीच्या विद्यार्थ्याने बनवली अनोखी 'ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम'!

SMSarfaraj Musa
Jul 16, 2025 10:01:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Pkg Sng_drink_alart स्लग - सांगलीच्या रॅचोने बनवले ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम..दारूमुळे होणारे अपघात टाळणार ! अँकर - सांगलीतील एका चहा विकणाऱ्याच्या मुलाने "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम" बनवली आहे.दहावीत शिकणारया प्रेम पसारे या विद्यार्थ्याने,हे तंत्र विकसित केले असून यामुळे दारूच्या नशेमुळे होणारे अपघात रोखता येणार असल्याचा दावा प्रेम याने केला आहे,पाहुयात सांगलीच्या रँचोने बनवलेले जुगाड... व्ही वो - दारूच्या नशेत गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात अनेकांचे जीव देखील जातात.पण आता दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी सांगलीतल्या एका दहावीतल्या विद्यार्थ्यांनी हायटेक तंत्र विकसित केले आहे.प्रेम नवनाथ पसारे असे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याने "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम"बनवली आहे.सेन्सरप्रणाली व मोबाईल ऍप बेस आधारित ही सिस्टीम असून गाडीमध्ये बसवल्यास दारू पिणाऱ्या व्यक्ती स्टेरिंगसमोर बसल्यास, त्याचा अलर्ट कॉल हा संबंधित मोबाईलवर जाणार आहे,जो सांगेल की आपला गाडीचा चालक हा दारू प्यायल आहे.इतकंच नव्हे तर हे तंत्र गाडीचं इंजन देखील बंद करेल,शिवाय गाडीचे लोकेशन संबंधित मोबाईलवर प्राप्त होईल,असा दावा प्रेम याने केला आहे. बाईट - प्रेम नवनाथ पसारे - विद्यार्थी ,सांगली. व्ही वो - प्रेम याचे वडील सांगली शहरातल्या मिरज रोडवर चहा विक्रीचा व्यवसाय करतात प्रेम आवडलांसोबत एकदा फिरायला गेल्यावर त्याच्या डोळ्या देखतच दारूच्या नशेत एक अपघात झाल्याची घटना घडली होती आणि यानंतर त्याने हे अपघात कसे रोखता येतात,यावर विचार सुरू केला आणि यातूनच प्रेम याने दीड वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या कल्पक बुद्धीने दारूच्या नशेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम विकसित केली आहे. बाईट - नवनाथ पसारे - प्रेमचे वडील - सांगली. व्ही वो - प्रेम याने बनवलेले ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम गाडीत बसवण्यासाठी अवघा पंधरा हजार रुपये इतका खर्च येतो,प्रेम याने ही आपली विकसित केलेली टेक्नॉलॉजीच्या पेटंटसाठी प्रेमाच्या वडिलांनी अर्ज केला आहे. व्ही वो - सांगलीच्या या प्रेमची ही अनोखी आणि भन्नाट टेक्नॉलॉजी भविष्यात दारू पिऊन होणाऱ्या अपघातांना टाळू शकणार आहे,शिवाय वित्त व जीवित हानी देखील टाळता येईल,असा दावा प्रेम आणि त्याच्या वडिलांचा आहे,त्यामुळे आता प्रेमच्या टेक्नॉलॉजीची दखल वाहन कंपन्या आणि वाहनचालक-मालक घेतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top