Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणीमध्ये धावत्या बसमधून नवजात बाळ फेकण्याची अमानवी घटना!

GDGAJANAN DESHMUKH
Jul 16, 2025 10:16:10
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी जिल्ह्यातील पाथरी सेलू रोडवरच्या देवनांद्रा परिसरातील धावत्या ट्रॅव्हल बसमधून नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतर चालत्या ट्रॅव्हलमधूनच त्या नवजात बाळाला फेकून दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय, हा अमानूष प्रकार पती-पत्नीच्या स्वरुपात कथित असलेल्या जोडप्याने केल्याचे उघड झालंय, पोलीस या प्रकरणात कसून तपस करीत आहेत, व्हीओ- परभणीच्या पाथरी सेलू रस्त्यावर मंगळवारी सकाळी संतप्रयाग ही ट्रॅव्हल पुणे येथून सेलूमार्गे परभणीकडे जात होती. पाथरीपासून दोन किमीवर देवनांद्रा शिवारात कॅनाललगत या बसमधून बाळ रस्त्यावर फेकून दिल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आली, या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाथरी पोलिसांनी या विषयाला गंभीर्याने घेत पोलिस यंत्रणा अलर्ट केली आणि दोन तासांच्या आत ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना परभणीतून ताब्यात घेतले. बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी व्हीओ- पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे जोडपे पती पत्नी असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. हे दाम्पत्यांने आंतरजातीय विवाह केला असून ते दीड वर्षांपासून पुणे येथील चाकण परिसरात राहात होते अशी माहिती आहे. पुरुष जातीचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात आलंय, शिवाय हे बाळ मयत जन्माला आले म्हणून घाबरून आपण हे बाळ फेकून दिल्याचे पोलिसांना या दाम्पत्याने सांगितले, महिला 3 तासापूर्वी बाळंत झाल्याने तिला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन पाथरी पोलिस ठाण्यात हजर केलाय. याप्रकरणी हवालदार अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून ऋतिका मिलिंद ढेरे (रा. राहुलनगर, परभणी) आणि अल्ताफ मेहनुदिन शेख (रा. परभणी) या दोन आरोपींविरूद्ध अर्भकाचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने चालत्या ट्रॅव्हलमधून फेकून देऊन गुप्त विल्हेवाट लावली म्हणून संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार गुन्हा आला. बाईट- रवींद्रसिंह परदेशी- पोलीस अधीक्षक, परभणी व्हीओ- या प्रकारामुळे नात्याला काळिमा फासण्यात आलाय,याबाबत पोलीस सविस्तर टॉअस करीत असून निकम बाळ बस मध्ये झालं होतं की अगोदर झालं होतं,हे दोघे खरोखरच पती पत्नी आहेत का याबाबत माहिती पुढे येणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
11
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top