Back
वाशिममध्ये संभाजी ब्रिगेडच्या नेत्यावर हल्ला, आंदोलनात जोरदार घोषणाबाजी!
GMGANESH MOHALE
Jul 16, 2025 11:02:54
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1607ZT_WSM_SAMBHAJI_BRIGADE_RASTA_ROKO
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेक, धक्का बुक्की आणि प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरातील पाटणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी,शिवसेना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
बाईट: गजानन भोयर,विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 02:00:32Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_CSN_BHUYARI_MARG(5 FILES)
छत्रपती संभाजीनगर: शिवाजीनगर भुयारी मार्ग बनला घसरगुंडी
अँकर : छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. सुरुवातीला या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाणी साचलं. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर महानगरपालिकेने हा रस्ता बंद ठेवत त्यावर पत्र्याचे शेड बसवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ त्या ठिकाणी साचली. त्यात पाऊस पडला की पाणी खाली येऊन रस्ते चिखलमय झाले. रहदारी करणारी वाहने हे त्या ठिकाणी घसरू लागले, त्यामुळे हा भुयारी मार्ग आता घसरगुंडी बनला आहे. या ठिकाणी आतापर्यंत ३० दुचाकी घसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली. तसेच शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या स्लॅबला गळती लागल्याने पाणी तुंबत आहे. त्याच बरोबर भुयारी मार्गात चिखल झाला आहे. देवळाई चौकाकडे येण्या-जाण्यासाठी हा मार्ग उताराचा झाला आहे. उतारावरून येणाऱ्या दुचाकी थेट चिखलात घसरून पडत आहेत. परिसरातील नागरिकांनी दुचाकी चालकांना सतर्क केल्याने काही अपघात त्याठिकाणी टाळले.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 02:00:22Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_CSN_ELECTION(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर : भाजपासाठी सोयीच्या असलेल्या प्रभागांमध्ये इच्छुकांची 'भाऊ' गर्दी
अँकर:महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच प्रारूप प्रभाग आराखडे प्रसिद्ध केलेत. डिसेंबरच्या मध्यात निवडणुकीचे फटाके फुटतील, अशी घोषणा दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनी केलीय. त्यामुळे भाजपासाठी सोयीच्या असलेल्या प्रभागांमध्ये इच्छुकांची 'भाऊ' गर्दी होऊ लागलीय.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 02:00:11Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_CSN_METER (1 FILE)
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेला लागणार मीटर, नागरीकांवर पडणार भुर्दंड,प्रकल्प आराखडा तयार करण्याचे महापालिका प्रशासकांचे निर्देश
अँकर : छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन पाणीपुरवठा योजना मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर नागरिकांना 24 तास पाणी मिळणार आहे. मात्र वापरलेल्या पाण्याचे बिल भरावे लागणार आहे. यासाठी प्रत्येक नळ कनेक्शनवर स्मार्ट वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. मात्र, त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मीटरचे दर अद्याप निश्चित करण्यात आले नाहीत. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. डीपीआरमध्ये मीटरचा प्रकार, सॉफ्टवेअर, बिलिंग प्रक्रिया, नियंत्रणासाठी कॉमन कंट्रोल सेंटर यांचा समावेश असेल. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 31, 2025 01:16:37Ratnagiri, Maharashtra:
Anchor - जागतिक वारसा स्थळांची यादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. कोकणातील गणेशोत्सवामध्ये या संदर्भातला देखावा साकारण्यात आलाय. यामध्ये 12 किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला गेलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील मठ गावचे गणेश भक्त संजय जानू बंडबे यांनी आपल्या घरी हा देखावा साकारलाय.
लोकेशन - लांजा, रत्नागिरी
6
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 31, 2025 01:16:23Ratnagiri, Maharashtra:
Anchor - गौरी - गणपती सणाला कोकणात घरगुती सजावट देखील पाहण्यासारखी असते. चलचित्रे आणि विविध संदेश यामधून देण्याचा प्रयत्न केला जातो. रत्नागिरीतील वाडकर कुटुंबीयांनी रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध अशा कालभैरव मंदिराचा देखावा साकारला आहे. यासाठी पूर्णपणे पुट्टा, कागद आणि बांबू यांचा वापर करण्यात आला आहे.
बाईट: आशिष वाडकर, मिरजोळे
5
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 31, 2025 01:16:15Ratnagiri, Maharashtra:
अँकर- गणपती उत्सवात कोकणात विविध समाज्याच्या संस्कृती पहायला मिळतात... गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं... आज कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात आलं... कोकणात महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात... पाणवठ्यावरुन गौरीच्या मुखवट्याची गौरी घरी आणण्याती परंपरा आहे... गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी गुणगुणत आज गौरीचं आगमन घराघरात झालं... गौरी आगमनाबरोबर गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधाना करण्याची परंपरा पहायला मिळते... कोकणात विशेषत ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईच आगमन होत...कोकणात आज गौरी साठी गोड नैवेद्य केला जातो तर उद्या कोकणात सर्वत्र तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो...आज गौराईचे आगमन व् उद्या रात्र भर गौराईचा जागर केला जाणार आहे... गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी ताम्हनात घरी आणल्या जातात... कुणबी समाज्यात या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात... गौरीचा मुखवटा धरुन तो पाणवठ्यावरुन घरापर्यत सुहासीनी घेवून येतात... घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचं धुमधडाक्यात स्वागत होतं. आणि गौरी आगमनानं गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
5
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 31, 2025 01:16:06Ambernath, Maharashtra:
MIDC तील प्रदूषणकारी कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळ!
रासायनिक कंपनीतील सांडपाणी थेट चिखलोली धरणात!
Amb pollution
Anchor : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणात सोडलं जात असून हेच पाणी अंबरनाथकर पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे अंबरनाथकरांचे बळी गेल्यानंतरच झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का? असा संतप्त सवाल विचारला जातोय.
Vo : अंबरनाथच्या जांभिवली वरचा ठाकूरपाडा गावाच्या मागच्या बाजूला चिखलोली धरणाचं उगमस्थान आहे. याच ठिकाणी असलेल्या एका रासायनिक कंपनीने कंपनीच्या मागच्या बाजूने ओढा तयार करत त्यातून कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट चिखली धरणात सोडणं सुरू केलं आहे. या रासायनिक सांडपाण्यामुळे शनिवारी चिखलोली धरणपात्रातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता धरणात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ज्या कंपनीतून हे रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे, त्या कंपनीवर यापूर्वी देखील एकदा कारवाई करून ती बंद करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
Byte : स्थानिक रहिवासी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
5
Report
PNPratap Naik1
FollowAug 30, 2025 17:30:26Kolhapur, Maharashtra:
Kop Ganeshwadi PKG
Feed:- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडीचे पेशवे कालीन मंदिर 20 दगडी खांबावर उभं आहे, 17 व्या शतकात पेशवेकालीन हरीभट्ट पटवर्धन यांनी हे मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचा उल्लेख गणेश कोष ग्रंथात आढळतो, कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराची निर्मिती गाव वसन्याआधी झाली असल्याचं गावकरी सांगतात तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील भाविकांच्यासाठी 'देवाचं गाव' म्हणून देखील गणेशवाडीचा बाप्पा प्रसिद्ध आहेत.
VO 1: - 17 व्या शतकाचा काळ हा पेशवाई राजवट मानला जातो. याच काळात महाराष्ट्रात अनेक गणेश मंदिर पेशव्यांनी उभी केली, 1750 ते 56 या काळात बांधण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या गणेशवाडी गावातील हे मंदिर 1756 साली बांधण्यात आलं आहे. पेशवेकालीन सुभेदार हरिभक्त पटवर्धन हे गणेशभक्त होते, नित्य नियमाने पटवर्धन गणपतीपुळ्याच्या देवाची वारी करायचे, मात्र कोकण सोडून आल्यानंतर ही वारी चुकेल याची चिंता पटवर्धनांना लागली होती, याच दरम्यान गणेशाने दृष्टांत देत कृष्णाकाठी बुरुजाखाली आपलं वास्तव्य असल्याचं स्वप्नात येऊन सांगितल्याची आख्यायिका गणेशवाडीचा इतिहास सांगणाऱ्या 'गणेश कोष' या ग्रंथात आढळते तर गावकऱ्यांनीही गावाची निर्मिती होण्याआधीच या मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगितलं.
Byte :- बळवंत गोरवडे, माजी सरपंच
VO 2 :- कर्नाटक- महाराष्ट्र सीमा परिसरात मिळणारा कुरुंद या जातीच्या दगडांनी अखंड कोरीव काम केलेलं हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे, अडीच दशकांपूर्वी मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख आढळतो. तर मंदिराच्या स्थापनेनंतर 12 बलुतेदारांना सोबत घेत पेशव्यांनी पूर्वीचे गणेशपुर आणि आताची गणेशवाडी स्थापन केल्याचं गावकरी सांगतात. फेब्रुवारी महिन्यातील माघी गणेश जयंतीला मोठा उत्सव गावकरी एकत्र मिळून साजरा करतात तर पेशवेकालीन सुभेदार पटवर्धनांचे वारसदारही या सर्व कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.. जुन्या मंदिराचा गावकऱ्यांनी जिर्णोद्वार केला असून 269 वर्षाच्या या मंदिराचे महत्व ओळखून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लाखो गणेश भक्त दर महिन्याच्या संकष्टीला दर्शनासाठी येतात.
Byte :- स्वप्नील तासगावे, ग्रामस्थ
VO 3 :- मंदिरातील गाभाऱ्यात शाळीग्राम पाषाणात कोरलेली आकर्षक गणेश मूर्ती आहे, सुमारे अडीच ते तीन फूट असलेल्या भगव्या रंगातील दगडाच्या या गणेश मूर्तीचे आकर्षक रूप भाविक डोळ्यात साठवून घेतात तर मूर्तीचे बोलके डोळे भक्तांची तहानभूक हरपून भक्तीत तल्लीन करतात. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीचं हे पेशवेकालीन मंदिर गणेश भक्तांसाठी जणू देवाचं घर मानले जात.. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या गणेशवाडी गावची लोकसंख्या सुमारे 7 हजारच्या घरात असून साडेतीन हजार हेक्टर शेतीपैकी फक्त 400 हेक्टर शेती महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व शेती कर्नाटकच्या भागात असल्याने कर्नाटकी सूर या गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो . कोल्हापूर सह सांगली, बिजापूर, बेळगावसह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गणेशवाडीला कानडी भाषेत देवरहळळी म्हणजेच देवांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं.
Byte :- प्रशांत भूषिंगे, ग्रामस्थ
VO 4 :- शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीच्या या बाप्पांच्या नित्यनेमाची पूजा गावातील काने कुटुंबीय करतात. तर गणेश जयंती माघी गणेश जयंती गणेश चतुर्थी आणि संकष्टीला एकगावातील 12 बलुतेदार मिळून गणपती बाप्पा चरणी एकरूप होतात. 20 खांबांवर उभा असलेल्या या मंदिराला आकर्षक कळस ही गावकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला आहे.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 30, 2025 17:00:08Kalyan, Maharashtra:
कल्याण शीळ रोड वरती ट्राफिक जाम..
वाहनाच्या लांबच लांब रांगा..
कल्याण शिळरोडवरगेल्या दोन तासापासून कल्याण शीळ रोड वरती मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.वाहनाचा लांबच लांब रांग कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 15:45:39Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Firing
File:03
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
शिक्रापूर / पुणे
ब्रेक
पुणे नगर रस्त्यावरील मलठण फाटा येथे चोराचा शोध घेण्यासाठी आलेल्या सातारा पोलिसांवर चोरांकडून हल्ला... पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलठण फाटा परिसरात घडली घटना... आरोपींकडून पोलिसांवर हल्ला... स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून गोळीबार... एक आरोपी गंभीर जखमी तर एक जण फरार झाल्याची प्राथमिक माहिती...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 30, 2025 15:16:06Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या बोरी अरब येथील अडाण नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून मार्ग काढण्याचे धाडस एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. विठल पत्रे असे या व्यक्तीचे नावं आहे, अडाण नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु होता, तरी देखील या व्यक्तीने पाण्यातुन रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला, हा आत्मघाती प्रकार बघून स्थानिक युवकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या व्यक्तीचा तोल जाऊन तो नदीत वाहून गेला.
15
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 30, 2025 14:33:31Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - माझा प्रॉब्लेम,मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही,जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर घणाघाती पलटवार
अँकर - माझा प्रॉब्लेम आहे,मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही,अश्या शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या निशाणा साधलाय,तसेच मुद्दा मत चोरीचा आहे,त्यामुळे जिथे मत चोरी झाली तिथे आधी राजीनामा द्यावा,असा टोला देखील आमदार जयंत पाटलांनी,गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना राजीनामा देण्याचे आव्हान करत जयंत पाटलांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका देखील जाहीर केली होती,यावरून जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांवर हा पलटवार केला आहे,ते सांगलीमध्ये ख्रिश्चन व मुस्लिम अधिकार परिषद कार्यक्रम दरम्यान बोलत होते.
साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
14
Report
KJKunal Jamdade
FollowAug 30, 2025 14:19:21Shirdi, Maharashtra:
Anc - साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात.यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे. शिर्डीतील ओम साईनगर मित्र मंडळातर्फे तब्बल 30 फूट उंच आणि 35 फूट रुंद अशी भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली असून हा देखावा सध्या गणेशभक्त व साईभक्तांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.गेल्या 15 वर्षांपासून ओम साईनगर मित्र मंडळ शिर्डीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी साजरा करत आहे.यंदा तमिळनाडूतील कोयंबटूर येथील वेलियंगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी उभारलेल्या ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे.या देखाव्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
Wkt kunal jamdade
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 30, 2025 13:49:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मराठा आरक्षण बाबत सरकारने तोडगा काढावा - आमदार जयंत पाटील
अँकर - मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनाबाबत सरकारने तोडगा काढावा आणि तो निघेल,अशी अपेक्षा बाळगूया,असं
मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.तसेच आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासनाने ही योग्य ती खबरदारी घ्यावी.हा काही राजकीय प्रश्न नाही, त्यामुळे यावर जास्त बोलणे उचित नाही,मात्र आशा आहे की सत्तेमध्ये बसलेले लोक काहीतरी तोडगा काढतील,असंही मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगली मध्ये आयोजित ख्रिश्चन व मुस्लिम अधिकार परिषद कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
बाईट - जयंत पाटील - आमदार- राष्ट्रवादी काँग्रेस ( Sp )
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 30, 2025 13:46:38Yeola, Maharashtra:
अँकर :
मालेगाव में मतदाता सूची में एवेंजर्स फिल्म के काल्पनिक खलनायक 'थैनोस' का फोटो वाला पहचान पत्र दिखने वाला एक वीडियो वायरल हो गया है। पहचान पत्र पर अलग नाम, उम्र और अधूरा पता था, इस पर सवाल उठने लगे हैं कि ये फोटो सूची में कैसे आया। इस घटना के बाद मतदाता सूची में चल रहे तकनीकी गड़बड़ी पर नेटिज़न्स ने आलोचना की है।.
कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी ने हाल ही में मतदाता सूची में होने वाली गड़बड़ी का प्रदर्शन किया था, और इसी बीच मालेगाव से एक वीडियो वायरल हुआ है। इस वीडियो में एवेंजर्स फिल्म के थैनोस का पहचान पत्र दिखाई दे रहा है, जिस पर सोशल मीडिया पर यह सवाल उठ रहे हैं कि हॉलीवुड फिल्म का खलनायक महाराष्ट्र में मतदान करने कैसे आ सकता है।
*इसका अवलोकन हमारे नासिक के प्रतिनिधि सुधर्शन खिल्लारे ने किया है।*
*और साथ मे मालेगाव के पूर्व विधायक आसिफ शेख इनकी बाईट*
14
Report