Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

अमरावतीत पोलीस अधिकारी मर्डर; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

ANIRUDHA DAWALE
Jun 29, 2025 05:38:06
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_POLICE_MURDER सहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 धक्कादायक अमरावतीत ए एस आय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचा मर्डर; चारचाकीने धडक देत केले छातीवर वार, एक आरोपी ताब्यात अँकर :– अमरावती मध्ये एका ए एस आय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचा मर्डर करण्यात आल्याने संपूर्ण अमरावती शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याचा मर्डर झाल्याने पोलिसांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. मृतक अब्दुल कलाम हे वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते पोलिस ठाण्यात कालची सेवा संपवून घरी जात असताना चार ते पाच जणांनी कलाम यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देत जखमी केले व छातीवर धारदार शस्त्राने वार करून चार ते पाच हल्लेखोर पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कलाम हे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. हल्ल्यानंतर कलाम यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement