Back
गडचिरोलीच्या 108 रुग्णवाहिकेत भीषण आग, व्हिडिओ झाला वायरल!
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 2906ZT_GAD_AMBULANCE
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोलीच्या 108 रुग्णवाहिकेला भीषण आग, रुग्णवाहिका स्फोटानंतर आगीच्या विळख्यात, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळची घटना, व्हिडीओ झाला वायरल, जीवितहानी टळली
अँकर:-- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण व नातेवाईक घेऊन निघालेली 108 सेवेची रुग्णवाहिका आधीच्या विळख्यात सापडली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर गावाजवळ गोंडबोरी परिसरात घडली. रुग्ण घेऊन जाणाऱ्या या वाहनातून अचानक धूर निघू लागला व स्फोट होऊन आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढले. काही क्षणातच संपूर्ण रुग्णवाहिका जळू लागली. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जीवितहानी मात्र झालेली नाही. हा स्फोट ऑक्सिजन सिलेंडरचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झालाय. 108 रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मात्र यानिमित्ताने पुढे आलाय.
-----रुग्णवाहिका जळत असलेला व्हिडीओ----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement