Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला जिल्ह्यात अवैध गुरांची वाहतूक रोखण्यात पोलिसांची मोठी कारवाई!

JAYESH JAGAD
Jun 28, 2025 03:36:23
Akola, Maharashtra
Anchor - अकोला जिल्ह्यात गुरांची अवैध वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २३ गुरांना जीवनदान दिले आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहने आणि एका दुचाकीसह अंदाजे २३ लक्ष ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी दोन पथकांसह समृद्धी महामार्गावर सापळा रचून, नागपूरहून अकोल्याकडे येणाऱ्या दोन पिकअप वाहनांना जुने शहर पोलिस ठाणे हद्दीत अडवण्यात आले. वाहनांमध्ये एकूण २३ गुरांना कत्तलीसाठी नेले जात होते. सर्व गुरांची सुटका करून म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा संस्थेत पाठवले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement