Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

आदिवासी आंदोलन उलगुलान: शहापुर से मंत्रालय तक लांग मार्च शुरू

UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 12:20:38
Thane, Maharashtra
शहापूर... आदिवासींचा हक्कासाठी शहापुर ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च सुरू... 'उलगुलान' १४ सप्टेंबरपासून सुरू... ॲंकर... आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी १४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शहापूर येथून 'उलगुलान' लाँग मार्च सुरू करण्यात आले आहे. हा लाॅग मार्च १६ सप्टेंबरला मंत्रालयात धडकणार आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात राज्यातील आदिवासी संघटनांचे जिल्हाप्रमुख, तालुकाध्यक्ष आणि सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या संदर्भातचे निवेदन शहापूर तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आंदोलनाद्वारे सरकारकडे आदिवासींच्या एकूण १९ महत्त्वांच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक १५ दिवसांत घेणे, जात पडताळणी कायदा २००० मध्ये सुधारणा करून पडताळणी समित्यांना पुनर्रतपासणीचे अधिकार देणे, सरकारमधील ८५ हजार रिक्त जागांची कृती योजना जाहीर करणे, एमपीएससी व आरोग्य विभागातील १५४१ पदांची तातडीने भरती करणे, बोगस जात प्रमाणपत्रे रद्द करणे अशा मागण्या आहेत. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील बोगस उमेदवारांवर दंड लावून पदवी रद्द करावी आणि त्या जागी मूळ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, धनगर व बंजारा जातींची आदिवासी प्रवर्गातील घुसखोरी थांबवावी, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Sept 14, 2025 14:32:54
Raigad, Maharashtra:स्लग - दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाची तुफान हजेरी ● दक्षिण रायगडात मुसळधार पाऊस ..... जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाच्या सरी ...... अँकर - गणेशोत्सवानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. विशेषतः दक्षिण रायगड मधील महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. महाड शहरातील अनेक ठिकाणी नाले तुंबल्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाच्या माऱ्यामुळे वाहन चालकांना पुढचे दिसत नव्हते त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.अचानक आलेल्या पावसामुळे रेनकोट आणि छत्र्या पुन्हा बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 14, 2025 14:32:43
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 1409_WARDHA_PROTEST शिक्षकांच्या टी ई टी परीक्षेला विरोध; वर्ध्यात शिक्षकांचे आंदोलन वर्धात प्रहार शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन टीईटी बंधनकारक निर्णय करण्याच्या निर्णयाविरुद्ध शासनाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन अँकर :  नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने केला आहेय. या निर्णयाच्या विरोधात शिक्षक सांघटनानी वर्ध्यात धरणे आंदोलन केले आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यना रक्ताने पत्र लिहून लक्ष वेधले आहेय. शिक्षकांना टीईटीची अट म्हणजे शिक्षकांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रहार शिक्षक संघटनेचे अजय भोयर यांनी दिली आहेय. शिक्षक मंत्र्यांना, कायदेमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पात्रता परीक्षा नाही तर मग शिक्षकांनाच टीईटी परीक्षेची अट कशासाठी असा मुद्दा उपस्थित करीत हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले.  शासनाने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहेय. बाईट - अजय भोयर, अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 14:19:58
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ‌... स्किप्ट ::- उजणी गावातील तेरणा नदीवरील पूल पाण्याखाली.... औसा–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद.... उजणी बाजारपेठेत शिरलं पाणी.... 400 हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान.... धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणातून पाणी सोडल्याने लातूर जिल्ह्यातील तेरणा नदीला पूर.... AC ::- लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी धाराशिव जिल्ह्यातील तेरणा धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून उजणी येथील तेरणा नदीवरील पुलावर पाणी पातळी वाढल्याने औसा तुळजापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचा पाणी उजणी गावात शिरल्यामुळे उजणी येथील बाजारपेठेत पाणी घुसलं असून तब्बल 20 दुकाने पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय सुमारे 400 हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 14, 2025 14:18:38
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील करवली,बोरी,झरी या शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलय, तर पिक जमीनदोस्त झाली आहेत,अति मुसळधार पावसामुळे बोरी गावाजवळील पाझर तलाव पूर्ण क्षमतेणे भरला असून कालव्याच्या बाजूने सांडव्यातील पाणी नामदेव नगर भागातील अनेक घरात शिरले आहे. यामुळे संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. या नदी नाल्याना पूर पूर परिस्थिती निर्माण झालीय,झरी मिरझापुर मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय. पिंगळी कोथाळा मार्गावरील ओढा प्रभावित झाल्याने हा ही मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 14, 2025 14:00:40
Parbhani, Maharashtra: अँकर - हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सतत पडतोय. आज ही अति मुसळधार पाऊस वसमत आणि औंढा तालुक्यात झाला आहे. गोजेगाव,रुपुर,सिद्धेश्वर,पार्डी, सावळी, येळी,केली5,हिवरखेडा, साळणा,अणखळी पोटा,पेरजाबाद, बेरूळा, नांदखेडा या गावात अति मुसळधार पाऊस झाला असून अक्षरशहा पिकांमध्ये दीड ते दोन फूट पाणी शिरलय,तर बेरूळा गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने बेरूळा गावाचा संपर्क तुटलाय. वसमत तालुक्यातील बोरी सावंत माटेगाव यासह त्या भागातील अनेक गावांना अक्षरशहा झोडपून काढलय. ओढ्याला पूर आल्याने बोरी सावंत ते माटेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ओढ्याचं पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे तर शेतातील पिकामध्ये सुद्धा हे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी साचलय. यामुळे शेकडो हेक्टर वरील पीक बाधित झाल्या आहेत...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 14, 2025 13:50:44
Kalyan, Maharashtra:कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती नवरात्र पूर्वीच्या कामाला सुरुवात.. किल्ले नवरात्री उत्सव समितीने केली किल्ल्याची केली पहाणी. Anc कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती नवरात्री मध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात यासाठी दुर्गाडी किल्ल्यावरती संपूर्ण तयारी सुरू आहे. किल्ल्याची रंगरंगोटी तसेच लाईट व्यवस्था,मंडप,पाण्याची व्यवस्था तयारी सुरू करण्यात आलेले आहे गेली 50 वर्षापासून किल्ले दुर्गाडी उत्सव समिती नवरात्र उत्सव साजरी करत आहे नऊ दिवसाचे लागणारे कामाचे नियोजन येणारे दुर्गा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक वेवस्था व सांस्कृतिक कार्यक्रम हे नऊ दिवस किल्ल्यावरती होत असतात आज शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील आणि पदाधिकारी किल्यावर पहाणी केली.
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 13:34:42
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1409ZT_CHP_BANK_SCHEME ( single file sent on 2C)  टायटल:--  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना, विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40 हजार रु. मदत दिली जाणार, 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना      अँकर:--चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने  शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे. यात विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40 हजार रु. मदत दिली जाणार आहे. 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना प्रारंभ होणार आहे. खातेदार आणि त्यांचे रक्ताचे अवलंबित यांच्यासाठी अटी-शर्तींसह योजना राबविली जाणार आहे. कॅन्सर, हृदय विकार, मेंदू -डोक्याच्या शस्त्रक्रिया, अपघात,सर्पदंश आदी विकार- आजार यात समाविष्ट करण्यात आले आहेत. बाईट १) रविंद्र शिंदे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 14, 2025 13:34:25
Mumbai, Maharashtra:अँकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाल्यात मुलुंड येथे शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली आहे दरम्यान पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागे त्यामुळे शिवसैनिकांनी बुलेट पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता अडविण्याचा देखील प्रयत्न केला जर दोन दिवसात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आलेला आहे बाईट समीक्षा पवार शिवसैनिक गुरुजोत्सिंग युवा सेना अध्यक्ष ईशाने मुंबई
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 14, 2025 13:34:13
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 14, 2025 13:31:47
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात ईदच्या मिरवणुकीदरम्यान नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही तरुणांनी मिरवणुकीच्या वेळी मुघल सम्राट औरंगजेबाच्या फोटोला दुधाने आंघोळ घालून दुग्धाभिषेक केला. या प्रकारामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला असून, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाई केली. या प्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे आंदोलकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो हातात घेऊन गंगाजलाने जलअभिषेक केला.त्यांनी औरंगजेबाच्या गौरवाप्रती तीव्र निषेध व्यक्त केला. Byte : अश्विन नवले , जिल्हाध्यक्ष
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 14, 2025 13:30:21
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे च्या कार्यकर्त्यांनी जाळला पाकिस्तानचा ध्वज पोलिस आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात झाली झटापट भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच विरोधात आंदोलन Ulh agitation Anchor पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभर तीव्र विरोध होत आहे. आज उल्हासनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली, यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला विरोध केला त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या झटापट झाली, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 14, 2025 13:15:52
Navi Mumbai, Maharashtra:story slug - अपहरण केलेला हेल्पर पूजा खेडकर यांच्या घरी पूजा खेडकर के घर मे अगवाह किया गया हेल्पर FTP slug - nm puja khedkar shots- reporter- swati naik navi mumbai anchor - दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे. gf- पूजा खेडकर यांचे घर आणि पोलिसांशी संवाद
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Sept 14, 2025 13:03:07
Pune, Maharashtra:Feed by what's up + file ftg सातारा इथं होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाणिपतकार विश्वास पाटील यांचीच निवड झालीय...मपासच्या पुणे कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही निवड जाहिर केलीय येत्या जानेवारीत हे संमेलन होतंय... Play pkg Last line Vo...खरंतर साताऱ्यात येत्या जानेवारीत भरणाऱ्या 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी कोसलाकार नेमाडेंनी स्पष्ट नकार दिल्यानंतर यापदासाठी प्रवीण दवणे, रंगनाथ पठारे आणि विश्वास पाटील ही तीन नावं चर्चेत होती...त्यापैकी सर्वाधिक पसंती ही विश्वास पाटलांच्या नावाला मिळाल्याने मसाप बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं...साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी विश्वास पाटलांच्या नावाची घोषणा केली... बाईट...प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. साहित्य महामंडळ व्हीओ....पाणिपतकार विश्वास पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीची वेगळी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही...पण तरीही प्रेक्षकांच्या उजळणीसाठी त्यांच्या प्रमुख ग्रंथसंपदेवर एक नजर टाकुयात.... विश्वास पाटील यांची ग्रंथसंपदा 1. पाणिपत 2. झाडाझडती 3. पांगिरा 4. संभाजी 5. क्रांतीसूर्य 6. लष्ट फॉर लालबाग 7. चंद्रमुखी 8. महानायक 9. महासम्राट 10. दुडिया 11. आंबी 12. नागकेसर 13. गाभुळलेल्या चंद्रबनात 14. नाटक- पाणिपतचे रणांगण gfx पाणिपतकारांना आजवर मिळालेल्या पुरस्कारांची यादीही खूप लांबलचक त्यामुळे तुर्तात आम्ही त्यांची प्रचंड लोकप्रिय कादंबरीकार आणि तितकेच झाडाझडतीच्या लिखानावरून तरी तितकेच संवेदनशील प्रशाससकीय अधिकारी एवढीच ओळख करून देतो....दरम्यान साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांनीही आनंदच व्यक्त केलाय.... Byte / phono विश्वास पाटील, पाणिपतकार व्हीओ...खरंतर मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे ओघाने आलेच...पण यंदा दांडगा प्रशासकीय अनुभव असलेले आणि आपल्या शैलीपूर्ण लिखानामुळे प्रचंड लोकप्रियता लाभलेले विश्वास पाटीलच या सातारच्या संमेलनास अध्यक्ष म्हणून लाभल्याने आशा करूयात की यंदाचं संमेलन तरी कोणत्याही वादाशिवाय पार पडेल... झी मीडिया पुणे
0
comment0
Report
Advertisement
Back to top