Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

अलमट्टी आणि हिप्परगी धरणांवर थेट वॉच, अधिकारी नियुक्त!

PINEWZ
Jun 25, 2025 12:33:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - अलमट्टी आणि हिप्परगीवर राहणार आता पाटबंधारेचा थेट वॉच..दोन्ही धरणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती.. अँकर - कर्नाटकच्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणावर आता सांगलीच्या पाटबंधारे विभागाचे थेट वॉच राहणार आहे.अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग याची माहिती वस्तुस्थिती माहिती मिळवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून थेट 8 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.29 जून पासून 15 ऑक्टोंबर पर्यंत हे अधिकारी कर्नाटकच्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणावर नियुक्तीस असणार आहेत. प्रत्येकी 4 अधिकारी दोन्ही धरणांवर कार्यरत राहणार असून प्रत्येक तासाला पाणीसाठा आणि विसर्गाची अपडेट पाटबंधारे विभागाला त्यांच्याकडून देण्यात येणार आहे.तर अधिकाऱ्यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचेही सांगली पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement