Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

आमरण उपोषण: शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली संतापजनक मागणी!

PINEWZ
Jun 25, 2025 14:52:16
Parbhani, Maharashtra
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वनमाला उत्तम शेटे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या पालम तालुक्यातील पेठशिवनी येथील रहिवासी आहेत,गट क्रमांक 74/5 मध्ये त्यांची शेती आहे, पण शेती त्यांचे दिर बबन शेटे यांच्या नावावर होती, गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी ज्ञाय माघितला असता त्यांना ज्ञाय मिळाला, पण मागील चार वर्षांपासून त्यांचा दिर बबन शेटे त्यांना त्यांची शेती वहिती करू देत नाहीये, त्यांनी यंदा शेतात केलेली कपाशीची लागवड त्यांच्या दिराने मोडून टाकल्याचे ते सांगतायेत, आपल्याला ज्ञाय मिळावा यासाठी वनमाला शेटे यांनी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण येथे ही त्यांची कुणीच दखल घेत नाहीये, बाईट- वनमाला शेटे - उपोषणकर्ती महिला
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement