Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

कच्छी मशिदीने लाँच केले 'अजान अ‍ॅप', नमाज आता मोबाइलवर!

JAYESH JAGAD
Jul 07, 2025 10:38:09
Akola, Maharashtra
10 फाईल्स आहेत..PKG Anchor : अकोल्यातील १३५ वर्षे जुनी ऐतिहासिक ' कच्छी मशिदी ' आता तंत्रज्ञानाशी जोडल्या गेली आहेय...मुस्लिम बांधवांना आता रोज होणारी अजान थेट मोबाइलवर एकता येणार आहेय.. Vo 1 : अकोल्याच्या १३५ वर्षे जुन्या ऐतिहासिक कच्छी मशिदीने “ कच्छी मशिदी अजान ॲप ” लाँच करून डिजिटल युगाकडे एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहेय...गुगल प्ले स्टोअर मधून “ कच्छी मशिदी अजान ॲप ” डाउनलोड केल्यानंतर आता या ॲपद्वारे शहरात, देशात किंवा परदेशात कुठेही उपस्थित असलेल्या व्यक्तीला मशिदीतून थेट अजान ऐकता येईल, ज्यामुळे वेळेवर नमाज अदा करणे शक्य होईल..सध्या देशात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेय..आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी-मर्यादा मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढाकार घेत ही ॲप विकसित करण्यात आलीय..धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, कच्छी मशिदी ट्रस्टने पर्यावरण आणि सामाजिक सौहार्द लक्षात घेऊन ध्वनी प्रणाली नियंत्रित केली आहेय तसेच, नमाज्यांना सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आलाय.. Byte : जावेद झकेरिया ,कच्छी मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष.. Vo 2 : अजानचा आवाज प्रत्येक नमाज्यापर्यंत पोहोचावा यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहेय.. अ‍ॅपची प्रमुख वैशिष्ट्ये : * मशिदीशी जोडलेले पाचही वेळेचे थेट अजान.. * किब्ला दिशा जाणून घेण्याची सुविधा - कुठूनही योग्य दिशा.. * रमजान, जुमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांबद्दल वेळेवर माहिती.. * अचूक वेळेनुसार मशिदीशी थेट कनेक्शन.. * सोपा आणि स्मार्ट इंटरफेस.. * कार्यक्रमांची सूचना सुविधा * तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल.. कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचा फायदा इतरही मशिदींनी घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहेय.. Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार.. Vo 3 : कच्छी मशीद ही विदर्भातील पहिली मशीद आहे, ज्याने नावीन्यपूर्णतेचाच एक भाग म्हणून हे मोबाइल अ‍ॅप सादर केले आहेय.. हुडाज टेक्नॉलॉजीज, पुणेने ही ॲप तयार केली आहेय.. इतर समाजाने देखील आता कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचे स्वागत केले आहेय.. Byte : प्रभतसिंग बछेर , स्थानिक नागरिक Final Vo : कच्छी मशीदने ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध म्हणून विशेष ॲप विकसित केले आहेय...या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपण्यास सक्षम होणार हे मात्र निश्चित.. जयेश जगड, झी मीडिया, अकोला
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top