Back
कर्नाटक SBI डकैती: मिला बॅग, चोर अभी फरार, भारी सोना-पैसा सवालों में
SKSACHIN KASABE
Sept 19, 2025 08:21:41
Pandharpur, Maharashtra
19092025
Slug - PPR_SBI_PKG
FILE 0
Anchor - कर्नाटक मधील एसबीआय वरील दरोड्यातील एक बॅग सापडली पण दरोडेखोर अद्याप फरारच
कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथे १६ सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा पडला होता यात. 1 कोटी 4 लाख 20 कोटी रुपयांचे सोने दरोड्यात पळवले होते. याबाबत अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. मात्र मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात एक बॅग सापडली आहे. त्यात बँकेतून चोरलेलला ऐवज सापडला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ चडचण हे गाव गारमेंट दुकान मधील कापड विक्री साठी प्रसिद्ध आहे. याच गावातील स्टेट बँकेच्या शाखेवर मंगळवारी 4 जणांनी पाळत ठेवून दरोडा टाकला. अत्यंत शिताफीने केलेल्या या दरोड्यात त्यांनी मोठी रक्कम आणि सोने चोरून पसार झाले होते.
यातील एक चोर वाटणी केलेलं सोने आणि रक्कम घेऊन त्याच्याकडे असलेल्या वाहनातून महाराष्ट कर्नाटक सीमेवरील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावाजवळ येताना दुचाकीला धडक देत निघून जाताना काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे सदर चोरट्याने त्याची गाडी तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली. मात्र काही हाती लागले नाही.
काही ग्रामस्थांना काल हुलजंती गावातील एका बंद पडक्या घराच्या छतावर एक बॅग आढळून आली. यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्त पणे पाहणी करून सदर बॅग ताब्यात घेतली. याबाबत दोन्ही राज्याच्या पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या बॅगेत चोरी केलेलं सोने आणि रक्कम असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी हुलजंती गावात बैठक घेऊन चोराबद्दल काही माहिती असल्यास निर्भय पने पोलिसांना. कळवावे असे आवाहन केले आहे.
पोलिसांना हुलजंती गावात सध्या बॅग मिळाली असली तरी दरोडेखोरापर्यंत अद्याप पोहचता आले नाही. या कारवाई बाबत पोलिस मात्र अधिकृत काहीही माहिती देण्यास तयार नाहीत.
-----
Byte
1. लक्ष्मण निंबर्गी, पोलिस अधिक्षक विजयपुरा ( कर्नाटक,)
2. ग्रामस्थ, चडचन
-------
व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या विजयपुरा एसपी पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा मराठी भाषांतर मजकूर खालीलप्रमाणे आहे:
काल, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 ते 7:15 च्या दरम्यान, चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एसबीआय बँकेत दरोड्याची घटना घडली. बँकेत खाते उघडण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती दुपारी 4:30 पासून आतमध्ये बसली होती. संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा बँक बंद होण्याची वेळ झाली, तेव्हा त्याने बाहेर असलेल्या इतर दोन साथीदारांना आत बोलावले.
त्यावेळी बँकेत 5 ते 6 कर्मचारी आणि 4 ग्राहक असे एकूण 10 लोक उपस्थित होते. या तिघांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले आणि एका खोलीत कोंडून ठेवले. त्यांचे हात विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या पट्टीने बांधले. बँक बंद होण्याच्या वेळेमुळे लॉकर उघडे होते. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावून ते लॉकर उघडायला लावले आणि त्यातील 1 कोटी 4 लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 398 पॅकेट्समधील गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या सोन्याच्या दागिन्यांचे अंदाजे वजन 20 kg असून, एकूण 21 कोटी 4 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. तपासासाठी 8 पथके तयार करण्यात आली आहेत. वैज्ञानिक पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आहेत.
आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले आहे. ते वाहन महाराष्ट्रातील मंगळवाडे तालुक्यातील हुलजंती गावात सापडले आहे. वाहनातून चोरीला गेलेले काही सोन्याचे पॅकेट्स आणि रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 19, 2025 10:52:500
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 10:51:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 19, 2025 10:32:190
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 10:31:380
Report
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 19, 2025 10:03:190
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 09:51:181
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 09:50:130
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 09:48:40Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri togadiya
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी आज आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं. यंदा माऊलींच सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 09:36:130
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 19, 2025 09:34:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 19, 2025 09:34:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:33:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 19, 2025 09:16:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:15:270
Report