Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नेरुळ में 12 वर्षीय लड़की के साथ बलात्कार; भाई को मारने की धमकी, आरोपी गिरफ्तार

SNSWATI NAIK
Sept 19, 2025 10:51:09
Navi Mumbai, Maharashtra
story slug -: १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक. 12 साल के लडकी पर अत्याचार ftp slug - nm child girl crime shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नेरुळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलेय. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेय. मुलीची आई कामावर असताना मुलगी घरी एकटी असताना नराधम आरोपी लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत मुलीला त्याच्या घरी नेले आणि जर तिने आज्ञा पाळली नाही तर तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. धमकीच्या दबावाखाली, मुलीला तिचे कपडे काढण्यास भाग पाडले गेले आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरी परतल्यावर पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने ताबडतोब नेरुळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केलेय.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 12:54:14
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांनी मोर्चा काढला यावेळी बंजारा समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं.आम्ही रोडवरचे आंदोलन करतोय,मोर्चे काढतोय,निवेदन देतोय,तरी सुद्धा आम्हाला सरकार आम्हाला आमच्या हक्काचं एसटी प्रवर्गातील आरक्षण देत नसेल तर आमदारकीचा राजीनामा देणार,शिवाय मी मंत्रीसंजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील राठोड,भाजपचे आमदार तुषार राठोड,धर्मगुरू तथा विधानपरिषद सदस्य बाबू सिंग राठोड यांना ही राजीनामा देण्याचं आवाहन केलय, बंजारा समाजासाठी त्यांचं आणि माझं तेवढंच कर्तव्य आहे. उद्या जर बंजारा समाजाला आदिवासींचे प्रमाणपत्र नाही मिळाले तर लोक यांना रस्त्यावर फिरू देतील का, मी राजीनामा देतोय म्हटल्यावर यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असं काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड म्हणाले,जर सरकारने आम्हाला तात्काळ एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही तर आम्ही बंजारा समाजाचे सर्व आमदार राजीनामा देऊ असा ईशाराच आमदार राठोड यांनी सरकारला दिलाय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121 राजेश राठोड- विधान परिषद सदस्य
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 12:52:43
Nashik, Maharashtra:nsk_callcenterpkg फीड by 2C अँकर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी सध्या अवैध कॉल सेंटरच प्रमुख केंद्र बनले आहे. हिल स्टेशन बनलेल्या या पर्यटन नगरीत दुसरे रॅकेट तर नाशिक शहरात एक रॅकेट चा पर्दाफाश वर छापा टाकत मोठा घोटाळा उघड केला आहे. इगतपुरीत कर्जदारांना धमकावून पैसे उकळणारे हे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून २४ लाख रुपयांची रोकड, संगणक, लॅपटॉप जप्त केले आहेत. Vo 1 इगतपुरीतील मीनाताई ठाकरे संकुलात सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. या कारवाईत कॉल सेंटर चालक इगतपुरीचे नरेंद्र शशिकांत भोंडवे मुंबईचे पारस संजय भिसे यांना अटक करण्यात आलीये. पोलिसांनी २४ लाखांची रोकड, संगणक, लॅपटॉप, मोबाइल असा मोठा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत ४०-५० कर्मचारी कॉलर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. हे रॅकेट कर्जदारांना बँक अधिकारी असल्याचे भासवून धमकावत असे. हप्ता भरला नाही तर कारवाई होईल अशा धमक्या देऊन पैसे वसूल केले जात होते. नातेवाईकांनाही धमकावले जात होते. Byte बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक Vo 2 यापूर्वी स्वतः दिल्लीच्या सीबीआय पथकाने इगतपुरीत छापे टाकले होते. अशा आर्थिक घोटाळ्यात बँक व वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांचा डाटा पुरविण्यात आणि काही पोलिस अधिकारी पाठिंबा देत असल्याचं समोर आला आहे . अटकेतील दोघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात अधिक तपासानंतर मोठे घोटाळे समोर येण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 19, 2025 12:30:21
Shirdi, Maharashtra:Anc - आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या 4 बहिणींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालाय.. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.. गेल्या पाच वर्षांपासून मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू होते असे फिर्यादीत म्हटलं आहे.. V/O - राहुरी तालुक्यात सख्ख्या 4 बहिणींवर नातेवाईकानेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर 3 मुली अल्पवयीन आहेत.. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला.. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला.. अल्पवयीन मुलींपैकी एक 16, दुसरी 14 आणि तिसरी 10 वर्षांची आहे.. मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, इतर दोन पुरुष आणि एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हे संबंधित मुलींचे नातेवाईक असल्याचं पोलिस तपासात समोर आलंय... मुलींवर गैरप्रकार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हणलंय... Bite - सोमनाथ घार्गे , पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 19, 2025 12:19:15
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला एसटी प्रवर्गांमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांच्या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे . हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद मैदान परिसरातून सदर मोर्चा निघाला असून शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. यामध्ये महिलां तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय. बंजारा समाजाची जी परंपरागत वेशभूषा आहेत ही वेशभूषा परिधान करून अनेक महिला भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आहे,माजी खासदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड,मुखेडचे भाजपचे आमदार तुषार राठोड,विधान परिषद सदस्य महंत बाबूसिंग महाराज राठोड यांची मोर्चाला प्रमुख उपस्थित होती. शासनाने आमच्या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही,तर आम्ही मुंबईत येऊन दिवाळी साजरी करू असा ईशारा यावेळी बंजारा समाजाच्या नेत्यांनी दिला. बाईट- तुषार राठोड - आमदार,भाजप
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 12:02:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_gopichand स्लग - गोपीचंद पडळकर आणि त्यांची वादग्रस्त विधाने.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे,गेले काही वर्षांपासून वादग्रस्त विधानासाठी चर्चेत राहिले आहेत,सातत्याने कडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे.गोपीचंद पडळकर आणि वादग्रस्त विधान असेल समीकरण बनले आहे. व्ही वो - भाजपाचे फायर ब्रँड नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या आक्रमक भाषा शैलीसाठी ओळखले जातात, गेल्या काही वर्षात गोपीचंद पडळकरांकडून एकामागून एक वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत,शरद पवारांपासून अजित पवार,सुप्रिया सुळे,जितेंद्र आव्हाड , संजय राऊत आणि जयंत पाटीलयांच्यावर पडळकरांकडुन प्रामुख्याने टीका करण्यात आली,ही टीका करताना अनेक वेळा गोपीचंद पडळकरांची तोल ढासळला सुद्धा आहे. आता याच गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांच्या बाबतीत सांगलीच्या जत मध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये खालच्या पातळीला जाऊन गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना लक्ष केलंय. पाहूया जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर काय म्हणाले. एकेरी भाषेत जयंत पाटलांचा उल्लेख करत जयंत पाटील हा बेअक्कल माणूस आहे, दर आठवड्याला तो सिद्ध करतोय,होय मी बे-अक्कल माणूस आहे. जयंत पाटील हा भिकारी औलाद आहे. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही,काही तर गडबड आहे ? अशा पद्धतीची खालच्या पातळीवरील टीका गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आली आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक वाद निर्माण झालाय.पण गोपीचंद पडळकर यांचे हे विधान पहिलंच नाही, आजपर्यंत त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत. पाहूयात आजपर्यंतची त्यांच्याकडून करण्यात आलेली काही वादग्रस्त विधान. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या वर टीका करताना,पडळकरांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. मी लहान असल्यापासून पाहतोय शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत,पण ते काही होत नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या एका विधानाचा पुनरुच्चार करत,कांदयाला दर मिळवण्यासाठी शरद पवारांच्या ढुंगणावर लाथा घाला,ते बेशुद्ध पडल्यावर त्यांच्यावर कांदा पिळा,मग कांद्याला दर मिळेल. कोल्हापूर येथील धनगर समाजाच्या आंदोलना दरम्यान त्यांचा एक विधान गाजलं होतं.धनगर समाजाने बकऱ्या राखायचं बंद केलं,तर महाराष्ट्राच्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल असं विधान पडळकरांनी केले होते. संजय राऊत हा बिन बुडाचा लोटा आहे,खातोय उद्धव ठाकरेचे आणि चाकरी करतोय शरद पवाराची. पुण्यात एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातंय.. ख्रिश्चन समाजाच्या पादरीबाबत बोलताना, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्यास पदरींचा सैराट करा असं जाहीर वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेमध्ये प्रवेश करताना शिवीगाळ केल्याचा प्रकार. त्या घटनेनंतर विधानसभेच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. राजकीय नेत्यांबरोबर पडळकरंकडून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत देखील वादग्रस्त विधान करण्यात येत आहेत. व्ही वो - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने वादग्रस्त विधान करतात,यानंतर भाजपाकडून पडळकर यांना सबुरीचा सल्ला देखील दिला जातो.मात्र गोपीचंद पडळकरंकडून वारंवार भाजपा सल्ल्याचा-कल्ला करून वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवण्यात धन्यात मानतात, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फळकरांना पुन्हा एकदा सबुरीचा सल्ला दिलाय आणि तो पाळण्याचा आश्वासन पडळकर यांनी देखील दिलय.. मात्र ही सबुरी किती दिवस असणार हे मात्र अनिश्चित आहे,
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 19, 2025 12:01:41
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती 15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरू साठी देखील विमानसेवा सुरु होतं असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 19, 2025 11:51:23
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी nm airport opening prparation FTP slug - nm airport preparation shots- reporter - swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात रस्त्यांचे डांबरीकरण, रंगरंगोटी, फुटपाथांचे सुशोभीकरण या कामांना आला वेग. येत्या 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यास जवळपास शिक्कामोर्तब. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे होणार उद्घाटन. उद्घाटन झाल्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंम्बर मद्ये प्रवासी वाहतूक होणार सुरू. उद्घाटन निश्चित असलं तरी नामांतराचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. उद्घाटन झाल्यावर स्थानिक भूमिपुत्र काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे. gf-
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 11:46:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_BURNING_CAR_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर अचानक कारने घेतला पेट, शहरातील आनंदवन चौकातील घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर कारने अचानक पेट घेतला. ही घटना शहरातील आनंदवन चौकातील घडली. काही क्षणातच धूर व नंतर ज्वालांनी संपूर्ण कार ची राख रांगोळी झाली.  अचानक आग लागल्याने सर्वत्र पळापळ झाली. आगीचे कारण मात्र अज्ञात आहे. थोड्या वेळासाठी या महामार्गावरील वाहतूक  विस्कळीत झाली होती. पोलीस आणि अग्निशमन पथकांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ---- बर्निंग कार चे vis----- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 19, 2025 11:30:43
Pandharpur, Maharashtra:19092025 Slug - PPR_RAIN_CROPLOSS file 05 Anchor - काय झाडी काय डोंगर या डायलॉगने प्रसिद्धी मिळालेल्या शहाजी बापू पाटलांच्या सांगोल्यात ढग फुटी सदृश्य तुफान पाऊस , 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 170 मिलिमीटर पाऊस झाल्याने 60 हजार हेक्टर शेतीचे नुकसान प्राथमिक अंदाज सांगोला तालुका तसा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. येथील कडलास, निजामपूर, वाटम्बरे, राजुरी या गावात रात्री 7 ते 11 या काळात तुफान पाऊस झाला आहे. याच्या नुकसानीची परिस्थिती आज समोर येऊ लागली आहे. कडलास गावात एक वस्तीत पाणी घुसल्याने तेथील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांचे धान्य कपडे संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. या ढगफुटी सदृश्य पावसावर जवळपास 60 हजार हेक्टर वरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज दिवसभर शेताच्या मधून पाणी वाहत होते. द्राक्ष बागा डाळिंब बागा, मका, बाजरी, ज्वारी , अशा पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यातील काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई देताना वेगळे निकष लावण्याची मागणी शिवसेना नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यानी केली आहे. ----- Byte 1.वन टू वन माजी आमदार शहाजी बापू पाटील 2. शेतकरी बाईट्स
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 19, 2025 11:22:23
Dhule, Maharashtra:ANCHOR - लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत मात्र कोरडे पाषाण , हि म्हण आपण ऐकली असेल , अनुभवली असेल. नेते, अधिकारी , राज्य करते , विरोधक , सर्व शासकीय शाळामंध्ये मुलांना प्रवेश देण्यासाठी बोलघेवडेपण करताना दिसतात. मात्र स्वकृतीतून नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे . त्यांनी आपल्या स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं. आहे. VO - या आहेत नंदुरबार जिल्ह्याधिकारी मिताली सेठी , यांनी समाजापुढे आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे. नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना प्रवेशित केले आहे . विशेष म्हणजे त्या स्वतः मुलांना सोडायला अंगणवाडीत आल्यात. या चिमुरड्याने शिस्त लागावी, त्यांचा विरुंगुळा व्हावा या हेतूने सेठी यांनी आपल्या मुलाला या सरकारी अंगणवाडीत पाठवायला सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा सर्व साधारण समज. पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हा समज मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत टाकलं आहे. नंदूरबार शहरापासून ३-४ किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांना टाकलं आहे. या अंगनवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या झोळीची कल्पना आवडल्यानं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना टोकरतलावच्या अंगणवाडीत टाकले आहे. बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार VO - या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत. बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार VO - सामाजिक दायीत्वातून त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांना प्रेरणादायी आणि कौतूकास्पद म्हणाव लागेल. त्यांच्या यां निर्णयामुळे पालकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. इतकाच नव्हे तर सरकारी शाळांना दूषण देत न बसता, त्यांनी कृतीतून घालून दिलेला हा आदर्श इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
3
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 11:21:59
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कामठवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिल. शिक्षक द्या अशा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात शाळा भरविली. विद्यार्थ्यांनी केली प्रशासनाकडे मागणी. वर्गावर शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, आणखी एका शिक्षकाची वारंवार मागणी करून देखील शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकांनी देखील संताप व्यक्त केला. त्यामुळे अखेरीस शाळा सोडून विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागला.
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 11:21:46
Nashik, Maharashtra:nsk_panerpkg feed by 2c and live u 51 अँकर नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भेसळीच्या संशयावरून सिडकोतील दुकानावर छापा टाकत पनीर व खव्याचा तब्बल ४३ हजारांचा साठा जप्त केला आहे. Vo दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मालिका सुरू केली आहे. त्याच मोहिमेत शुक्रवारी नाशिकमधील सिडको, त्रिमूर्ती चौकातील विराज एन्टरप्रायजेस या दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२९ किलो पनीर (किंमत ३८,७०० रुपये) आणि ५,०४० रुपयांचा खवा असा एकूण ४३,७४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बाईट- मनीष सानप, सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन अधिकारी Vo 2 भेसळीच्या संशयाने नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून उर्वरित साठा नष्ट करण्यात आला. सणासुदीच्या काळात पनीर, खवा, मिठाई खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी अन्यथा याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात Byte डॉ सदानंद नायक स्किन स्पेशालिस्ट Vo 3 असे प्रकार कुठे आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. भेसळविरोधी माहिती टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 19, 2025 11:19:31
Kolhapur, Maharashtra:Kop iPhone 17 Vis Mhais Feed :-2C Anc:- सध्या मार्केटमध्ये आयफोन 17 घेण्यासाठी तरुणांच्या उड्या पडू लागले आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. नावेद मुश्रीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये खरे इन्व्हेस्टमेंट तेच जे आपल्याला भविष्यात उत्पन्न देतं.. लाखो रुपयांचा आयफोन खरेदी करण्यापेक्षा लाख रुपयांची म्हैस किंवा गाय विकत घेतली तर ती आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न देऊ शकते असं म्हटलय. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी केलेली सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनलाय.. नावेद मुश्रीफ यांनी केलेल्या पोस्टमध्ये एकीकडे आयफोन 17 चा फोटो आणि दुसऱ्या बाजूला कायमस्वरूपी उत्पन्न देणाऱ्या लाखाच्या म्हशीचा फोटो पोस्ट केलाय.
2
comment0
Report
Advertisement
Back to top