Back
जमिल शेख हत्या प्रकरण: कुटुंबीय न्यायासाठी पायी निघाले!
SKShubham Koli
FollowJul 14, 2025 08:32:50
Thane, Maharashtra
ANC:- मनसे पदाधिकारी जमिल शेख हत्या प्रकरणाला ५ वर्ष पुर्ण झाले असून मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीय न्याय मिळावा यासाठी पायी निघाले आहेत,देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांची भेट जमिल शेख कुटुबीयांनी घेतली होती.त्यानंतर फडणवीसांनी सरकार आल्यावर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले होते.न्यायाची मागणी घेऊन कुटुंबीय पायी निघाले आहेत
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowJul 14, 2025 13:06:05Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 1407_WARDHA_BUS_STORY
चक्क बस आगरातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा
गेल्या कित्येक दिवसांपासून बस खेडेगावात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय
वर्ध्याच्या तळेगांव बस आगारातील धक्कादायक प्रकार
बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप
अँकर - वर्ध्याच्या आष्टी तळेगाव भागात ग्रामीण भागात बस पोहचत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहेय. खेड्या पाड्यात बस येत नसल्याने विदयार्थ्यांनी तळेगाव श्यामजी पंत येथील आगारात निवेदने दिलीय. पण प्रश्न सुटला नाही अखेर विदयार्थ्यांनी तळेगावच्या बस आगारात शाळा भरवून लक्ष वेधले आहे. बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप आहेय.
बाईट- चैतन्य हिरूरकर विद्यार्थी ( काळी t-शर्ट)
बाईट- विद्यार्थिनी (गुलाबी ड्रेस)
विवो- गेल्या महिन्याभरापासून गावात बस आली नाही अनेक विध्यार्थांचे शाळा बुडाली..तळेगाव पारडी रस्ता खराब असल्याचे कारण गावात बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तळेगांव बस आगारात शाळा भरवून सरकारचा निषेध केला आहेय..सत्र सुरू व्हायला एक महिन्याचा अवधी लोटून वेळा मात्र बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे एक-एक महिन्याचं शैक्षणिक नुकसान होत आहेय...
बाईट- तुषार नायकुजी,पालक ( निळे चेक्स चे शर्ट)
विवो- गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांव बस फिरकली नाही..आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहेय..पावसामुळे खड्डे तयार झाले त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे नुकसान होऊ शकते..रस्ता बदलवून बस सुरू असल्याची प्रतिक्रिया आगर प्रमुख यांनी दिली आहेय..
बाईट - आनंदी बेलूरकर,आगार प्रमुख, ( लाल ओढणी )
फायनल विवो - जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगांव-पारडी गावात बस पोहचली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगारात पोहचत शाळा भरवत आंदोलन केले...आर्वीच्या दोन्ही आमदार विद्यार्थाना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी असल्याचे दिसते
सरकार कडून शिक्षणाचा गाजावाजा केला जातोय...वर्ध्यात शालेय शिक्षण राज्यमंत्र्याचा जिल्ह्यात नेमकं चाललं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहेय..
मिलिंद आंडे ZEE 24 तास,वर्धा
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 14, 2025 13:05:46Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाच्या कालावधीत साईंच्या चरणी भरभरून दान..*
साई संस्थानच्या वतीने करण्यात आलं होत तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोजन...
गुरुपोर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी तब्बल 6 कोटी 31 लाख 31 हजार रुपयांचे दान..*
साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना माहिती..
गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त साईदरबारी...
*असं मिळालं साईबाबांच्या चरणी दान -*
रोख स्वरुपात 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 दक्षिणा पेटीत प्राप्त
देणगी काऊंटर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये प्राप्त
पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी 55 लाख 88 हजार 200 प्राप्त
डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून - 2 कोटी 5 लाख 76 हजार 626
सोने 668 ग्रॅम रक्कम रुपये 57 लाख 87 हजार 925 रुपये
चांदी 790.400 ग्रॅम रक्कम रुपये 5 लाख 85 हजार 879 रुपये
*एकूण रुपये - 6 कोटी 31 लाख 31 हजार 362*
bite - ceo gorskh gadilkar
1
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 14, 2025 12:37:53Ambernath, Maharashtra:
अंगावर पेट्रोल ओतून कर्जबाजारी तरुणाने जीवन संपवलं..
आंबरनाथच्या मलंगडच्या कुशिवली गावा जवळ केली आत्महत्या
ऑनलाईन गेमिंगमध्ये कर्जबाजारी झाल्याची प्राथमिक माहिती
Amb suicide
Anchor कर्जबाजारी झालेल्या तरुणाने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या कुशीवली गावाजवळ घडली आहे , किरण परब असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो कल्याण पूर्वेतील संतोष नगर मध्ये राहायला होता . किरणवर खाजगी बँकेचे कर्ज होते. तर आईच्या दागिन्यांवर देखील त्याने कर्ज घेतल होत. किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झाला होता त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हिललाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना प्रकाराची माहिती देत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 14, 2025 12:34:14Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KOYNA_TARAFA
सातारा - कोयना धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने या शिवसागर जलाशयातील जिल्हा परिषदेची तराफा सेवा आज पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.यामुळे या दुर्गम भागात पुन्हा एकदा दळणवळण सुरू झालं आहे.कोयना धरणातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर ही तराफा सेवा बंद झाली होती.त्यामुळे या कांदाटी या दुर्गम भागातील नागरिकांना खूप लांबून तापोळा,बामणोली , महाबळेश्वर भागात जावं लागत होते मात्र आता तराफा सेवा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 14, 2025 12:34:04Kalyan, Maharashtra:
अल्पवयीन मुलांनवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
Anchor :- दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अरुण उत्तप्पा असे या विकृत आरोपीचे नाव आहे ही दोन्ही अल्पवयीन मुले वडाळा येथे राहणारे होते अरुण त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्याने या दोन्ही मुलांना कल्याण मध्ये आणले होते. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनवर या तिघांना पाहून गस्तीवर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाला संशयाला त्यांनी अरुण सह या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांचे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दोन्ही मुलानं कडे लिपस्टिक आणि जेल सापडलं असून या लहान मुलांना तो लिपस्टिक लावून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपींना वडाला रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे .
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 14, 2025 12:33:52Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- लम्पि लसीकरण
फीड 2C
Anchor
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून लम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे जिल्ह्यात 13 लाख 78 हजार एवढे पशुधन असून 9 लाख 28 हजार जनावरांना लसीकरण करण्यात आलं आहे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आजाराचे लागण झालेले काही जनावरे आढळली त्यांना तात्काळ लसीकरण आणि औषधोपचार देऊन बरं करण्यात आला आहे सध्या जिल्ह्यामध्ये 12-13 जनावरांना लम्पिची लागण झालेली आहे मात्र ती प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे त्याचा फारसा प्रादुर्भाव इतर जनावरांना होणार नाही पावसाळा सुरू झाल्यानंतर लम्पि सारखा संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये वाढतो यासाठी शेतकऱ्यांनी गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि बाहेरून विकत आणलेली जनावरे लगेच आपल्या जनावरांमध्ये एकत्र न करता काही दिवस एकटे ठेवली पाहिजेत याबरोबरच एखाद्या जनावराला लम्पि सारख्या आजाराची लागण झाली तर त्याच्यावर तात्काळ उपचार घेतले पाहिजेत असं पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितल आहे
बाईट:- उमेश पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन अहिल्यानगर
4
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 14, 2025 12:32:37Buldhana, Maharashtra:
बुलढाणा
मनसे जिल्हाअध्यक्षाचा रुग्णालयात राडा.
*अतिदक्षता विभागात मध्यरात्री मित्रांसह प्रवेश न दिल्याने ज्युनिअर डॉक्टरवर प्राणघातक हल्ला.*
*मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल मधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद.*
Anchor - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जाधव याने आपल्या मित्रांसह मध्यरात्री तीन वाजता मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला बेदम मारहाण केली. मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा रात्री अडीच वाजता गाभणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला.. मात्र त्यावेळी तेथील डॉक्टरने मध्यरात्री रुग्णाला भेटण्याची वेळ नसते , रुग्णांना आरामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही एक एक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता.... असे सांगितलं. मात्र लक्ष्मण जाधव यांनी आम्हाला सर्वांना एकाच वेळी आयसीयू मध्ये जाऊ दे असं म्हणत आयसीयू मधील कार्यरत डॉक्टरला जबर मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी आत्ताच मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 14, 2025 12:08:43Latur, Maharashtra:
लातूर PKG...
स्किप्ट ::- लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्जचा बाजार ? .. लातूर मध्ये तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त....
AC ::- शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं लातूर… पण आता इथंच शिक्षण घेणारी तरुणाईच अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाले आहे…पोलीसांच्या कार्यवाहीत गेल्या तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे… ड्रग्ज जाळ्याचा मूळ स्त्रोत अजूनही गुलदस्त्यातच आहे....
VO 01 ::- लातूर… शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर… पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय… मुंबई आणि हैदराबादहून लातुरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की, मागील तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं…लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन मोठ्या कार्यवाही करत अकरा जणांना अटक केली आहे… तरीही या ड्रग्ज सिंडिकेटचं मुळापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
बाईट ::- पालक
बाईट ::- पालक
VO 02 ::- लातूर शहरात टाकलेल्या धाडीत घरातच ड्रग्जचा बाजार सुरु असल्याचं उघडकीस आलं… हे ड्रग्ज थेट मुंबईहून लातुरात मागवले जात होते… आणि त्याची विक्री होत होती. सूत्र नी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स शहरातील कॉलेजमधल्या बड्या घरातील विद्यार्थ्यांना सप्लाय केलं जात होतं. तर लातूरच्या सूत मिल परिसरात चक्क पर्समध्ये ड्रग्ज ठेवून खुलेआम विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. विशेष म्हणजे ज्या परिसरात ती वास्तव्यास होती त्या परिसरात शिक्षणासाठी लातुरात आलेले विद्यार्थी होते.आणि तिचं टार्गेटही हेच विद्यार्थी होते. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करून लातूर शहराला ड्रग्स ला लागलेली कीड हि कायमस्वरूपी काढावी अशी मागणी आता पालकांनी केली आहे. मात्र या सर्व प्रकारांमध्ये पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे…
बाईट ::- पालक
VO 03 ::- लातूरमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठीचा हा संगनमताचा डाव आता पोलिसांनी कारवाई करून उघडकीस आणला खरा पण या जाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजे आहे. लातूरच्या शिक्षणावरचा हा ड्रग्जचा डाग पोलीस पुसणार का ? आणि मुळ सूत्रधारावर कारवाई करून हा खेळ कधी थांबणार ? हे पाहावं लागणार आहे....
......................###................
वैभव बालकुंदे
ZEE मिडिया लातूर
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 14, 2025 12:08:13Shirdi, Maharashtra:
Anc - जास्त परतावा मिळवा हमखास फायदा होईल अश्या गोडगोड आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून शिर्डीतील "ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट" कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा गंभीर प्रकरण समोर आले आहे..विशेष म्हणजे या कंपनीचा सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील हा साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याचा मुलगा मुख्य आरोपी असून या फसवणुकीत त्याच्या कुटुंबासह एकूण सात जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी नंदुरबार मधील शहादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून भूपेंद्र त्यांच्या ताब्यात आहे.. नंदुरबार पोलिसांनी कारवाई करत भूपेंद्राच्या घर सील केल आहे... भूपेंद्र सावळे वगळता इतर आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांचा शोध घेण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे...
V/O - भूपेंद्रने "ग्रो मोर इन्वेस्टमेंट" या नावाची कंपनीची गेल्या पाच वर्षांपूर्वी शिर्डीत स्थापना केली. संस्थान कर्मचारी असलेल्या राजाराम साळवे याने साई संस्थान मधील अनेक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत, मी ही संस्थान कर्मचारी आहे.माझ्या मुलाच्या कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल अस सांगितलं आणि अनेंक संस्थानच्या कर्मचाऱ्यांना या कंपनीच्या जाळ्यात ओढले.यानंतर झाला ग्रो मोर कंपनीचा गंडा घालण्याचा खेळ सुरू..साईबाबा संस्थान जवळपास 60 टक्के कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केलेल्यांना पैशाचा परतावा वेळेवर मिळण्यास सुरू झाला अन भूपेंद्र सावळे पाटील हा सर झाला. आरोपी भूपेंद्र पाटील याचा वडीलांनसह इतर नातेवाईकांनी हळूहळू कंपनीचे जाळे साई संस्थान मधील कर्मचाऱ्यांसह शिर्डीत व पंचक्रोशीत पसरवले गुंतवणूकदारांची संख्याही वाढण्यास सुरू झाल्याने भूपेंद्रची लाइफस्टाइल ही हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली. दहा बाय-दहाच्या घरात राहणाऱ्या भूपेंद्रने शिर्डीत एक मोठा बंगला घेतला.. मात्र आज तो बंगला नंदुरबार पोलिसांनी सेल केला आहे.. या बंगल्या समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
WKT कुणाल जमदाडे शिर्डी
V/O - दरम्यान या प्रकरणी माजी खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देताना हा घोटाळा मीच उघड केला अस स्पष्ट केलं... आर्थिक फसवणुकीत न्याय मिळणे अवघड आहे मात्र आपण याबाबतीत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पाठपुरावा करावा करू अस आश्वासन सुजय विखे यांनी दिल...
Bite - सुजय विखे , माजी खासदार
V/O - विखे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राजेंद्र पिपाडा यांनी देखील या प्रकरणी आवाज उठवला असून अनेक लोकांनी शेती विकून कर्ज काढून या योजनेत पैसे गुंतवले आहेत... या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी राजेंद्र पिपाडा यांनी केली..
Bite -राजेंद्र पिपाडा , भाजप.नेते व विखे विरोधक अशी ओळख...
V/O - साई संस्थांच्या 21 कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर यात अजूनही वाढवण्याची शक्यता असून हा घोटाळा जवळपास 300 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
Bite - अनिल आहेर , साई संस्थान कर्मचारी
Bite - विजय गुंजाळ , साई संस्थान कर्मचारी
V/O - शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये भूपेंद्र आणि त्याच्या सहकार्यांविरोधात खालील कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत.भारतीय दंड संहिता कलम 318(4) 316(2) 3(5) महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अॅक्ट 1999 अंतर्गत कलम 3
सध्या पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक स्पष्ट झाली असून अजून अनेक गुंतवणूकदार काही दिवसातच पुढे येतील.शिर्डी पोलिसांनी इतर पीडित गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार करावी अस आवाहन केले आहे.
*गुन्हा दाखल आरोपी..*
1)भूपेंद्र राजाराम सावळे ( पाटील ) उर्फ सर (मुख्य सूत्रधार)
2) राजाराम भटू सावळे , पाटील (आरोपीचे वडील)
3)भाऊसाहेब आनंदराव थोरात
4)संदीप सावळे , पाटील
5) सुबोध सावळे , पाटील
6)अरुण रामदास नंदन
7)पूजा गोकुळ पोटींडे
*असा आहे ग्रो मोरचा फसवणुकीचा फॉर्म्युला..*
1)सुरुवातीला काही महिन्यांचे हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण केला.
2)नंतर मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन दिले.
3)अचानक शिर्डीतील कार्यालय बंद, फोन बंद, कुटुंबासह फरार.
4)महागड्या गाड्या हायफाय राहणीमान, अधिकचा खर्च करत गुंतवणूकदारांना भूरळ पाडल्याचा फंडा.
5)आरोपीच्या वडलांनी संस्थान मधील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत मी ही संस्थान कर्मचारी असल्याचा वापरला फंडा.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 14, 2025 12:07:33Beed, Maharashtra:
बीड : गायरान जमिनीच्या प्रश्नावर माजलगावात धडक मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग..!
Anc : बीड जिल्ह्यात सध्या गायरान जमिनींचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील गायरान जमिनींवर पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आल्याचा निषेध करत मानवी हक्क अभियान यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिकांनी वहितीमध्ये असलेल्या गायरान जमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावे करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. गावागावातील शेतकऱ्यांना या जमिनीवर हक्क मिळावा, यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष रस्त्यावर उतरले होते.
3
Share
Report
MKManoj Kulkarni
FollowJul 14, 2025 12:04:43Mumbai, Maharashtra:
अँकर -- आज मुंबई आणि महाराष्ट्रातील हॉटेल,बार रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले.सरकारने लावलेल्या कर प्रणालीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद करण्यात आला आहे.हॉटेल व्यावसायिकांची आहार संघटना त्यांनी हा बंद पुकारला आहे.या संघटनेचे अध्यक्ष यांनी
चा जो बंद आहे तो आम्ही सरकारला जी दरवाढ करण्यात आली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही केला आहे
सरकारची taxation policy मुळे आमच्या होटेल क्षेत्रात फार मोठा बद्दल पडला आहे
या policyमुळे आमचा बिजनेस २५ टक्के कमी झाला आहे ..
मागच्या अनेक दिवासांपासून आमच्या समस्या आम्ही सरकारला सांगितल्या देखील असल्याचे म्हटलं आहे.
Byte -- सुधाकर शेट्टी.अध्यक्ष आहार
मनोज कुळकर्णी
Byte attach २C
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 14, 2025 12:04:26Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ranjangaon Ganpati Chaturthi
File:02
Rep: Hemant Chapude(Ranjangaon)
Anc: संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे लाडक्या बाप्पाचा गाभार आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून ,बाप्पाला डाळिंबाचा महानैवेद्यही दाखवण्यात आला यावेळी चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया रांजणगाव पुणे...
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 14, 2025 11:39:55Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug' Chakan Bike Accident CCTV
File:01
Rep: Hemant Chapude(Chakan )
चाकण / पुणे
चाकण तळेगाव महामार्गावर खालुम्ब्रे गावच्या हद्दीत अपघात...
भरधाव कंटेनरने चिरडल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू तर दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी
खेड तालुक्यातील खालुंब्रे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला अपघात...
अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद....
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
1
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 14, 2025 11:39:39Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Shaktipith Virodh
Feed :-2C
Anc :- शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर सह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं.. पार्श्वभूमीवर आज शक्तिपीठ संघर्ष समितीची तातडीची बैठक कोल्हापुरात पार पडली.. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे कार्यालय असलेल्या अजिंक्यतारा कार्यालयात ही बैठक झाली.. बैठकीला इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शक्तीपीठ विरोधी शेतकरी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 शेतकऱ्यांनी समर्थन दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणं आहे मग त्यांना बारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या हजारो हरकती दिसत नाहीत का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.. समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावं आम्ही शक्तीपीठ विरोधातील शेतकरी घेऊन बिंदू चौकात येतो समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं म्हणत प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला शक्तिपीठ विरोधी कृती समितीने आव्हान दिलय.. शेतकऱ्यांचा संताप झाला तर विधानसभेचे अधिवेशनाचे कामकाज सुद्धा चालणार नाही असा देखील इशारा यावेळेस देण्यात आला..शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला महापुराचा विळखा बसणार आहे.त्यामुळे कोल्हापुरात या महामार्गाविरोधात लवकरच महामेळावा घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला..
Byte : विजय देवणे, सह संपर्कप्रमुख शिवसेना ठाकरे गट
Byte :- रविकिरण इंगवले, जिल्हा प्रमुख
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 14, 2025 11:38:44Yeola, Maharashtra:
अँकर:-अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज तसेच विविध संघटना यांनी मिळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निवेदन दिले याप्रसंगी आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली
0
Share
Report