Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध, मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान!

PNPratap Naik1
Jul 14, 2025 11:39:39
Kolhapur, Maharashtra
Story :- Kop Shaktipith Virodh Feed :-2C Anc :- शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर सह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं.. पार्श्वभूमीवर आज शक्तिपीठ संघर्ष समितीची तातडीची बैठक कोल्हापुरात पार पडली.. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे कार्यालय असलेल्या अजिंक्यतारा कार्यालयात ही बैठक झाली.. बैठकीला इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शक्तीपीठ विरोधी शेतकरी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 शेतकऱ्यांनी समर्थन दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणं आहे मग त्यांना बारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या हजारो हरकती दिसत नाहीत का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.. समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावं आम्ही शक्तीपीठ विरोधातील शेतकरी घेऊन बिंदू चौकात येतो समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं म्हणत प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला शक्तिपीठ विरोधी कृती समितीने आव्हान दिलय.. शेतकऱ्यांचा संताप झाला तर विधानसभेचे अधिवेशनाचे कामकाज सुद्धा चालणार नाही असा देखील इशारा यावेळेस देण्यात आला..शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला महापुराचा विळखा बसणार आहे.त्यामुळे कोल्हापुरात या महामार्गाविरोधात लवकरच महामेळावा घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.. Byte : विजय देवणे, सह संपर्कप्रमुख शिवसेना ठाकरे गट Byte :- रविकिरण इंगवले, जिल्हा प्रमुख
7
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top