Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत 'ग्रो मोर' गुंतवणूक घोटाळा: भूपेंद्र सावळे फरार!

KJKunal Jamdade
Jul 14, 2025 12:08:13
Shirdi, Maharashtra
Anc - जास्त परतावा मिळवा हमखास फायदा होईल अश्या गोडगोड आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून शिर्डीतील "ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट" कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा गंभीर प्रकरण समोर आले आहे..विशेष म्हणजे या कंपनीचा सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील हा साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याचा मुलगा मुख्य आरोपी असून या फसवणुकीत त्याच्या कुटुंबासह एकूण सात जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी नंदुरबार मधील शहादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून भूपेंद्र त्यांच्या ताब्यात आहे.. नंदुरबार पोलिसांनी कारवाई करत भूपेंद्राच्या घर सील केल आहे... भूपेंद्र सावळे वगळता इतर आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांचा शोध घेण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे... V/O - भूपेंद्रने "ग्रो मोर इन्वेस्टमेंट" या नावाची कंपनीची गेल्या पाच वर्षांपूर्वी शिर्डीत स्थापना केली. संस्थान कर्मचारी असलेल्या राजाराम साळवे याने साई संस्थान मधील अनेक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत, मी ही संस्थान कर्मचारी आहे.माझ्या मुलाच्या कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल अस सांगितलं आणि अनेंक संस्थानच्या कर्मचाऱ्यांना या कंपनीच्या जाळ्यात ओढले.यानंतर झाला ग्रो मोर कंपनीचा गंडा घालण्याचा खेळ सुरू..साईबाबा संस्थान जवळपास 60 टक्के कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केलेल्यांना पैशाचा परतावा वेळेवर मिळण्यास सुरू झाला अन भूपेंद्र सावळे पाटील हा सर झाला. आरोपी भूपेंद्र पाटील याचा वडीलांनसह इतर नातेवाईकांनी हळूहळू कंपनीचे जाळे साई संस्थान मधील कर्मचाऱ्यांसह शिर्डीत व पंचक्रोशीत पसरवले गुंतवणूकदारांची संख्याही वाढण्यास सुरू झाल्याने भूपेंद्रची लाइफस्टाइल ही हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली. दहा बाय-दहाच्या घरात राहणाऱ्या भूपेंद्रने शिर्डीत एक मोठा बंगला घेतला.. मात्र आज तो बंगला नंदुरबार पोलिसांनी सेल केला आहे.. या बंगल्या समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... WKT कुणाल जमदाडे शिर्डी V/O - दरम्यान या प्रकरणी माजी खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देताना हा घोटाळा मीच उघड केला अस स्पष्ट केलं... आर्थिक फसवणुकीत न्याय मिळणे अवघड आहे मात्र आपण याबाबतीत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पाठपुरावा करावा करू अस आश्वासन सुजय विखे यांनी दिल... Bite - सुजय विखे , माजी खासदार V/O - विखे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राजेंद्र पिपाडा यांनी देखील या प्रकरणी आवाज उठवला असून अनेक लोकांनी शेती विकून कर्ज काढून या योजनेत पैसे गुंतवले आहेत... या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी राजेंद्र पिपाडा यांनी केली.. Bite -राजेंद्र पिपाडा , भाजप.नेते व विखे विरोधक अशी ओळख... V/O - साई संस्थांच्या 21 कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर यात अजूनही वाढवण्याची शक्यता असून हा घोटाळा जवळपास 300 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर Bite - अनिल आहेर , साई संस्थान कर्मचारी Bite - विजय गुंजाळ , साई संस्थान कर्मचारी V/O - शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये भूपेंद्र आणि त्याच्या सहकार्‍यांविरोधात खालील कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत.भारतीय दंड संहिता कलम 318(4) 316(2) 3(5) महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्ट 1999 अंतर्गत कलम 3 सध्या पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक स्पष्ट झाली असून अजून अनेक गुंतवणूकदार काही दिवसातच पुढे येतील.शिर्डी पोलिसांनी इतर पीडित गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार करावी अस आवाहन केले आहे. *गुन्हा दाखल आरोपी..* 1)भूपेंद्र राजाराम सावळे ( पाटील ) उर्फ सर (मुख्य सूत्रधार) 2) राजाराम भटू सावळे , पाटील (आरोपीचे वडील) 3)भाऊसाहेब आनंदराव थोरात 4)संदीप सावळे , पाटील 5) सुबोध सावळे , पाटील 6)अरुण रामदास नंदन 7)पूजा गोकुळ पोटींडे *असा आहे ग्रो मोरचा फसवणुकीचा फॉर्म्युला..* 1)सुरुवातीला काही महिन्यांचे हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण केला. 2)नंतर मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन दिले. 3)अचानक शिर्डीतील कार्यालय बंद, फोन बंद, कुटुंबासह फरार. 4)महागड्या गाड्या हायफाय राहणीमान, अधिकचा खर्च करत गुंतवणूकदारांना भूरळ पाडल्याचा फंडा. 5)आरोपीच्या वडलांनी संस्थान मधील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत मी ही संस्थान कर्मचारी असल्याचा वापरला फंडा.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top