Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर: शिक्षणाच्या शहरात ड्रग्जचा धंदा, पालक चिंतित!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 14, 2025 12:08:43
Latur, Maharashtra
लातूर PKG... स्किप्ट ::- लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्जचा बाजार ? .. लातूर मध्ये तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त.... AC ::- शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं लातूर… पण आता इथंच शिक्षण घेणारी तरुणाईच अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाले आहे…पोलीसांच्या कार्यवाहीत गेल्या तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे… ड्रग्ज जाळ्याचा मूळ स्त्रोत अजूनही गुलदस्त्यातच आहे.... VO 01 ::-  लातूर… शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर… पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय… मुंबई आणि हैदराबादहून लातुरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की, मागील तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं…लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन मोठ्या कार्यवाही करत अकरा जणांना अटक केली आहे… तरीही या ड्रग्ज सिंडिकेटचं मुळापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे. बाईट ::- पालक  बाईट ::- पालक  VO 02 ::- लातूर शहरात टाकलेल्या धाडीत घरातच ड्रग्जचा बाजार सुरु असल्याचं उघडकीस आलं… हे ड्रग्ज थेट मुंबईहून लातुरात मागवले जात होते… आणि त्याची विक्री होत होती. सूत्र नी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स शहरातील कॉलेजमधल्या बड्या घरातील विद्यार्थ्यांना सप्लाय केलं जात होतं. तर लातूरच्या सूत मिल परिसरात चक्क पर्समध्ये ड्रग्ज ठेवून खुलेआम विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. विशेष म्हणजे ज्या परिसरात ती वास्तव्यास होती त्या परिसरात शिक्षणासाठी लातुरात आलेले विद्यार्थी होते.आणि तिचं टार्गेटही हेच विद्यार्थी होते. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करून लातूर शहराला ड्रग्स ला लागलेली कीड हि कायमस्वरूपी काढावी अशी मागणी आता पालकांनी केली आहे. मात्र या सर्व प्रकारांमध्ये पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे… बाईट ::- पालक  VO 03 ::- लातूरमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठीचा हा संगनमताचा डाव आता पोलिसांनी कारवाई करून  उघडकीस आणला खरा पण या जाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजे आहे. लातूरच्या शिक्षणावरचा हा ड्रग्जचा डाग पोलीस पुसणार का ? आणि मुळ सूत्रधारावर कारवाई करून  हा खेळ कधी थांबणार ?  हे पाहावं लागणार आहे.... ......................###................ वैभव बालकुंदे  ZEE मिडिया लातूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top