Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: महिलांचा विरोध, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज!

PINEWZ
Jun 25, 2025 11:24:45
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2506ZT_JALNA_LATHI_CHARGE (22 FILES) जालना : अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचा विरोध,पोलिसांचा महिलांवर सौम्य लाठीचार्ज न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोस्ट ऑफिस परिसरातील पिवळा बंगला भागातील घटना अँकर : जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये पिवळा बंगला भागात न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.आज पिवळा बंगला परीसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्थानिक महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे. या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केल्यानं पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतरच सदर बाजार पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पिवळा बंगला भागात गेले होते.यावेळी स्थानिक महिलांनी पोलिसांना अतिक्रमण हटवताना जोरदार विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी महिलांवर सौम्य लाठीचार्ज करत जवळपास पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतलय. दरम्यान अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाचे असल्यानं ही कारवाई पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाईट: 1 : वंदना गायकवाड स्थानिक महिला बाईट : सुनिता गोफणे, गुलाबी साडी बाईट :3 : संदीप भारती, पोलीस निरीक्षक,सदर बाजार पोलीस ठाणे, जालना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement