Back
शिर्डीत 300 कोटींचा गुंतवणूक घोटाळा, भूपेंद्र सावळे अटकेत!
Shirdi, Maharashtra
Anc - एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी"ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत.. शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलं असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
V/O - पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय.. भूपेंद्र सावळे या ठगसेनाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केलाय.. शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे.. शिर्डीत देखील या महाठगाने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे.. शिर्डी आणि परिसरातील 21 गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.. 21 गुंतवणुकदारांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
V/O - या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी , काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते.. मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. "गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल" असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले आणि याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली.. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे..भूपेंद्र सावळे याने आपला साखरपुडा करत त्या साखरपुड्यात लाखों रुपयांचा खर्च केल्याचं व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदारांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले आहे.. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement