Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपुरात अम्मा की पढाई केंद्राचे लोकार्पण, विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम!

PINEWZ
Jun 25, 2025 13:11:42
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2506ZT_CHP_STUDY_CENTRE_1 ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात अम्मा की पढाई शिक्षा केंद्राचे झाले लोकार्पण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साह्य करण्यासाठी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचा उपक्रम, आपल्या आईच्या नावाने गरजू- गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आ. जोरगेवार यांनी सुरू केले अभ्यास केंद्र      अँकर:-- चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आज अम्मा की पढाई शिक्षा केंद्राचे उत्साहात लोकार्पण झाले. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साह्य करण्यासाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाची उभारणी केली आहे.  आपल्या आईच्या नावाने गरजू- गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आ. जोरगेवार यांनी हे अभ्यास केंद्र सुरू केले आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह चिमूरचे आमदार बंटी भांगडिया व जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.  काही दिवस आधी या अभ्यास केंद्रात विद्यार्थी निवडीसाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. यातून सुमारे 300 विद्यार्थी निवडले गेले असून त्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठीची आखणी या अभ्यास केंद्रात केली जाणार आहे. मदत- मार्गदर्शनाअभावी कुणाचे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचे  स्वप्न केवळ स्वप्नच राहू नये यासाठी आपण हा उपक्रम सुरू केल्याची भावना आ. जोरगेवार यांनी व्यक्त केली. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement