Back
शिरूरमध्ये 14 मजुरांची बेकायदेशीर सुटका, प्रशासनाचे यश!
HCHEMANT CHAPUDE
Jul 31, 2025 05:50:02
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Shirur Worker Sutka
File:09
Rep: Hemant Chapude(Shirur)
अपडेट व्हिडीओ
Anchor - शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या 14 मजुरांची अखेर सुटका करण्यात महसुलव व पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत हालअपेष्टांत अडकून पडलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले.
आलेगाव पागा येथील एका शेतगुऱ्हाळात 14 मजूर जबरदस्तीने मजुरीसाठी अडकवले गेले होते मालकाकडून मानसिक, आर्थिक सामाजिक छळ होत असल्या बाबतची तक्रार दाखल झाल्या नंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्याने तातडीने घटनास्थळी सर्व मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली असून
सुटकेनंतर सर्व कामगारांना शिरूर तहसील कार्यालयात आणून अधिकृत सुटका प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांच्या मुळ गावी पाठविण्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली
संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 01, 2025 02:01:49Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत आहे.. यावर अंकुश मिळविण्याकरिता अकोला पोलिसांनी गुन्हेगारांची वरात काढत त्यांना नागरिकांची माफी मागायला लावण्याला सुरुवात केली आहे. अशातच जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या परिसरातील आसिफ खान याने दुचाकी वरून अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून पाईपने मारहाण केली असल्याच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन त्याला तात्काळ अटक केली व गुन्हा दाखल केला. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपीची परिसरात दिंड काढून त्याला नागरिकांची माफी मागायला भाग पाडले. तसेच आणखीन पुरावे गोळा करण्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले..
Byte : नितीन लेव्हरकर, पोलीस निरीक्षक, जुने शहर पोलीस ठाणे, अकोला..
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 01, 2025 02:01:11Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0108_GON_DEATH_BODY
FILE - 4 IMAGE
नाल्यात वाहून गेल्याने गुराख्याच्या मृत्यू...
घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला मृतदेह.
Anchor: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असता परिसरात आलेला गणेशघाट नाल्यामध्ये वाहून त्याचा मृत्यूझाला. यादवराव दलपत नेवारे (५९) रा. गणेशटोली बनगाव असे मृतकाचे नाव आहे.
Vo: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी असलेले यादोराव दलपत नेवारे (५९) हा ३० जुलै रोजी १२.३० वाजेच्या सुमारास गाई चारणयाकरीता गेले होता. दरम्यान गणेश घाट नाल्यातील पाण्यामध्ये वाहून गेला. याची माहिती मिळताच आपत्ती निवारण जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत नाल्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सदर इसमाचे मृतदेह घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला. या प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 01, 2025 02:00:52Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0108_BHA_BHONDEKAR_BYTE
FILE - 1 VIDEO
विधानसभेतील मारहाण प्रकरण आता हक्क भंग समितीकडे.... दोषींवर कारवाई होणार असल्याचं भोंडेकर यांचं वक्तव्य....
Anchor :- विधासभेत गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. महाराष्ट्र विधानसभेची गरिमा मातीत मिळवली यावर मुख्यमंत्री यांनी देखील नाराजी व्यक्ती केली होती.. आता हा विषय हक्क भंग समिती कडे आला आहे. या विषयी पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. विधानसभेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन गदारोड करित आहे हा गंभीर प्रकार आहे. तर दुसरीकडे विधानसभेत येण्यासंदर्भात कुठल्याही व्यक्तींना पास दिली जात होतो हा प्रकार चुकीचा असून आता या प्रकरणात व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सत्य तपासाला जाईल व दोषींवर हक्क भंग समिती कडून कारवाई केली जाणार असल्याचं हक्क भंग समिती अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे....
BYTE :- नरेंद्र भोंडेकर, अध्यक्ष हक्क भंग समिती
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:32Yeola, Maharashtra:
अँकर:- सतरा वर्षांपूर्वी मालेगाव शहरात भिकू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल लागला असून सबळ पुराव्या अभावी या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता येवला शहरात शहर पोलीस तथा रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला होता याप्रसंगी देवी खुंट आझाद मैदान मेन रोड टिळक चौक या भागातून हा रूटमार्च काढण्यात आला होता
याप्रसंगी येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
8
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:25Yeola, Maharashtra:
अँकर:- येवला तालुक्यातील अंदरसुल या ठिकाणी पडेगाव रोड परिसरातील कांतीलाल सोनवणे यांच्या शेतावर मादी बिबट्या व दोन पिले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली तसेच या परिसरामध्ये दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला देखील झाला असून परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला असून याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
9
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:18Yeola, Maharashtra:
अँकर:-अनेक दिवसांची प्रतीक्षा संपले असून पुणेगाव दरसवाडी धरणातून डोंगरगाव कालव्यासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्यामध्ये आवर्तन सोडण्यात आले
7
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 01, 2025 01:31:08Lasalgaon, Maharashtra:
अँकर:- लासलगाव बस आगारातील ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने येथील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे या विद्यार्थिनींनी लासलगाव येथील आगारात धडक देत पर्यायी बसची व्यवस्था करून द्यावी अन्यथा एकही बस बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला त्याप्रसंगी एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे प्रवाशांनी ही नाराजी व्यक्त केली दरम्यान शालेय व वेळेवर सोडाव्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या विद्यार्थिनींनी दिला.
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 01, 2025 01:31:01Ambernath, Maharashtra:
ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार.
पत्रकार प्रकाश जाधव यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना इशारा.
Murbad flag
Anchor मुरबाडच्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला १२५ फुटांची मान्यता होती, मात्र सदर ध्वजस्तंभ हा चाळीस फुटच उभारण्यात आलाय , त्यामूळे ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर ध्वज संहितेत नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव यांनी लोक आयुक्त,मूख्य सचिव, यांचेकडे तक्रारी केल्या.मात्र या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे
यांनी दिला आहे.
चंद्रशेखर भुयार ,मुरबाड
9
Report
JMJAVED MULANI
FollowJul 31, 2025 16:32:43Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDJAGTP
BYTE 1
देश हिंदुराष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही आमदार संग्राम जगताप ...
Anchor:-देशातील सर्व बांधवांचे स्वप्न होतं भारत भूमीतील अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे मंदिर व्हावं ते झालंय..उद्याचं स्वप्न आहे की नकाशा वरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे घडला पाहिजे हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो होईपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमातून हे विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत घेऊन जागृती करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेय.. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बोलत होते...
साऊंड बाईट: आमदार संग्राम जगताप...
14
Report
KPKAILAS PURI
FollowJul 31, 2025 16:04:27Pune, Maharashtra:
पिंपरी चिंचवड
अजित पवार भाषण पॉइंटर
pimpri pawar ajit
kailas puri Pune 31-7-25
feed by 2c
-ट्रस्ट कडून मला आग्रह सुरू होता,*पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रम घ्याचं म्हणलं की सहसा नाही म्हणत नाही*
-मुख्यमंत्र्यांची मीटिंग असताना देखील इथे आलो
-आमदार हेमंत रासने यांनी गणेश उत्सव बाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यावर राज्य सरकार म्हणून नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल
-कोरोना काळात काही निर्बंध घालण्यात आले होते
-गणेशोत्सव 175 देशात साजरा केला जातो
-हा उत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल
-वाहतूक कोंडी सुटावी,गर्दी कमी व्हावी यासाठी रिंगरोड चा काम हाती घेत आहे,ज्यांच्या कुणाच्या शेतातून हा रोड जाणार आहे ते थोडे नाराज होणार आहे,पण पुढच्या 50 वर्षाचा विचार केला जातो
-PMRDA रिंगरोड काम सुरू करतोय कुणाच्या शेतातून जाणार असेल तर नाराज होऊ नका भविष्याचा विचार करून करावं लागणार
-हिंजवडी बाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतायत ,ते करताना मला समाधान वाटत नाही पण एकूण परिस्थितीचा विचार करता रस्ते रुंदीकरण करावे लागतीलच
-आता पिंपरीचे रस्ते चांगले आहेत असं म्हणतात पण त्यावेळी अनेकांचा वाईट पना घेतला हे माझ मला माहीत
-पण ज्यांची घरे जमीन जातील त्यांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही
-सगळे मला म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते रुंद आहेत पण त्याना काय सांगू मी कितीजणांना बरोबर वाईट घेतलं,आमदार माऊली लांडगे च्या घरापासून पासून सुरुवात केली,त्याच घर रस्त्याच्या मध्ये येत होतं ते पाडलं,लोक म्हणत होती दादा ह्यावेळी निवडणूकीला नको समोरो जायला अशी परिस्थिती निर्माण झाली होती
-पुरंदर चे विमानतळं होणे आवश्यकच आहे
*Imp*
*आता त्यांना तुमचं आवडतं*.....शहर ( हशा)
-आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पहिलं प्राधान्य पुण्याला आहे
-त्या कंपन्यांना आम्ही इतर ठिकाणी अधिक सोयी सुविधा देतो असं म्हणलं तर ते म्हणतात आम्ही परत जातो,हैदराबाद जातो ,काय करणार सांगा
-आता त्यांना तुमचं आवडतं ... शहर
-गणेश उत्सव काळात पुणे मेट्रो सेवा जास्त काळ सुरू राहील या संदर्भात सूचना देतो पण तुम्ही लोकांनी लवकर घरी जा
सकाळी तर लवकर मेट्रो सुरू होईल सकाळी उठून मलाही कामं करायला आवडतं
बाबांनो ही बंधन आम्ही नाही आणली न्यायालयाने आणली आहे इतक्या काळात 10 वाजता,12 वाजत बंद करण्याचे आदेश आहे,त्यात पण आपण जास्त दिवस आपण गणेशोत्सव साठी जास्त दिवस देत आहोत
-यंदाच्या गणेश उत्सवाला कोणतंही गाल बोट लागू नये अशी अपेक्षा करतो .
-मंडळानी सामाजिक भान ठेवणे गरजेचे
-पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करा
-सामाजिक सलोखा ठेवा
14
Report
JMJAVED MULANI
FollowJul 31, 2025 16:04:22Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDGOPIPDLKR
BYTE 1
दौंड_गोपीचंद पडळकर बाईट
*ऑन_दौंड यवत घटना छत्रपती शिवराय मूर्ती विटंबना*
ही घटना अत्यंत संताप जनक
एक दोन लोकांचा ही कृत्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे श्वास आमचा प्राण.
हिंदू धर्माच खच्चीकरण करण्याचे हेतून केलेलं हे कृत्य आहे.
अखंड हिंदुस्तानाची हिंदू धर्माची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहे.
त्यांनी फार मोठी ही चूक केली आहे त्यांना त्यांच्या भाषेत कळल असे उत्तर देण्याची तयारी हिंदू समाजाची आहे.
कारवाई करा ज्या आरोपीने हे कृत्य केलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करा अशी सरकारकडे मागणी आहे.
याच्या पाठीमागे मोठी टीम असेल त्याचा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
*ऑन_दोघांना ताब्यात*
सोलापूर आणि मुंबईमध्ये 29 तारखेचा रात्री पोलिसांनी छापे टाकले होते.
पोलिसांनी आरोपीचे सीडीआर रेकॉर्ड चेक केलं होतं.
आरोपीने मे महिन्यात हे कार्ड घेतलं होतं म्हणजे कृत्य करण्याच्या हेतूनेच ठरवून केलेल आहे.
पोलिसांनी खोलामध्ये जावं. यवत मध्ये दहा मशिदी आहेत त्याला परवानगी कोणी दिली.
*ऑन_विविध घटना*
या घटना जाणीवपूर्वक आहेत याचा आका कोण आहे शोधलं पाहिजे.
वरवंड गावामध्ये महादेवाचे मंदिराची तोडफोड होते महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता.
मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवला जात आहे ते बंद करा. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत जर कोणास करत असेल तर आपलं सर्वांचं मत एक असलं पाहिजे.
*ऑन_उपाय योजना*
पुण्याचे एस पी कर्तबगार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना माझी विनंती आहे.
या जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या जागेत कोणीही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केला असेल बांधकाम केला असेल तात्काळ त्याची यादी काढली पाहिजे. यवत परिसरात अशी किती बांधकामे झाले आहेत ग्रामपंचायतीने परवानगी दिल्या का.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 31, 2025 15:45:35Nashik, Maharashtra:
मालेगाव, नाशिक ब्रेक -
- मालेगावात SRPF च्या जवानांसह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश
- मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्यानं गृह विभागाकडून खबरदारी
- १७ वर्षानंतर आज सुनावण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल
- पुराव्याअभावी सर्व आरोपींची करण्यात आली निर्दोष मुक्तता
- निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करणार
14
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 31, 2025 13:34:45Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरातील शेकडो खैर जातीच्या झाडांची कत्तल करून तस्करी. रात्रीच्या सुमारास 200 हून अधिक खैर झाडांची बेकायदेशीर तोड करून तस्करी . खैर या महागड्या आणि संरक्षित झाडाची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश . वांद्री धरण प्रकल्प क्षेत्रातील भाताने , दहिसर या भागातून तस्करी करण्यात आल्याच समोर . वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप.
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 13:16:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi dam wkt
Feed by I've u , drone shots पण पाठवले आहेत...
जायकवाडी धरणातून 18 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे, धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलाय, . जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले आणि त्यानंतर पाणी सोडण्यात आले, १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
इतर माहिती
जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
14
Report
PNPratap Naik1
FollowJul 31, 2025 13:04:49Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Raju Shetty Byte
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा काढली जाणार आहे. एक रविवार महादेवी हत्तीनीसाठी ही मोहीम आखली जात असून महादेवी हत्तीन परत करा यासाठी येत्या रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा 45 किलोमीटर पायी पदयात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राजू शेट्टीनी पत्रकार बैठकीत दिलीय. राजू शेट्टीनी या पत्रकार बैठकीत पेटाच्या भूमिके संदर्भात आक्षेप नोंदविला आहे.. पेटाने महादेवी हत्तीनीला गुजरातलाच पाठवा असे का सांगितले असा सवाल उपस्थित करुन सर्व देवस्थान मधील हत्ती पेटा गुजरातच्या वनतारा मध्ये पाठवण्यासाठी षडयंत्ररचत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टीनी केलाय.
Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
14
Report