पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचा गणेश उत्सवावर महत्त्वाचा भाषण!
Pune, Maharashtra:पिंपरी चिंचवड अजित पवार भाषण पॉइंटर pimpri pawar ajit kailas puri Pune 31-7-25 feed by 2c -ट्रस्ट कडून मला आग्रह सुरू होता,*पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रम घ्याचं म्हणलं की सहसा नाही म्हणत नाही* -मुख्यमंत्र्यांची मीटिंग असताना देखील इथे आलो -आमदार हेमंत रासने यांनी गणेश उत्सव बाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यावर राज्य सरकार म्हणून नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल -कोरोना काळात काही निर्बंध घालण्यात आले होते -गणेशोत्सव 175 देशात साजरा केला जातो -हा उत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल -वाहतूक कोंडी सुटावी,गर्दी कमी व्हावी यासाठी रिंगरोड चा काम हाती घेत आहे,ज्यांच्या कुणाच्या शेतातून हा रोड जाणार आहे ते थोडे नाराज होणार आहे,पण पुढच्या 50 वर्षाचा विचार केला जातो -PMRDA रिंगरोड काम सुरू करतोय कुणाच्या शेतातून जाणार असेल तर नाराज होऊ नका भविष्याचा विचार करून करावं लागणार -हिंजवडी बाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतायत ,ते करताना मला समाधान वाटत नाही पण एकूण परिस्थितीचा विचार करता रस्ते रुंदीकरण करावे लागतीलच -आता पिंपरीचे रस्ते चांगले आहेत असं म्हणतात पण त्यावेळी अनेकांचा वाईट पना घेतला हे माझ मला माहीत -पण ज्यांची घरे जमीन जातील त्यांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही -सगळे मला म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते रुंद आहेत पण त्याना काय सांगू मी कितीजणांना बरोबर वाईट घेतलं,आमदार माऊली लांडगे च्या घरापासून पासून सुरुवात केली,त्याच घर रस्त्याच्या मध्ये येत होतं ते पाडलं,लोक म्हणत होती दादा ह्यावेळी निवडणूकीला नको समोरो जायला अशी परिस्थिती निर्माण झाली होती -पुरंदर चे विमानतळं होणे आवश्यकच आहे *Imp* *आता त्यांना तुमचं आवडतं*.....शहर ( हशा) -आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पहिलं प्राधान्य पुण्याला आहे -त्या कंपन्यांना आम्ही इतर ठिकाणी अधिक सोयी सुविधा देतो असं म्हणलं तर ते म्हणतात आम्ही परत जातो,हैदराबाद जातो ,काय करणार सांगा -आता त्यांना तुमचं आवडतं ... शहर -गणेश उत्सव काळात पुणे मेट्रो सेवा जास्त काळ सुरू राहील या संदर्भात सूचना देतो पण तुम्ही लोकांनी लवकर घरी जा सकाळी तर लवकर मेट्रो सुरू होईल सकाळी उठून मलाही कामं करायला आवडतं बाबांनो ही बंधन आम्ही नाही आणली न्यायालयाने आणली आहे इतक्या काळात 10 वाजता,12 वाजत बंद करण्याचे आदेश आहे,त्यात पण आपण जास्त दिवस आपण गणेशोत्सव साठी जास्त दिवस देत आहोत -यंदाच्या गणेश उत्सवाला कोणतंही गाल बोट लागू नये अशी अपेक्षा करतो . -मंडळानी सामाजिक भान ठेवणे गरजेचे -पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करा -सामाजिक सलोखा ठेवा0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
साइकिल चलाओ, शहर बचाओ: केडीएमसी की रैली में सैकड़ों साइकिलिस्ट शामिल
Kalyan, Maharashtra:सायकल चालवा, शहर वाचवा. केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी आंतरराष्ट्रीय सायकल दिन और जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस विभाग आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचे आयोजन केले, “सायकल चालवा, शहर वाचवा” हा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकलप्रियांनी सहभाग नोंदवला. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृतीसाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात अधिकाधिक सायकलचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले आहे या रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईक पोर्ट सायकलिस्ट ग्रुप, एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब, पेडल रिपब्लिक सायकल क्लबसह इतर सायकलप्रेमी संघटनांनी सहभाग घेतला.0
0
Report
शेती के विवाद में शिक्षक सहित तीन ने हमला किया; भाइयों की हालत गंभीर
Beed, Maharashtra:शेतीच्या वादातून शिक्षकाचा हैदोस; तिघांच्या अमानुष मारहाणीतील दोन भावांच्या बरगड्या तुटल्या, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल ANC - बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून खून, खुनाचा प्रयत्न और अमानुष मारहाणीच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. एका दलित महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीची घटना ताजी असतानाच आता शेतीच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतीच्या वादातून एका शिक्षकासह तिघांनी दोन भावांवर हल्ला केला. या मारहाणीत बाळासाहेब तोगे आणि लक्ष्मण तोगे हे गंभीर जखमी झाले असून मारहाणीत अक्षरशः त्यांच्या बरगड्या तुटल्या आहेत. जखमींवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधितांना निर्दयपणे मारहाणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
बारामती में विश्व पर्यावरण दिवस पर साइकिल रैली, नागरिकों का उत्साह बढ़ा
Rui, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती हेल्थ क्लब आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि सायकल वापराला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.0
0
Report
Advertisement
घर गैस सिलेंडर की कीमत 29 रुपये बढ़ी, महिलाओं का रसोई बजट भारी
Nashik, Maharashtra:गॅसचे दर वाढल्याने महिलांच्या किचनचे बजेट कोलमडले अँकर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे आज पासून घरगुती गॅस सिलंडरचा दर 29 रुपयाने वाढला आहे यामुळे महिलांचं किचनचं बजेट कोलमडलय... आधीच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने किराणामाल वाढलाय आणि आता गॅस सिलेंडर चे दर वाढल्याने संपूर्ण बजेट कोलमडून गेलाय महागाई झपाट्याने वाढत आहे मात्र प्रकारात कुठलाही प्रकारची वाढ होत नाही यामुळे घरातील आर्थिक बजेट कसा सांभाळावं असा प्रश्न महिलांना पडलाय... ऐनवेळी वाढत असलेल्या गॅसच्या दराने डोकेदुखी वाढली आहे... गॅसचे दर कमी व्हावे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिलीये... बाईट-पूजा सदगीर बाईट-रंजना भूसणार बाईट- संगीता बाविस्कर बाईट- बाबुराव वाघ0
0
Report
कोल्हापुर के 5 वर्षीय समरजित जितकर ने इनलाइन स्केटिंग में राष्ट्रीय रिकॉर्ड बना डाला
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील अवघ्या साडेपाच वर्षांच्या समरजित जितकर याने इनलाईन स्केटिंग करत लाठी-काठी फिरवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. कोल्हापुरातील वी. एस. खांडेकर स्केटिंग ट्रॅक येथे झालेल्या या विक्रमादरम्यान त्याने एका तासात १५६ फेऱ्या पूर्ण करत १४ किलोमीटर अंतर पार केले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’कडून या विक्रमाची ऑनलाइन नोंद करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते समरजितचा सत्कार करण्यात आला असून त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.0
0
Report
सोलापूर विधान परिषद चुनाव: मोहिते पाटील का गुट चार नेताओं के साथ टूट गया
Pandharpur, Maharashtra:Anchor - विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला स्वपक्षीय आमदारांचीच डोकेदुखी झालेली आहे. आमदार जानकर आमदार नारायण पाटील आमदार अभिजीत पाटील यांनी मोहिते पाटलांची साथ सोडून भाजपच्या सोयीची भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे भाजपने सुद्धा फक्त मोहिते पाटलांवरच टीका करण्याचे ठरवले आहे. विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोहिते पाटील यांनी मात्र आपले समर्थक वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवत भाजपच्या मनसुभ्यांना उधळून टाकले आहे याची सल भाजप सह पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोचत आहे. भाजपसोबत लढत असताना मोहिते पाटील यांची साथ त्यांच्याच पक्षाच्या चार आमदारांनी सोडून दिली आहे. खुद्द माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांनी केसाने गळा कापला म्हणत आपण वसंतराव देशमुख यांना मदत करणार नसल्याचे जाहीर वक्तव्य केलं आहे. माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी सुद्धा अशीच भूमिका घेत वसंतराव देशमुख यांना विरोध केला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी काहीही न बोलता थेट भाजपच्या गोटात जाऊन सामील होण्याचा मार्ग निवडला आहे. तर मोहोळ चे आमदार राजू खरे हे पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या मुलाची उमेदवारी डावल्यानंतर केसाने गळा कापला अशी टीका केली. यावर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हे आपलं घरातील भांडण आहे ते आपण मिटवू अशी सावध भूमिका घेत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळला आहे.या सर्व घटना पाहता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उघड फूट पडल्याचे समोर आल आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या बेइमानीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देऊन या निवडणुकीत मोहिते पाटलांचा पानिपत करण्याच पण केला आहे.मी पोस्टमन आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा तंतोतंत पालन करतो कोणाचा कार्यक्रम करण्याच्या सूचना असतील किंवा कुणाला कार्यक्रमाला लावण्याचा सूचना असतील याचे पालन करणे माझं काम आहे. असं म्हणत मोहिते पाटलांना तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे. असा इशारा दिलेला आहे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा सोलापूर जिल्हा बँकेत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बँक वाचवण्यासाठी लढलो ज्यांना घेतलेली कर्ज भरायची नव्हती त्यांना माझ्या उमेदवारीचा शॉक बसलेला आहे मात्र विजयी झालेल्या नंतरच्या सभेत अकलूज मध्ये मोहिते पाटलांच्या सर्वच आरोपांना उत्तर देऊ असे म्हणत त्यांनीही मोहिते पाटलांना अंगावर घेतल आहे एकूणच सोलापूर मधील विधान परिषदेची निवडणूक ही आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी न राहता मोहिते पाटील विरुद्ध झाली आहे अशातच मोहिते पाटलांची साथ त्यांच्याच चार आमदारांनी सोडल्याने मोहिते पाटील एकाकी पडले आहेत0
0
Report
Advertisement
नाशिक में सीएनजी आपूर्ति बाधित, पंपों पर लंबी कतारें और भारी असुविधा
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात सीएनजीचा तुटवडा... सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी अँकर नाशिक शहरात सीएनजी चा पुरवठा होत नसल्याने शहरातील अनेक सीएनजी पंप हे बंद आहे... यामुळे सीएनजी धारकांना त्रास सहन करावा लागतोय... तर ज्या सीएनजी पंपावर सीएनजी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तासनतास उभं राहावं लागत आहे... सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंपावर भली मोठी रांग पाहायला मिळत आहे.... दीड ते दोन तास वेटिंग वर राहावं लागत आहे... यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झालं चित्र पाहायला मिळत आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
रामलिंग मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्र के कालबाह्य दवाओं पर स्वास्थ्य विभाग की जांच शुरू
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ZEE 24 TAAS च्या बातमी नंतर आरोग्य यंत्रणा सतर्क... संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवला... कालबाह्य औषधांचा साठा कसा आढळला ? चौकशीचे आदेश... प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष.... निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालबाह्य औषधांच्या प्रकरणाची दखल अखेर आरोग्य विभागाने घेतली आहे. या संदर्भातील बातमी ZEE 24 TAAS ने दाखवल्या नंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल سादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कालबाह्य औषधांचा साठा नेमका कसा आढळला, त्याचा रुग्णांवर काही परिणाम झाला का आणि यासाठी जबाबदार कोण, याचा शोध आता प्रशासन घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
बीड़ में अधिकारी बनकर बेरोज़गार युवक से 4 लाख की ठगी, महिला गिरफ्तार
Beed, Maharashtra:बीड: स्वतःला महसूल विभागात अधिकारी असल्याचे भासून जिल्हाधिकारी कार्यालयात 'पीए बनवते' म्हणत बेरोजगार तरुणाला 4 लाखांचा गंडा; महिलेचा धक्कादायक कारनामा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या अंबाजोगाईतुन उघडकीस आलाय.. स्वतःला महसूल विभागातील अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एका महिलेने 24 वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालयात पीए पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 4 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय. इतकेच नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संबंध असल्याचा दावा करत अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला. या प्रकरणी काजल देविदास भट्ट हिच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलيس ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून अधिकचा तपास पोलीस तपास सुरू आहेत..0
0
Report
Advertisement
शरद पवार का बारामती दौरा, LPG कीमतों पर सरकार के कदम उजागर
Kolhapur, Maharashtra:खासदार शरद पवार Byte मुद्दे हा माझा दौरा राजकीय नाही, इथं आल्यावर मी कधी तुम्हाला भेटल्याशिवाय जात नाही जिथं हा कार्यक्रम आहे तिथं अनेक मंडळी वाट पाहत आहेत त्यामुळे मला आज तुम्ही सुट्टी द्यावी ऑन बारामती पाहाणी आधी माहिती घेतो आणि मग नंतर भेट देण्याबाबत ठरवतो. ऑन LPG दरवाढ सातत्याने इंधन दरवाढ होत आहे.. या सर्व गोष्टींचा परिणाम आज सामान्य माणसांच्या प्रपंचावर होत आहे.. प्रधानमंत्री महागाई नियंत्रित ठेवतो असं सांगितले.. नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा झटका द्यायचा हे त्याचं सूत्र आहे याची राजकीय किंमत योग्य वेळी कळेल0
0
Report
पुलिस की गिरफ्त में आया कुख्यात बिल्डर सलमान डोलारे, दो साल से चला आ रहा जाल
Kalyan, Maharashtra:दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकाम, नागरिकांची फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि जमीन व्यवहारातील गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांमध्ये वाँटेड असलेल्या डोलारेला झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रॅंचच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. दूधनाका परिसरातील खोताल मंजिल इमारतीत तो लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. सोलमान डोलारे याच्याविरुद्ध महात्मा फुले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कल्याणमधील युसूफ हाइट्ससह अनेक आरक्षित भूखंडांवर बेकायदा इमारती उभारणे, खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम करणे, तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. याशिवाय जमीन व्यवहारातील फसवणूक, तलाठ्याची बनावट सही, बनावट शिक्के तयार करणे आणि खोटे दस्तऐवज सादर करणे यासारखे गंभीर गुन्हेदेखील त्याच्याविरुद्ध नोंद आहेत. डोलारेला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अटकेमुळे पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
पाटस गोलीकांड: 18 संदिग्धों के खिलाफ केस, 10 गिरफ्तार; पुलिस ने कानून का डंडा दिखाया
Rui, Maharashtra:Anchor_दौंड तालुक्यातील पाटस येथे गरदडे कॉम्प्लेक्ससमोर गोळीबार करत दहशत वजवणाऱ्या आरोपींची यवत पोलिसांनी भर रस्त्यावरून धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला आहे. या प्रकरणात तब्बल 18 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यापैकी दहा संशयित आरोपींना यवत पोलिसांनी अटक देखील केलेली आहे.0
0
Report
Advertisement
नंदुरबार में भेसळयुक्त तेल के खिलाफ बड़ी छापेमारी: 1251 किलो जप्त
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. लाईट बाजार परिसरातील एका ऑईल मिलवर अचानक छापा टाकत तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणतेही अधिकृत ब्रँडिंग, पॅकेजिंग, उत्पादकाचे नाव अथवा बॅच क्रमांक नसलेले खुले स्वरूपातील खाद्यतेल आणि स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान तब्बल १२५१ किलो सैल सोयाबीन तेल आणि रंगवलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, या साठ्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हे तेल मानवी आरोग्यासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण साठा सील करण्यात आला आहे. तसेच तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विक्रेते किंवा दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.0
0
Report
सांगली में रविवार साइकिल रैली, फिट इंडिया संदेश के साथ स्वास्थ्य जागरूकता प्रचार
Sangli, Maharashtra:सांगली पोलीस दलाच्या वतीने सांगली मध्ये संडे सायकल रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल,हा संदेश घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,फिट रहा, हिट रहा, देशासाठी सदैव तत्पर रहा,असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.0
0
Report
12 वर्षीय आदित्य ओलेकार की स्कूल पूल में डूबकर मौत; परिजन प्रशासन पर आरोप
Sangli, Maharashtra:सांगली शहरातील एका नामवंत खाजगी शाळेमध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल मध्ये बुडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आदित्य विकास ओलेकर, वय वर्ष 12 असं या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप आदित्यच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाकडून आरोपाचे खंडन करण्यात आला आहे, या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. आदित्यला पोहता येत नसताना, स्विमिंग पूल मध्ये का नेलं?, पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले. शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. संजयनगर पोलीस ठाण्यात घटनेची पंचनामा झाली असून पुढील तपास पोलीस करणार आहेत. शाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आदित्यचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. शाळा व्यवस्थापक जिनेन्द्र पाटील यांनी आरोपांचे खंडन केला आहे. त्यांनी सांगितले की आदित्यला पोहता येतं का? विचारल्यावर हो म्हणण्यानंतरच त्याला पूल मध्ये सोडण्यात आले.0
0
Report
Advertisement
