Back
गुराख्याचा नाल्यात वाहून मृत्यू, 200 मीटर अंतरावर मिळाला मृतदेह!
PTPRAVIN TANDEKAR
Aug 01, 2025 02:01:11
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 0108_GON_DEATH_BODY
FILE - 4 IMAGE
नाल्यात वाहून गेल्याने गुराख्याच्या मृत्यू...
घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला मृतदेह.
Anchor: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असता परिसरात आलेला गणेशघाट नाल्यामध्ये वाहून त्याचा मृत्यूझाला. यादवराव दलपत नेवारे (५९) रा. गणेशटोली बनगाव असे मृतकाचे नाव आहे.
Vo: आमगाव तालुक्यातील बनगाव येथील गुराखी असलेले यादोराव दलपत नेवारे (५९) हा ३० जुलै रोजी १२.३० वाजेच्या सुमारास गाई चारणयाकरीता गेले होता. दरम्यान गणेश घाट नाल्यातील पाण्यामध्ये वाहून गेला. याची माहिती मिळताच आपत्ती निवारण जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत नाल्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सदर इसमाचे मृतदेह घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मिळाला. या प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowAug 01, 2025 17:03:56Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_INDAPURWATRPIP
FILE 4
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवन जवळ खाजगी पाईपलाईन फुटली..... पुणे सोलापूर महामार्गावर पाण्याचे फवारेच फवारे.. खाजगी साखर कारखान्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती....
Anchor पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवन जवळ खाजगी पाईपलाईन फुटली गेलीय. सकुंडे वस्ती परिसरात ही पाईपलाईन फुटली असून महामार्गावर पाणीच पाण्याचे फवारे उडत आहेत. एका खाजगी साखर कारखान्याची ही पाईपलाईन असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे जोरदार फवारे उडत असल्याने वाहन चालकांना याचा मोठा त्रास होतोय. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान दाखल झालेत.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 01, 2025 16:47:33Nashik, Maharashtra:
मालेगाव ब्रेकिंग..
- मालेगावात भर रस्त्यावर खून..
- वाढत्या गुन्हेगारीने मालेगाव झाले बीड
- शहरातील नानावटी पेट्रोल पंप जवळ केला खून..
- तीन लोकांनी दुचाकीवर येऊन उभ्या असलेल्या युवकाचा खून..
- धारधार शस्त्र, लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर दगड घालून केला खून..
- मालेगाव शहरात गुन्हेगारी वाढली..
- रात्री बाराच्या सुमारास झाला खून..
- आठवड्यात गोळीबार, धारधार शस्त्रांनी मारहाण आणि आज पुन्हा खून..
- नितीन अर्जुन निकम याचा खून झाला असून मनपा कर्मचारी होता..
- मालेगावात चाललंय तरी काय..?
- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..
- आठवड्यातील घटना बघता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह..
- घटना cctv त कैद..
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 15:47:44Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadevi Eliphant PKG
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत यावी यासाठी लोक चळवळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुजरात वरून वनताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली. पण वनताराने नांदणी मठाला महादेवी हत्तीन परत हवी असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा असा सल्ला दिलाय. त्यामुळे महादेवी हत्तीकडे डोळे लावून बसणाऱ्यांची सध्या तरी घोर निराशा झाली आहे.
GFX In
गुजरात मधील वनतारा विरोधात लोकभावना तीव्र झाल्यानंतर वनताराची टीम कोल्हापुरात..
वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि त्यांची टीम चर्चेसाठी कोल्हापुरात.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांच्यात तब्बल दीड तास बैठक.
महादेवी हत्तीन परत हवी असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा - वनताराची भूमिका
GFX Out
VO 1:- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीन.. महादेवी हत्तीन म्हणजे नांदणीसह मठा अंतर्गत येणाऱ्या 748 गावांतील लोकांच्या गळ्यातील ताईत. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा कायम राखत महादेवी हत्तीन वनताराकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिल्यानंतर नांदणीसह पंचक्रोशीतील हजारो लोक रस्त्यावर उतरले.. याला हिंसक वळण देखील लागलं. कोर्टाच्या आदेशाचा मान राखत नांदणी मठाने महादेवी हत्तीनीला वनताराच्याटीम कडे सुपूर्द केले, पण महादेवी हत्तीन परत मिळावी यासाठी लोक चळवळ सुरू झाली. याचीच दखल घेत वनताराची टीम आज कोल्हापुरात दाखल झाली. वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांच्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दीड तास बैठक झाली.. पण या बैठकीत आम्ही परत द्यायला तयार आहे पण न्यायालयाच्या आदेश झाला तरच ते परत देता येईल असं वनताराच्या टीमने सांगितले. त्यामुळे नांदणी मठाचे मठाधिपती काहीही न बोलता निघून गेले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेतील लोकप्रतिनिधींनी मात्र वनतारा महादेवी हत्तीन परत द्यायला तयार आहे, पण कायदेशीर बाबीची पूर्तता करा असं त्यांचं म्हणणे आहे.. इतकच नव्हे तर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात रिट पेटिशन दाखल करून महादेवी हत्तीन परत आणण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय.
Byte :- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री कोल्हापूर
VO 2:- वनताराची टीम लोक भावनेचा विचार करून महादेवी हत्तीन पुन्हा मठाला तातडीने परत देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलेल असं महादेवी हत्तीन प्रेमींना वाटत होत..पण हत्ती वनताराला हलविणे ही न्यायालयीन प्रक्रियेची बाब असल्याचं सांगत वनताराने हात झटकले आहेत. इतकंच नाही तर जी न्यायालयीन लाढाई यापूर्वी मठाने केली आहे, तीच लढाई केंद्र सरकारच्या मदतीने पुन्हा एकदा लढावी असा सल्ला दिलाय. वनतारा असो किंवा अंबानी कुटुंबीय यांच्या बद्दल कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी वनताराची टीम कायदेशीर बाब असल्याची ढाल घेऊन कोल्हापुरात दाखल झाल्याचे दिसून आले. गरज पडली तर नांदणी परिसरात महादेवी हत्तीनीसाठी वनताराचे युनिट उभे करू असं आश्वासन दिलंय . पण कोर्टाच्या आदेशाशिवाय आपण काही करू शकत नाही अशी हतबलता देखील वनताराने बोलून दाखवली आहे. त्यामुळे सध्या तरी अनेकांच्या गळ्यातील ताईत असणारी महादेवी हत्तीन केंद्र सरकार किव्हा राष्ट्रपती यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय पून्हा परत येईल असं सध्या तरी वाटत नाही..
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
14
Report
KPKAILAS PURI
FollowAug 01, 2025 15:01:39Pune, Maharashtra:
pimpri malegaon
kailas puri pune 1-8-25
feed by 2c
Anchor - ..... मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या समीर कुलकर्णी यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली असून मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सहभाग असल्याची कबुली देण्यासाठी प्रचंड दबाव पोलिसांनी टाकल्याचा आरोप केलाय.. येत्या काळात काँग्रेसचा समूळ नायनाट यासाठीच आपण काम करू अशी भूमिका कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी याच मुद्द्यावर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas1 to 1 sameer kulakarni
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 01, 2025 14:45:34Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक ही महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना आज दिवसभर त्रासाला समोरे जावे लागलंय. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो,जिल्हाधिकार्यांनी आज महसूल दिनानिमित्त कृषी विद्यापीठात महसूल दिनाचे आयोजन केले आहे,महसूल दिनाला कुठ ली ही शासकीय सुट्टी नसते तरी ही जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकार्यासह सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कार्यालयाला टाळ लावून सकाळ पासून महसूल दिनाच्या कार्यक्रमाला गेले, एवढं कमी होत की काय म्हणून आवक जावक विभाग ही दिवसभर बंद होता,सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहावे असा नियम असणारे निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळ दिसून आलं,त्यामुळे नागरिकांचे दिवसभर सर्व काम तर झालेच नाहीत पण निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागली, ताडकळस येथील अण्णा भाऊ साठे यांच्या सभागृहाच्या वादासंबंधी निवेदन देण्यासाठी आलेल्या शेकडो नागरिकांनी सायंकाळ पर्यंत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी वाट बघितली, जिल्हाधिकारी तर आलेच नाहीत,अखेर पूर्णा येथील तहसिलदार बोथीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले,जिल्ह्याच्या विविध भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावं लागलं,पण दिवसाअखेर पर्यंत कार्यालयाचे लॉक काय उघडलेच नाही,आज शुक्रवार आहे,तर उद्या आणि परवा शनिवार रविवारची सुट्टी आल्याने नागरिकांची तीन दिवस कामे खोळंबणार आहेत,महसूल दिन उद्या किंवा परवा सुट्टीच्या दिवशी ही साजरा करता आला असता पण आज काम बुडवून अधिकारी कर्मचारी महसूल दिन साजरा करण्यात व्यस्त होते, नागरिकांना झालेल्या असुविधेबद्दल या नागरिकांशी बातचीत केलीये,आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
wkt with civilier
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 14:32:39Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop circuit bench
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश मिळालय.. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली आहे, त्यामुळे कोल्हापूर सह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्याच्या प्रदीर्घ लढायला यश आलंय. 18 ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी याबाबत नोटिफिकेशन जारी केलेय. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ लढा सुरु होता.. उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच मुळे वकील आणि पक्षकारांनाही मोठा दिलासा मिळालाय. कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय समोर असणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या इमारतीमध्ये डागडूजी आणि इमारत बांधकाम केलं जात आहे.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 01, 2025 14:04:54Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन दहशतवाद असा शब्द वापरल्याने यवतमाळ मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला चपला मारल्या. बस स्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आले.
इस्लामिक दहशतवादाच्या चर्चेच्या काळात हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये हिंदूंना अडकविण्याचे हे षडयंत्र होतं. हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. आधी भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसचे नेते आता सनातन दहशतवाद हा शब्द वापरत आहेत. हा शब्द राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आहे, असे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध नोंदविला.
बाईट : राजू पडगिलवार : महामंत्री भाजप
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 01, 2025 14:04:08Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_BACHABACHI(1 FILE)
जालना |
बदनापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
अवैध धंदे बंद करण्याचं निवेदन घेऊन गेले असताना पोलिस ठाण्यात झाली बाचाबाची
अँकर | अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचं निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झालीय.जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलाय.बदनापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करा या मागणीचं निवेदन घेऊन गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना स्टंट बाजी करता का.?अस म्हणत पोलिसांनी पोलिस ठाण्यातून धक्के मारत बाहेर काढल्याचा प्रकार घडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय.दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिल्या नंतर आज बदनापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यासाठी गेले असता पोलिस निरीक्षकांनी स्टंट बाजी आणि दादागिरीची भाषा करता का.?म्हणत पोलीस आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राम सिरसाठ यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत आणि पोलिसात चांगलीच बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 01, 2025 13:54:06Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0108ZT_CHP_3_ARREST
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील जुनोना भागात देशी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या।प्रकरणी 3 आरोपींना अटक, क्षुल्लक वादातून बाचाबाचीनंतर सख्ख्या भावाची झाली होती हत्या
अँकर:-- 30 जुलै रोजी चंद्रपूर शहरातील जुनोना भागात बुधासिंग टाक- 45 याची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. सख्खा भाऊ सोनू सिंग याने देशी कट्ट्यातून जवळून गोळ्या झाडत बुधासिंगची हत्या केली होती. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. आरोपी पसार झाले असताना चंद्रपूर पोलिसांनी विविध पथकांच्या साहाय्याने आरोपींचा माग काढला. आरोपी सोनूसिंग टाक आणि लाल शहा अशा दोन आरोपींचे निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींना आश्रय दिल्या प्रकरणी पवन पाटील या तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलिसांनी हत्येत वापरलेला देशी कट्टा देखील जप्त केला असून प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत. क्षुल्लक वादाचे पर्यवसान बाचाबाचीत व त्यानंतर गोळीबारात झाल्याची प्राथमिक माहिती निष्पन्न झाली आहे.
बाईट १) ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 01, 2025 13:53:42Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या कुंभारवाडा मध्ये गणपती मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग
Anchor :-गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे .गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या कुंभारवाड्यामध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे .त्यामुळे गणेश मूर्तिकारांचा गणरायाच्या मूर्त्यांच्या कामाचा वेग वाढू लागला आहे .गणरायाच्या आगमनाचे जसे जसे दिवस कमी होत चालले आहेत तसे कामाचा देखील वेग वाढू लागला आहे .गणेश मूर्तिकार गणपतीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत.मूर्त्याना रंग रंगोटी करण्याचे काम सुरु झाले आहे .
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 01, 2025 13:31:04Ambernath, Maharashtra:
ॲम्बुलन्सचा वापर होतोय चक्क वाहतुकीसाठी .
स्टेट बँकेकडून जिल्हा परिषदेला देण्यात आली होती
Murabd ambulance
Anchor - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ठाणे जिल्हा परिषदेला एक ॲब्युलन्स दिली होती , मात् या ॲम्बुलन्सचा वापर चक्क माल वाहतुकीसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड मध्ये समोर आला आहे.
दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक अँब्युलन्स ठाणे जिल्हा परिषदेला दान दिलेली होती, ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हि अँब्युलन्स रुग्णांना तातडीचे उपचार देण्यासाठी वापरत नसुन ती चक्क माल वाहतुकीसाठी वापरली जात असुन बुधवारी ३.३० चे सुमारास ती अँब्युलन्स मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सायरन वाजवत माल घेऊन आल्याने या अँब्युलन्स मध्ये बाहेरील अपघाताचा पेशंट आला असावा असे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना वाटले.परंतु त्या अँब्युलन्स मध्ये चक्क साहित्य असल्याने आरोग्य विभागा कडून स्टेट बॅंकेने दान केलेल्या रुग्ण वाहिकेचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याची चर्चा करत संताप व्यक्त केला.
चंद्रशेखर भुयार , मुरबाड
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 01, 2025 13:19:43Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0108ZT_CHP_TRUCK_FELL
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून खाली कोसळला ट्रक, नायगाव कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात असताना झाला अपघात
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून ट्रक खाली कोसळला. नायगाव कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ड्रायव्हरचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने रेलिंग तोडून ट्रक सुमारे 100 फूट खाली कोसळला. ट्रक च्या केबिन मधून मोठ्या प्रयत्नाने ड्रायव्हरची सुटका करण्यात आली. गंभीर अवस्थेत ड्रायव्हरला चंद्रपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 01, 2025 13:19:37Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME _SAT_ROHIT_PAWAR
सातारा - कोकाटे हे अनुभवी नेते आहेत.त्यांना खेळाचा अनुभव असल्याने कोकाटे चांगला आहे.त्यामुळे खेळ आणि युवा असं मंत्रिपद त्यांना मिळाले असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.भरणे यांना कृषी विभाग दिला आहे त्याला त्यांनी न्याय द्यावा.आज महाराष्ट्रातील सर्व विभाग योग्य पद्धतीनं वागत नाहीत काम करत नाहीत.कृषिमंत्री पदाला मंत्री तर जबाबदार आहेच पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील जबाबदार आहेत.सामान्य लोकांना वाटत होतं त्याचे मंत्री पद जाईल पण खांदे पालट झालं.जनमताचा विरोधात निर्णय देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठं धाडस दाखवलं असा खोचक टोला देखील रोहित पवार यांनी लगावला आहे.
byte - रोहित पवार
विओ - कृषिमंत्री पद घ्यायला कोणी तयार होत नाही ही अंधश्रद्धा असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. कर्तुत्ववान व्यक्तीला संधी दिली तर ते कर्तृत्व दाखवताच.शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते त्यांनी जे काम केलं ते आत्ता पर्यंत तस काम कोणाला करता आलेले नाही.भरणे यांना संधी दिली पण सगळे याच गोष्टीला घाबरत असतील कारण सरकार कडून पैसे मिळत नाहीत.योग्य पद्धतीने काम करत नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.त्यात तीन पक्षाचे सरकार आहे.दुर्दैव असे की अजित पवारांचा पक्षाकडे हे पद आले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य नीती वापरून लोकांच्या जिथं जिथं शिव्या खाव्या लागतील ,अडचण येतील अशी खाती दिल्याचं रोहित पवारांनी सांगितले आहे.
*सातारा:रोहित पवार बाईट पॉइंटर*
*राज ठाकरे यांनी ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये निवडणुका लागतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागा अशा सूचना दिल्या आहेत यावर रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या बाबत सूचक वक्तव्य केल आहे...* राज ठाकरे यांनी पहिली आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.वंचित ने देखील आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा याचा सर्व फायदा निवडणुकीमध्ये भाजपला होतो.
मुंबईमध्ये मराठी अमराठी असा वाद निर्माण केला आहे तो वाद भाजपाकडून निर्माण करण्यात आला आहे.. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भाबडेपणामुळे अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला आहे.. या पुढील काळात मराठी लोकांना बाजूला ठेवून अ मराठी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढणार याचा फायदा त्यांना बिहारमध्ये देखील होणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी सांगितले आहे..
*चौफुला गोळीबार प्रकरणांमध्ये अजित दादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली या प्रश्नावर रोहित पवार यांनी अजितदादा सह सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली पाहिजे.. याच्यापुढे असे काम करण्याचे धाडस कोणाचे झाले नाही पाहिजे..*
अजित पवारां आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक प्रकरणे बाहेर आली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या नेत्यांना तंबी देताना कधी पाहिलं नाही. उलटे प्रोत्साहनच दिले जाते देवेंद्र फडवणीस साहेबांच्या आसपास जे छोटे नेते आहेत त्यांना राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी ठेवला आहे.. मोठ्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीला जाऊन बोलतात पण कान पकडणारा भाजपाचा मोठा नेता अजून पर्यंत पुढे आला नाही..जाणीवपूर्वक बहुजन समाजातील नेत्यांचा वापर केला जातो त्यामुळे बहुजन नेत्याचं नाव खराब होत आहे. त्याचा काही परिणाम भाजपवर होत नाही.. मुद्दामहून द्वेष आणि विष भाजपाकडून पेरलं जात आहे...
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 01, 2025 13:18:36Vasai-Virar, Maharashtra:
Date-1aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR ED
Feed send by 2c
Type-AV
Slug- वसईतील ed कारवाई मोठी अपडेट
आयुक्त अनिल कुमार पवार यांचे रेट कार्ड समोर
आयुक्त पवार यांचे प्रति चौरस फुटामागे २० ते २५ रुपये तर नगर रचना उपसंचालक यांचे प्रति चौरस फुटामागे १० रुपये
Ed मार्फत प्रसिद्ध प्रेस नोट मधील माहिती
अँकर - माजी वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल पवार (IAS) आणि इतरांविरोधात 29 जुलै रोजी मोठी कारवाई केली होती ... या कारवाईची आता ईडी कडून प्रेस नोट समोर आली आहे ....मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक व सातारा येथील 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 1.33 कोटी रुपयांची रोख रक्कम, अनेक मालमत्तांचे कागदपत्रे, बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल डिव्हायसेस जप्त करण्यात आले.
विशेष म्हणजे अनिल पवार यांनी VVCMC मध्ये आयुक्तपद स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, प्रति चौरस फूट 20-25 रुपये , तर नगर रचना उपसंचालक यांचे 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचेही ED च्या तासात समोर आले आहे. या संदर्भात अधिकचा ed कडून करण्यात येत आहे असे या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे ....
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 01, 2025 13:01:49Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाचा पेरा घटला असून शेतकरी आत्ता मका पिकाकडे वळले आहेत. कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. जिल्ह्यात कापसाचे एकूण दोन लाख 19 हजार हेक्टर इतकं क्षेत्र असून त्यापैकी एक लाख 80 हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली आहे. तर दुसरीकडे मक्याचे फक्त 55 हजार हेक्टर लक्षांक असताना जिल्ह्यात तब्बल एक लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात यंदा दुप्पटीने मक्याचे क्षेत्र वाढलं असून कापूस लागवडीमध्ये 25 टक्के घट झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या दरामध्ये वाढ होत नसल्याने शेतकरी आता मक्याकडे वळल्याचं बोललं जात आहे.
Byte - सिताराम चौधरी , जिल्हा कृषी अधिकारी
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report