Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
जायकवाडी धरणातील 18 दरवाजे उघडले, पाण्याचा विस्फोट!
VKVISHAL KAROLE
Jul 31, 2025 13:16:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi dam wkt Feed by I've u , drone shots पण पाठवले आहेत... जायकवाडी धरणातून  18 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात  आले आहे, धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलाय, . जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले  आणि त्यानंतर पाणी सोडण्यात आले,  १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी... इतर माहिती जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 01, 2025 10:18:47
Nashik, Maharashtra:
nsk_reshan feed by stock Anchor नाशिक जिल्ह्यात सुमारे पाच लाख ६४ हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांचे रेशन बंद होणार आहे. जुलैअखेरीस मुदत संपल्यानंतर ही कारवाई होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिलं जातं, मात्र ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. या प्रक्रियेमुळे गरजूंना योग्य लाभ मिळावा, हा शासनाचा उद्देश आहे. के वाय सी करण्यात नाशिक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण २८.५५ लाख शिधापत्रिकाधारक असून त्यातील ३०.१९ लाखांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 01, 2025 09:50:58
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_R2_AGITTION पवनचक्की प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण उग्र – तीन शेतकरी रुग्णालयात दाखल, रस्ता रोको आंदोलन सुरू! आंदोलनाचा आज पाचवा दिवस युबीटीचे आमदार कैलास घाडगे पाटील आंदोलनात सहभागी Anchor धाराशिव जिल्ह्यातील भूम व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पवनचक्की प्रकल्पाच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकल्पामुळे जमिनीवर अन्यायकारकरीत्या अतिक्रमण, नुकसान आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामे करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उपोषण सुरू असतानाच तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात हे आंदोलन अधिकच तीव्र होत असून, या आंदोलनात आमदार कैलास पाटील यांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे. आमदार पाटील स्वतः शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, पवनचक्की प्रकल्प संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करावे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याने शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
6
Report
SMSATISH MOHITE
Aug 01, 2025 09:49:09
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Hosp_Update Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. तर भोकर येथिल उपजिल्हा रुग्णालयात सलाईन लावलेल्या रुग्णाच्या हातावर अनेक डासानीहल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात डास आहेत. गंगाधर वडवळे यांना इथे सलाईन लावलेली आहे. सलाईल लावलेली असल्याने त्यांना हाताची हालचाल करता येतं नाही अश्यात त्यांच्या हातावर अनेक डास हल्ला करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयात महिलेच्या अंगावरून उंदीर जात असल्याच्या प्रकराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. रुग्णालयात स्वछतेबाबत निष्काळजीपणा केल्यास करावाई करण्याच्या नोटीसही सर्वाना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके यांनी सांगितले. Byte - गंगाधर पडवळे - भोकर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण Byte - संजय पेरके - जिल्हा शल्य चिकित्सक -------------------------
10
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 09:46:33
kolhapur, Maharashtra:
नागपूर Ngp CM bhagwat program - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले - या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत... तसेच मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित आहे.... live फ्रेम -------- देवेंद्र फडणवीस (भाषण) डॉ पंकज चांदे आणि श्रीकांत जिचकार यांनी हे संस्कृत विद्यापीठ करता खूप मेहनत घेतली -- इमातील हेडगेवार यांचे नाव दिले.. ज्या विचारला 100 वर्ष होत असताना हे कार्य होतेये --संस्कृत ही ज्ञान भाषा... ज्ञानाचा खजिना आहे.. ही भाषा अजून समृद्ध झाले पाहीजे.. ती पुढच्या पिढीला गेली पाहिजे.. जगातील सगळ्यात समृद्ध भाषा.. अनेक देशात संस्कृतवर सशोधन होतंय... अनेक क्षेत्रात भारताने जी प्रगती केली ते संस्कृतमध्ये आहे ------------ -- जगातल्या सगळ्या संस्कृती नष्ट झाल्या... फक्त भारतीय संस्कृती राहिली.. त्यातील सगळ्यात मोठा घटक संस्कृत भाषा आहे -- देशात 20 संस्कृत विद्यापीठ... आपल्याला गुरुकुल पद्धत ठेवताना... त्याच बरोबर त्याकरता पायाभूत सुविधा आवश्यक आहे.. आम्ही इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच विद्यापीठ करू -- संस्कृत भाषेच्या प्रचार करता या विद्यापीथठाच योगदान असेल. .-- मला वाटतं मानवाक्य म्हणून संस्कृत मर्यादित नको -- इंडो युरोप भाषेत संस्कृतचे अंश आहे -- माझीखंत आहे मी संस्कृत बोलू शकलो नाही .. माझी आई mA संस्कृत होती --मी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करेल ----------------------- सरसंघचालक मोहन भागवत (भाषण) -- आज परिस्थिती सांगते आणि देशाचे सूत्रसंचालक सांगतात सगळ्याच एकमत आहे भारताला आता आत्मनिर्भर व्हावे लागेल.. आपल्या बळावर.. ते वाढले पाहिजे प्रत्येक बळामागे अस्मिता असते.. त्यामगे चित्त असते -- भारताची स्व हहा परंपरेत... इसवीसन 1 ते 1600 पर्यंत... भारत सर्वात सगळ्याबाबतीत अग्रेसर.. -- सत्वच विस्म रण झाले आपली घसरण सुरु झाली.. आणि परकीय आक्रमण चे भक्ष्य झालो -- आणि शेवटचे परकीय आक्रमक असे होते की त्यांनी आपल्या बुद्धीला गुलाम करण्याची पद्धत विकसित केली.. त्यामुळे स्व निर्भर व्हायच असेल तर सत्व कळलं पाहिजे --आपला 'स्व' भाव भाषेतून प्रगट होत असतो --जसा समाजाचा भाव तशी भाषा -- ग्लोबल मार्केट मध्ये वसुदेव कुटूंबम म्हणतो कारण तो आपला स्वभाव --- आपली भाषा विकसित झाली ती संस्कृतवर -- संस्कृत घरोघरी पोहचवणे -- संस्कृत भाषा राजश्रीत व्हायला हवी.. आणि होतेय.. संस्कृत बोलाचालीची भाषा व्हायला हवी -- संस्कृत ज्याला येते तो इतर भाषा लवकर शिकु शकतो ----------------------------------------- प्रेस नोट---- *आत्मनिर्भर भारतासाठी आपले ‘स्व’त्व कळणे आवश्यक, संस्कृतला राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील मिळावा* - प.पु.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे प्रतिपादन नागपूर : वर्तमान परिस्थिती व देशाचे सूत्रसंचालक भारताला आता आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असे सांगत आहेत. आपल्या बळावरच आपली प्रगती होईल. त्यासाठी सर्व प्रकारचे बळ वाढले पाहिजे.आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वारंगा येथील अभिनवभारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरात डॉ.केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ.हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे, डॉ.उमा वैद्य, संचालक कृष्णकुमार पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिथे स्वत्व असते तिथे बळ, ओज व लक्ष्मी यांचा निवास असतो. स्वत्व नसले तर बळदेखील नाहीसे होते. स्वनिर्भरता आली की बळ, ओज, लक्ष्मी आपोआपच येतात. भारताची परंपरा फार प्राचीन आहे. पाश्चात्यांच्या इतिहास गृहित धरला तरी इसवी सन एकपासून सोळाशेपर्यंत भारत सर्वांच्या अग्रेसर होता. आपण आपल्या स्वत्वावर पक्के होते. त्याचे विस्मरण सुरू झाले तेव्हापासून आपली घसरण सुरू झाली व आपण परकीय आक्रमकांचे भक्ष्य बनलो. इंग्रजांनी तर आपल्या बुद्धीलाही गुलाम करण्याची पद्धत विकसित केली. आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले *भाषा ‘स्व’भाव प्रकट करण्याचे साधन* आपला ‘स्व’भाव प्रकट करण्याचे साधन भाषा ही आहे. त्यातून माणसांचा जीवनव्यवहार उभा होता. जसा समाजाचा भाव असतो तशी तेथील भाषा असते. सहजपणे पाश्चिमात्यांनी ग्लोबल मार्केट हा एक वाकप्रचार विकसित केला. मात्र तो अपयशी ठरला. आपण त्यांना वसुधैव कुटुंबकमचा विचार दिला. आपली भाषा हे आपल्या भावाचे फलित आहे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. *संस्कृत भाषेचा जीवनव्यवहारात उपयोग व्हावा* संस्कृत जाणणे म्हणजे भारत जाणणे आहे. ज्याला संस्कृत माहिती आहे तो कोणतीही भाषा लवकर शिकू शकतो. संस्कृत भाषेतून आपली परंपरा, भाव विकसित झाला आहे. ती सर्वांना कळली पाहिजे. जर त्यातून जीवन व्यवहार झाला तर त्यातून संस्कृतचादेखील विकास होईल. शब्दांची सर्वात जास्त संपदा संस्कृतमध्ये आहे व ती अनेक भाषांची जननी झाली. देशातील सर्व भाषांचे मूळ संस्कृतमध्येच आहे. देशकाल परिस्थितीनुसार भाषेचा विकासदेखील होत असतो. संस्कृत जीवनव्यवहारात आली पाहिजे आणि आपल्याला बोलता आली पाहिजे. *संस्कृतला लोकाश्रय मिळावा यासाठी विद्यापीठांवर मोठी जबाबदारी* संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे. त्याच्या संभाषणाचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी संस्कृत विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे असे नाही. संस्कृत भाषा कळत नाही, पण परंपरेने पाठांतर असलेली घरे भरपूर आहेत. घरोघरी संस्कृत पोहोचून त्यातून संभाषण होणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेला राजाश्रय पाहिजे. भारतीयांचे स्वत्व जागे करण्यासाठी देशातील सर्व भाषांचा व त्या भाषेची जननी संस्कृतचा विकास व्हायला हवा. भाषेला राजाश्रयासोबत लोकाश्रयदेखील मिळायला हवा. यासंदर्भात संस्कृत विद्यापीठावर मोठी जबाबदारी येते. संस्कृतला लोकाश्रय मिळावा यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हायला हवे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
2
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 01, 2025 09:17:02
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TREE_PLANATION चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात महसूल दिनी वृक्षारोपण; अमरावतीत आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन अँकर :- महसूल दिनाच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात अमरावती जिल्ह्यात तब्बल एक लाख वृक्षा रोपण करण्यात येणार आहे, तत्पूर्वी नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, आमदार राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा पार पडला.. यावेळी प्रामुख्याने वृक्षांचे पूजन करून वृक्षारोपनाला सुरुवात करण्यात आली.. यावेळी अमरावती जिल्ह्यातील सात विद्यालयातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते, एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून महसूल दिन सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरणाची निसर्ग पटवून देण्यात येणार आहे
10
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 09:16:47
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे ------ नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह शुभारंभ झालेला आहे राज्याच्या सर्व पालकमंत्री याचा समारंभ आपापल्या जिल्ह्यात करत आहे मी नागपूर जिल्ह्यात केला आणि भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताह मध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेषतः वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देणे मोजणी करून झाडे लावणे , छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविण्यात वाळू धोरणानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाला योजना घरकुल मिळण्यासाठी सात दिवसात काम केलं जाणार महाराष्ट्राचे सगळे महसूल अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील सगळ्यांनी याचा संकल्प केला आहे 17 सप्टेंबर प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे प्रधानमंत्री मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोंबर जयंती यापर्यंत पंधरा दिवसांचा सप्ताह पाळला जाणार आहे हे अभियान सुरू केले जाणार आहे त्याची तयारी आम्ही केलेली आहे तुकडे बंदी पासून तर NA पर्यंत काम केली जाणार आहे रद्द करण्याचे कायदे सुद्धा आम्ही केले आहेत महसूल कार्यालयात 13 हजार प्रकरने प्रलंबित आहेत ते प्रकरणे निपटारा करण्यासाठी आमचा अभियान राहणार आहे आता मी काही पट्टे वाटप केले 18 - 19 महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला आहे सगळे अधिकारी महसूल अभियान पूर्ण करतील उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसाचे महसुली चर्चासत्र ठेवण्यात आलेला आहे उद्या एक वाजता चर्चा सुरू होईल त्यात सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त उपस्थित राहणार आहे 2047चा विकसित महाराष्ट्र या दृष्टीने आमचा प्लान तयार केला आहे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती प्रेझेंटेशन इथे होणार आहे ऑन कोक्कटे - *माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय अजित दादा एकनाथ शिंदे जी यांनी जो निर्णय घेतला असेल तो जनतेमध्ये जो आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय झाला असेल त्यावेळी मी नव्हतो* *एक गोष्ट मात्र पक्की आहे जनतेला असं वाटते किंवा आक्रोश तयार होतो तेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो अजितदादांच्या पक्षाची ती जबाबदारी होती अजित दादांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असेल आणि कृषिमंत्री पद बदलला असेल* ऑन लाडकी बहीण - मी तुम्हाला वारंवार सांगतो की चुकीच्या बातम्या देऊ नका ते काही योग्य नाही लाडक्या बहिणीची योजना जी आहे मागासवर्गीय समाजातील महिला सुद्धा लाडक्या बहिणी आहे शेड्युल टाईप मधील महिला सुद्धा लाडक्या बहिणी आहे सामाजिक न्याय विभागांमध्ये मागासवर्गीय विभागातील महिला साठी त्या विभागाचा निधी वापरला असेल जर सामाजिक न्याय विभागाचा पैसा ओपन कॅटेगिरी साठी वापरला असता तर तो वळविला असं म्हणता आलं असतं मात्र यामध्ये कुठलाही निधी वळविण्यात आला नाही यामुळे फेकनेरिटी तयार होतो ज्या समाजासाठी जो पैसा राखीव आहे त्यातून तो मिळाला तर सरकार असं कधीही करत नाही जो हेड ठरला आहे त्याच हेड प्रमाणे बजेट पैसे खर्च होतात कोणते हेडचे पैसे कोणत्याही बजेटमध्ये खर्च करता येत नाही लाडक्या बहिणीने सामाजिक न्यायचे पैसे दिले असेल मला माहित नाही पण तुम्ही सांगत म्हणून तर ते सामाजिक न्याय मधल्या लाडक्या बहिणी असेल त्यांच्याकडे गेले असेल ऑन शिवसेना चिन्ह - माननीय सुप्रीम कोर्टाने टिपणी केल्यावर त्यावर बोलणे योग्य नाही ऑन सिंधी बांधव पट्टे वाटप - सिंधी समाज बांधवांसाठी पट्टे वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यासाठी त्यांचे आभार मानतो त्यांचा अभिनंदन करतो त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये पाच लक्ष सिंधी समाजाचे परिवार आहेत जे विस्थापित झाले आहे देशाच्या फाडणीनंतर ते इथे आलेले आहेत फाडणीपासून त्यांच्या वस्त्या बसल्या आहे त्याचे स्वामित्व त्यांना मिळालं नाही पट्टे मिळाले नव्हते त्यावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा मुळे पाच लाख सिंधी परिवारांना न्याय मिळणार आहे त्यांना पट्टे मिळणार आहे..
6
Report
JJJAYESH JAGAD
Aug 01, 2025 09:01:57
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आता सक्रिय झाले आहेय..वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईला सुरुवात झाली आहेय. शहरातील मुख्य रस्त्यांवर,बाजारपेठांमध्ये आणि चौकांमध्ये झालेले अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेय..या मोहिमेअंतर्गत रस्त्याच्या कडेला लावलेले हातगाडीवाले, अनधिकृत फळविक्रेते, दुकानदारांचे वाढीव टपऱ्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात येत आहेत..पोलीस विभागाने यासाठी विशेष पथके तयार केली असून, महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचीही मदत घेतली जात आहेय..ही कारवाई दिवसेंदिवस शहरातील विविध भागात सुरू ठेवली जाणार आहेय..प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक रस्त्यांचा वापर सुरळीत आणि अडथळामुक्त करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहेय..
9
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 01, 2025 09:00:24
Yavatmal, Maharashtra:
AVB पिकपाणी साठी Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव परिसरात अद्यापपावतो पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कपाशी, सोयाबीन व तूर पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. पिकांच्या लागवडीला दीड महिना लोटला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात कुठे अति पाऊस तर कुठे पावसाची कमतरता अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही तेथील शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसले आहेत. शेतकरी आधीच संकटात आहे, अपेक्षित असलेली कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. बाईट : गजानन अक्कलवार : शेतकरी
14
Report
SNSWATI NAIK
Aug 01, 2025 08:48:58
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: सायबर चोरट्यांनी केली व्यावसायिकाची 52 लाख 80 हजारांची आर्थिक फसवणूक. traders 52 lakh 80 thousend chitting ftp slug - nm cyber crime shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: एका व्यावसायिकाशी संपर्क करुन क्रिपटो ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आलेय. एका बनावट वेबसाईट वर गुंतवणूक केलेल्या रकमेवर मोठा लाभ झाल्याचे दर्शवण्यात आले मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्यासाठी प्रयत्न केले असता पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर चोरट्यांनी तब्बल 52 लाख 80 हजार रुपायांची आर्थिक फसवणूक केली असून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलेय.
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 01, 2025 08:48:35
Pandharpur, Maharashtra:
01082025 slug - PPR_BANANA_KARPA file 01 ------ Anchor - सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उजनी धरण काठी केळी उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या केळी पानावरील करपा रोगाने शेतकरी हैराण झाले आहे. केळीवरील करपा रोग हा एक महत्वाचा रोग आहे, जो सिगाटोका नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग केळीच्या पानांवर पिवळे किंवा तपकिरी रंगाचे ठिपके तयार करतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन फळांचे उत्पादन घटते. रोगाच्या वाढीसाठी आर्द्रता हा महत्त्वाचा घटक. पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवामान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेत योग्यप्रकारे हवा खेळती ठेवणे, जमिनीची चांगली मशागत करणे, संतुलित खत व्यवस्थापन करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे खते वापरणे. या उपायांमुळे केळीवरील करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते आणि चांगले उत्पादन मिळू शकते.
12
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 01, 2025 08:34:42
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_PIKPANI(2 FILES) जालना : पावसाची उघडीप,शेती कामांना वेग फवारणी, खुरपणीच्या कामांना वेग,अनेक ठिकाणी खतांच्या मात्रा देण्याचही काम सुरु अँकर | जालना जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे.कालपासून जिल्ह्यातील पाऊस थांबला आहे.पावसानं विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये मशागतीला वेग आला आहे.पिकांवर फवारणी, खत टाकण्याचं काम वेगाने सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
11
Report
GMGANESH MOHALE
Aug 01, 2025 08:19:23
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0108ZT_WSM_GOAT_DEATH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गवरील कुपटा घाटात वेगाने येणाऱ्या ट्रक रस्त्यावरून जात असलेल्या बकऱ्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून,एक बकरी गंभीर जखमी झाली आहे.मृत बकऱ्या मानोरा येथील माजी सैनिक आणि शेतकरी रशिद खान यांच्या मालकीच्या होत्या.या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेअसून,परिसरातील शेतकरी आणि पशुपालक वर्गात संतापाची भावना आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त रस्त्यांवर योग्य ती वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याची मागणी केली जातं आहे.
14
Report
MAMILIND ANDE
Aug 01, 2025 08:19:14
Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 0108_WARDHA_AATMDAHAN वर्ध्यात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने अंगावर डिझेल घेत केला आत्मदहनाचा केला प्रयत्न वर्धा नगर परिषद कार्यालयात घडला धक्कादायक प्रकार अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात व्यक्त केला संताप अँकर - वर्धा शहरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात वर्धा हॉकर्स युनियन अध्यक्ष आसिफ खान याने नगर परिषद कार्यालयात अंगावर डिझेल घेऊन आत्मदाहानाचा प्रयत्न केलाय. गेल्या काही दिवसापासून वर्धा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरु आहे. पण या मोहिमेत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आलाय. सामान्य माणसाचे अतिक्रमण हटविण्यात आले तर श्रीमंताचे अतिक्रमण तसेच ठेऊन भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. संतापलेल्या अतिक्रमण धारकांनी आज नगर परिषद गाठली, दरम्यान हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आसिफ खान यांनी अंगावर डिझेल घेतआत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमनाचा विरोध करीत नारेबाजी देखील करण्यात आली आहेय. सदर आसिफ याने एक दिवसापूर्वीच परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती आहे.
12
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 08:16:15
Kolhapur, Maharashtra:
Kop Keshavrao Bhosale Feed :- Live U Anc :- कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या भक्षस्थानी पडलं होत. या घटनेला येत्या काही दिवसात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे कामाला गती आली आहे. नाट्यगृहाच्या स्टेजवरील छताचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील झपाट्याने सुरू आहे. राज्य सरकारने केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीच्या माध्यमातून चार टप्प्यात केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम सुरू आहे. पहिला टप्पा सात कोटीचा असून त्यामध्ये भिंती रेस्टोरेशन, ग्राऊटिंग, छत उभारणीच्या कामाचा समावेश आहे.. Anc :- इतर तीन टप्यातील कामे कशा पद्धतीने होणार आहेत, त्यावर एक नजर टाकूया. GFX In दुसऱ्या टप्पा 3.20 कोटींचा आहे, त्यामध्ये नाट्यगृह इंटिरियर, सजावट, खुर्च्या याचा समावेश आहे. तिसऱ्या टप्पा 11.20 कोटींचा असून स्टेज, लाईटिंग, वातानुकूलन या कामाचा समावेश आहे. तर चौथ्या टप्यासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध असून त्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लिविंग रूम, कलादालन याचा समावेश आहे. GFX Out
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 01, 2025 08:15:21
Beed, Maharashtra:
बीड: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह; साहित्य दिंडीने अण्णाभाऊंना अभिवादन Anc:बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. चांदणे वाडा ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्यरत्न रथ देखील बनवण्यात आला होता. या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दिंडीत कर्नाटकातील वाजंत्री पथकाने आपली कला सादर केली. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी देखील यादरम्यान करण्यात आली. जयंती निमित्त शहरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
12
Report
Advertisement
Back to top