icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जुलाई की भारी बारिश से जून की कमी पूरी, रायगढ़ में जलसंकट टला

Chendhare, Maharashtra:अन्‍कर-जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जून महिन्यातील पावसाची तूट पूर्णपणे भरून निघाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 66 टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणे आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये तब्बल 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. हेटवणेसह 28 पैकी 23 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदाच्या वर्षी पाणीटंचाईचे संकट टळल्याचे चित्र आहे. मागील दोन महिन्यात जिल्हयात पावसाने 2000 च्या टप्‍प्‍यावर ओलांडला आहे. अजून दोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने यंदा वार्षिक सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
0
0
Report

रत्नागिरी में भारी बारिश, अगले 3 दिन ऑरेंज अलर्ट जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाचा हाहाकार; पुढील ३ दिवस 'ऑरेंज अलर्ट', नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा! रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, हवेतल्या तीव्र बदलांमुळे हवामान खात्याने रत्नागिरीसाठी आजसह पुढील तीन दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.. गेल्या २४ तासांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार संततधार सुरूच असून, यामुळे सर्वच प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.. जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून ओसंडून वाहत असून अनेक भागांत पाणी रस्त्यावर आले आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना हाय अलर्टवर राहण्याचे आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे.. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
0
0
Report

राजापूर के अर्जुना डैम में 100% पानी भराव; 2.41 क्यूमेक्स विसर्जन शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. dam ओवरफ्लो.. दमदार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100 टक्के भरलं असून सांडव्यावरून 2.41 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाची पाणीपातळी 177.05 मीटर आहे.. धरणात सध्या 72.56 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.. धरण भरल्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व अनुषंगिक भागात प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच धरणावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, नाले तसेच धरणाच्या परिसरात किंवा अनुषंगिक भागात प्रवेश करू नये. स्वतःची व इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे..
0
0
Report
Advertisement

केळघर घाट 28 जुलाई से सभी प्रकार के यातायात के लिए बंद

Satara, Maharashtra:सातारा - सातारा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे केळघर घाटातील काळा कडा परिसरात वारंवार दरडी कोसळत असल्याने, मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर येत असल्याने हा केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २८ जुलैपासून केळघर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रशासनाने मेढा–मालदेव मंदिर–मार्ली–भिलार–महाबळेश्वर तसेच मेढा–कुसुंबी–सह्याद्रीनगर–माचुतर–महाबळेश्वर हे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. घाटातील परिस्थिती सुरक्षित झाल्यावरच मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
0
0
Report

उल्हासनगर- अम्बरनाथ रेलवे रूट पर लोहे का बॉक्स, सतर्कता से बड़ा हादसा टला

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स सीएसटी लोकलच्या मोटरमन-गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळला कर्जतकडे जाणाऱ्या रुळावर ठेवण्यात आला होता बॉक्स उल्लेख: उल्हासनगर अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ सीएसटी लोकलच्या मोटरमनने हा बॉक्स पाहून गार्डला याबाबत सूचना दिली. यानंतर लोकल थांबवून गार्डने प्रवाशांच्या मदतीने हा बॉक्स उचलून बाजूला केला. या घटनेची माहिती आरपीएफ आणि जीआरपीलाही देण्यात आली. हा बॉक्स जर रुळात तसाच राहिला असता तर तो एखाद्या लोकल किंवा भरधाव एक्स्प्रेसच्या कॅटल गार्डमध्ये अडकून अपघात झाला असता. मात्र केवळ सीएसटी लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. दरम्यान, हा लोखंडी बॉक्स रेल्वे रुळावर कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, त्यामागे अपघात किंवा घातपात घडवण्याचा हेतू होता का? याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
0
0
Report

नांदेड कांग्रेस में आंतरिक घमासान: अशोक चव्हाण पर बड़ा आरोप

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेडचा काँग्रेस पक्ष खासदार रविंद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधला असा गंभीर आरोप काँग्रेसच्याच महानगर कार्याध्यक्षांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. काँग्रेसचे खासदार हे वेळोवेळी अशोक चव्हाण यांना मॅनेज होत असल्याची लेखी तक्रारच महानगर कार्याध्यक्षांनी पक्षश्रेष्ठीकडे केलीये. त्यामुळे नांदेड काँग्रेसमध्ये अजूनही अशोक चव्हाणांचीच चलती आहे अश्या चर्चाना उधाण आलय. नांदेड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या अवतीभोवती फिरत असतं. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र चव्हाण भाजपमध्ये सामील झाले. चव्हाण हे भाजपमध्ये सामील झाले असले तरी अजूनही काँग्रेममधील पदाधिकाऱ्यांवर त्यांचीच पकड असल्याची चर्चा होत असते. आता तर काँग्रेसच्या महानगर कार्याध्यक्षांनीच लेखी पत्र देऊन उद्या असंतोषाला वाचा फोडली. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधलाय असा गंभीर आरोप महानगर कार्याध्यक्षांनी केलाय. खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्षाचे स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्यांना पद दिल्याचा आरोप करण्यात आलाय. महानगरपालिका निवडणुकीत गरज नसताना वंचित बहुजन सोबत आघाडी केली. निवडणुकीसाठी आलेली रसदही उमेदवारांना पुरवली नसल्याचा आरोपही पत्रात करण्यात आलाय. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत स्वतःच्या काकाला आणि मामीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्याशी हातमीळवनी करून पक्षाच्या इतर उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याचे महानगर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण म्हणाले. काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले. सर्व पदाधिकाऱ्यांची निवड ही प्रक्रीयेनुसार पक्षश्रेष्ठीनी केली. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर लावलेले सर्व आरोपही बिनबुडाचे असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षाणी सांगितले. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून गेले असले तरी नांदेड काँग्रेसवर त्यांची पकड असल्याचे बोलल्या जाते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस थेट प्रखर विरोधी भूमिका घेतानाही दिसत नाही. असे असताना आता काँग्रेस कार्याध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे नांदेड काँग्रेसचा अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय.
0
0
Report
Advertisement

पंढरपूर MLA आवताडे ने भीमा-नीरा नदी के पानी से तलाव भरवाने की मांग जल संपदा मंत्री से की

Pandharpur, Maharashtra:भीमा और नीरा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने तलाव भरून देण्याची मागणी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी जल संपदा मंत्र्या कडे केली आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये उजनी कालव्यातून मंगळवेढा तालुक्यातील नंदुर बोराळे कर्जाळ, कात्रळ हुळजंती भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली आहे. निरा उजवा कालव्यातून पंढरपूर मधील रांजणी कासेगाव कोर्टी गादेगाव बोहाळी या परिसरातील छोटे मोठे तलाव तिसंगी मधील साठवण तलाव भरून देण्याची मागणी केली आहे
0
0
Report

देवगांव के किसान ने बिबट्या से बचाने के लिए बंदिस्त गोठा बना लिया

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव... द्राक्ष, ऊस आणि दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाणारे हे गाव. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मीपरिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक वेळा पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याने मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. याच धोक्याचा विचार करून दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या गाईंच्या सुरक्षेसाठी आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा उभारला आहे. मजबूत लोखंडी जाळ्या आणि सुरक्षित दरवाजांमुळे रात्रीच्या वेळी जनावरे पूर्णपणे सुरक्षित राहतात. बंदिस्त गोठा असल्याने जनावरांना उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी गोठ्यामध्ये मोठे फॅन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हवा खेळती राहते आणि जनावरांनाही आरामदायी वातावरण मिळते. बिबट्यांच्या वाढत्या धोक्यामुळे आता देवगावातील इतर शेतकरीही अशाच प्रकारचे सुरक्षित गोठे उभारण्याचा विचार करत आहेत. वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढत असताना सुरक्षिततेचा हा उपाय इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा में गरीब किसान की बैलजोड़ियों के लिए समाज ने दी 1.15 लाख रुपये

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पाटण तालुक्यात बोर्गेवाडी येथील एका गरीब शेतकऱ्याच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावल्याने मोठे संकट ओढावले होते. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत या शेतकऱ्याचा बेंदूर सण गोड केला आहे. अवघ्या दिवसात जमा झालेल्या मदतीतून तब्बल १ लाख १५ हजार रुपयांची नवीन बैलजोड़ी शेतकऱ्याला भेट देण्यात आली. पाहूया हा माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास... व्हॉईस ओव्हर – 1 पाटण तालुक्यातील बोर्गेवाडी येथील यशवत बोर्गे हे अत्यंत गरीब शेतकरी... काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने त्यांची बैलजोडी दगावली आणि ऐन शेतीच्या हंगामात त्यांच्या संसाराचा आधारच हिरावला गेला. शेतीची सर्व कामे ठप्प झाल्याने बोर्गे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते. व्हॉईस ओव्हर – 2 या घटनेची माहिती मिळताच गावा शेजारील फडतरवाडी या गावातील एका छोट्या श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाजाला मदतीचे आवाहन केले. या एका आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो दानशूर नागरिकांनी अवघ्या काही दिवसात मदत गोळा झाली आणि नवीन बैलजोडीसाठी लागणारा संपूर्ण निधी जमा झाला. व्हॉईस ओव्हर – 3 यानंतर बेंदूर सणाच्या शुभमुहूर्तावर यशवंत बोर्गे यांनी स्वतःच्या पसंतीने तब्बल १ लाख १५ हजार रुपयांची नवीन, देखणी बैलजोडी खरेदी केली. ही बैलजोडी त्यांच्या गोठ्यात सुपूर्त करण्यात आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. बैलांना पूजन करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही या माणुसकीच्या कार्याचे कौतुक केले. संकटात सापडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याला समाजाने दिलेला हा आधार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बाईट यशवंत बोर्गे (शेतकरी) श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानचे प्रतिनिधी शंकर साळुंक्हे मदत करणारे ग्रामस्थ एका आवाहनाला हजारो हात पुढे आले... अवघ्या काही दिवसात निधी उभा राहिला... आणि बендूरच्या पवित्र दिवशी एका गरीब शेतकऱ्याच्या गोठ्यात पुन्हा बैलांच्या घंटांचा नाद घुमला. संकटात साथ देणारी ही माणुसकीच समाजाची खरी ताकद असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
0
0
Report
Advertisement

जुन्नर के 14 नंबर क्षेत्र में जहरीली रसायनों वाले कुल्फी कारखाने का भंडाफोड़

Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील '१४ नंबर' परिसरात बनावट आणि घातक रसायनांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या एका कुल्फी और आईस्क्रीम कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, या कारखान्यात दूध किंवा साखरेचा अजिबात वापर न करता केवळ घातक रसायने, लिक्विड डिटर्जंट आणि रंगासाठी थेट पेंटचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारखान्यातील कामगार आणि मालक घटनास्थळावरून पसार झाले असून 'संचिता कुल्फी' (Sanchita Kulfi) या नावाखालahi हे विषारी आईस्क्रीम बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याप्रकरणी कडक कारवाई करून हा कारखाना तात्काळ सील करावा, तसेच दुकानदारांनी या ब्रँडची कुल्फी विक्रीसाठी न ठेवता तात्काळ फेकून द्यावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
0
0
Report

गणेशोत्सव से पहले चिपळूण उड्डाणपुल खुला, कोकणवासियों को ट्रैफिक राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाअपूर्वी कोकणकरांना मोठा दिलासा! चिपळूण उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, ट्रॅफिकमधून लवकरच सुटका.. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅफिकच्या समस्येतून कोकणकरांची अखेर सुटका होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, कामाला कमालीचा वेग मिळाला आहे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येत्या गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत खुला केला जाणार आहे.. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखकर,जलद आणि विनाअडथळा होणार आहे.. सततच्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top