Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102
आमदार संग्राम जगताप: हिंदुराष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही!
JMJAVED MULANI
Jul 31, 2025 16:32:43
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 3107ZT_DAUNDJAGTP BYTE 1 देश हिंदुराष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही आमदार संग्राम जगताप ... Anchor:-देशातील सर्व बांधवांचे स्वप्न होतं भारत भूमीतील अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे मंदिर व्हावं ते झालंय..उद्याचं स्वप्न आहे की नकाशा वरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे घडला पाहिजे हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो होईपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमातून हे विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत घेऊन जागृती करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेय.. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बोलत होते... साऊंड बाईट: आमदार संग्राम जगताप...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Aug 01, 2025 12:49:57
Dhule, Maharashtra:
Anchor- भाजी विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ धुळ्यात समस्त भाजीपाला विक्री संघटनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासनाचा पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देवपूर परिसरात रस्त्यावर बसलेल्या बाजीविक्रीच्यांवर कारवाई करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजी विक्री त्यांनी केला होता. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण धुळे शहरातील होलसेल व रिटेल भाजी विक्री त्यांनी संप पुकारत आज भाजी मंडी पण ठेवली. दरम्यान भाजी करताना हक्काची जागा द्यावी आग्रा रोडवरील फोकसचा प्रश्न सोडवावा यास विविध मागण्या चे निवेदन यावेळी महापालिका प्रशासनाला देण्यात आलं. भाजी विक्रेत्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजीविक्रेते यावेळी मोर्चात सहभागी झाले होते. प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 01, 2025 12:49:06
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- संग्राम जगताप ऑन यवत घटना फीड 2C Anc:- दौंड जवळ असलेल्या यवत येथे व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. काल सायंकाळी एक सभा पार पडली. या सभेला आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबोधित केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यानंतर तिथे आम्ही शांतते सभा घेतली सभा पार पडल्यानंतर देखील तीर्थ वातावरण शांत होतं आज सकाळी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामुळे आज दगडफेक झाली. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केला आहे. बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी AP
1
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 12:30:33
kolhapur, Maharashtra:
आमदार प्रविण दटके, भाजप नेते भटके विमुक्त समाज राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देत आहे. भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून या समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणीतील योगदान पाहता त्यांच्या सन्मानार्थ, उत्तर प्रदेश सरकार व मध्य प्रदेश सरकार यांनी त्यांच्या राज्यात ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या धर्तीवर आपल्या राज्यात ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी मी सरकारकडे केली होती. *काल शासनाने 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस साजरा करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे.* यामुळे, *समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देऊन अंत्योदयासाठी प्रयत्न करणारे* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, इतर मागास कल्याण विभागाचे मंत्री श्री अतुल सावे साहेब आणि भटके विमुक्त विकास परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो.
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 01, 2025 12:06:31
Nala Sopara, Maharashtra:
Date-1aug2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA UPDATE Feed send by 2c Type-AV Slug - नालासोपारा हत्याकांड प्रकरणात पत्नी आणि प्रियकराची पोलीस कोठडी वाढवण्यात आली नालासोपारा – विजय चौहान हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी चमनदेवी चौहान आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा यांना वसई सत्र न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांनी मिळून विजय चौहान याची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली असून, या प्रकरणाचा तपास अधिक वेगात सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींकडे कसून चौकशी केली जात असून, हत्या करण्यामागील नेमके कारण, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
6
Report
AAASHISH AMBADE
Aug 01, 2025 11:49:21
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0108ZT_GAD_BHIK_MANGO ( single file sent on 2C)  टायटल:--  गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने केले आंदोलन, स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मिळत नसल्याने केले भीक मांगो आंदोलन अँकर:--गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आंदोलन केले.  स्वतः मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमिनीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने काँग्रेसने भीक मांगो आंदोलन केले. स्थानिक गांधी चौकात केलेल्या भिक मांगो आंदोलनाने गडचिरोलीवासियांचे लक्ष वेधले. नव्याने सुरू झालेल्या या महाविद्यालयात पदभरतीत होत असलेला विलंब देखील या निमित्ताने  पुढे आलाय. बाईट १) महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
8
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 01, 2025 11:48:19
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- लम्पि प्रादुर्भाव फीड 2C Anc:- अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा लम्पी आजाराने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे... गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात 668 जनावरे बाधित झाली आहेत... धक्कादायक बाब म्हणजे यातील 29 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे... यात राहाता, नेवासा, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, कर्जत या तालुक्यांत जास्त प्रादुर्भाव आहे...प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास 76 हजार लसीच्या मात्र पशुसंवर्धन विभागाने मिळवल्या आहेत...जिल्हाभर लसीकरण सुरू असून पशुपालकांनी घाबरून न जाता लम्पिबाधित जनावरांचे विलगिकरण करण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ उमेश पाटील यांनी दिला आहे...दरम्यान प्रादुर्भाव अधिक वाढल्यास पशुबाजर बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील असंही ते म्हणाले. बाईट:- उमेश पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग
13
Report
YKYOGESH KHARE
Aug 01, 2025 11:38:31
Nashik, Maharashtra:
nsk_shalaband feed by 2C Anchor शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील पाच शासकीय आश्रमशाळांना पालकांनी टाळे ठोकले. 100% शिक्षकांची भरती करण्याची मागणी करणारे आमदार नितीन पवार यांच्या इशाऱ्यानंतर पालकांनी मुलांना घरी नेले. बापखेडा, माणी, बोरपाडा, बुबळी, डोल्हारे व खुंटविहीर येथील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे. त्यात माणी-बोरपाडा येथील शाळांमध्ये कुजलेला भाजीपाला दिसून आल्याने पालक संतप्त झाले. हे मुलांच्या आरोग्याशी खेळ असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
11
Report
SMSATISH MOHITE
Aug 01, 2025 11:34:41
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_HospitalPckg Feed on - 2C ----------------------------- Anchor - शासकीय रुग्णालयांवर उंदीर सेनेने कब्जा केलाय. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्ध रुग्णाचा पाय उंदराने कुरतडला तर एका ग्रामीण रुग्णालयात बेडवर झोपलेल्या महिला रुग्णाच्या अंगावर उंदराने धुमाकूळ घातलाय. पाहुयात या उंदीर सेनेने काय उच्छाद मांडलाय. Vo - नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेच्या अंगावर उंदीर धुमाकूळ घातल्याचा हा व्हिडिओ आहे. या दोन्ही घटनांमुळे शासकीत रुवनालयांवर उंदीर सेनेचा कब्जा असे म्हणण्याची वेळ आलीये. नांदेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 63 वर्षीय रमेश यन्नावार पायावरील एका छोटया शस्त्रक्रियेसाठी भरती झाले होते. डायबेटीक फूट असल्याने त्यांच्या एका तळपायाला छोटी शस्त्रक्रिया करून पट्टी करण्यात आली होती. पट्टी करून ते शस्त्रक्रिया विभागातच आराम करत असताना त्यांच्या उघड्या असलेल्या दुसऱ्या पायाला उंदराने कुरतडले. झी 24 तासने हा प्रकार सोमवारी उघड केला असतानाच आज उंदराचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात एका झोपलेल्या महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असतानाचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने उंदराचा व्हिडिओ मोबाबाईलमध्ये रेकॉर्ड केला. ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा सुलसुळाट असल्याचे काही व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे नांदेड नंतर कंधारच्या रुग्णालयावरही उंदरांचा कब्जा म्हणण्याची वेळ आलीये. दरम्यान कंधारच्या घटनेबाबत वैद्यकीय अधिका-र्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. Byte - संजय पेरके - जिल्हा शल्य चिकित्सक Vo - उंदरांचे हे व्हिडिओ समोर आलेले असताना भोकर येथिल उपजिल्हा रुग्णालयात सलाईन लावलेल्या रुग्णाच्या हातावर अनेक डासानीहल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे. उलट्या झाल्याने एका रुग्णाला इथे सलाईन लावलेली आहे. सलाईन लावलेली असल्याने त्यांना हाताची हालचाल करता येतं नाही अश्यात त्यांच्या हातावर अनेक डास हल्ला करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. Byte - गंगाधर वडवळे - भोकर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण Vo - रुग्णालयाच्या या दुर्दैशेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. कारण वेळेवर इमारत आणि अंतर्गत साहत्याची डागडुजी होत नसल्यानेही समस्या उद्भवतात. रुग्णालयाच्या इमारती बाबत विशेष काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. Byte - शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम मंत्री. Vo - उपचारासाठी पैसे खर्चण्याची एपत नसल्याने गरजू रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. शासन मोठा निधी आरोग्यासाठी खर्च होतो. नांदेडचे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदीर सेनेने कब्जा घेतल्याचे समोर आले तर भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयावर डासांचा कब्जा झालाय. आरोग्य येतंत्रनेला असे कुरतडले जात असताना आता आरोग्य विभाग, सरकार, मुख्यमंत्री काय दखल घेऊन उपाययोजना करतात हे पाहावे लागणार आहे. ------------------------
11
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 01, 2025 11:34:20
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- कोयत्याने हाणामारी cctv फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या कामरगाव येथे कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अन्सार शेख यांना त्यांच्या घराजवळ कोयते, गज आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल आहे. या घटनेच CCTV समोर आले आहे. या प्रकरणी जखमी अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे एकमेकांचे नातेवाईक आहेत पारनेर तालुक्यातील कामरगाव शिवारामध्ये कोर्टामध्ये सुरू झालेल्या खटल्याच्या वादातून अजिज सय्यद, अन्वर सय्यद, गुलाब सय्यद आणि 4 ते 5 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे बाईट:- प्रल्हाद गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर ग्रामीण
8
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 01, 2025 11:18:04
Parbhani, Maharashtra:
अँकर- खरीप हंगामात सोयाबीन पिकाला शेतकरी अधिक पसंती देत असतात. पण यंदा पावसाने मोठ्या प्रमाणात उघडीप दिल्याने सोयाबीनवर पाने खाणार्या आळीचा प्रादुर्भाव झालाय,त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असून किटकनाशकांचा अधिकचा भुर्दंड वाढलाय...
12
Report
KPKAILAS PURI
Aug 01, 2025 11:04:46
Pune, Maharashtra:
pimpri firing kailas puri Pune 1-8-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवड मध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. पिंपरी मधील कॅम्प परिसरात असलेल्या एका व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय...! भावेश ककरानी असं जखमी झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे...! भावेशला पिंपळे सौदागर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...याच घटने संदर्भात घटनास्थळावरून पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी... kailas 1 to 1 + vis
13
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 01, 2025 10:53:42
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग- यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती त्याची विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केले आहे - गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर बाईट पॉईंटर ऑन यवत घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती त्याची विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याला मदत करणाऱ्याला देखील अटक केली आहे. हे सर्व करण्यामागं मोठ षडयंत्र आहे. ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या टीमचा शोध घेऊन युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. कुणालातरी पुढे करून तो दारू पिला होता तो मानसी रुग्ण होता असं कांहीच म्हणणं आहे. ऑन बॉम्बस्फोट निकाल काही लोक मताच्या राजकारणासाठी हिंदू धर्माला बदनाम करत. भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचे निरेटिव्ह काही लोकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदू कधीही आक्रमण करत नाही. भगवा दहशतवाद असं ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्टेटमेंट केलं त्या नेत्यांना माझं आवहान आहे तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे या देशाची माफी मागितली पाहिजे. आणि या भारतात राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची देखील माफी मागितली पाहिजे. कोर्टाने तुमच्या तोंडावरती चपराक मारली आहे. ऑन माजी एटीएस अधिकारी मुजावर त्यावेळेस असणाऱ्या टीम मधील अधिकारी जर असं बोलत असतील या सर्व गोष्टींचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना या केस मध्ये कशासाठी घ्या म्हणत होते याची चौकशी झाली पाहिजे. हिंदूंना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आज या भारतामध्ये जेवढे हल्ले झाले असतील मंदिरावरती जेवढे हल्ले झाले असतील ते कोणी केले हे सगळ्यांना माहिती आहे. हिंदुस्तान मधला हिंदू समाज कधीही दहशतवादाला खतपाणी घालत नाही. दहशतवाद करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. राजकारणासाठी काँग्रेसने भगवा दहशतवाद भारतात आणि महाराष्ट्रात आहे अशा प्रकारचा निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांचा मी धिक्कार करतो. त्यांनी माफी मागितली पाहिजे कसल्याही परिस्थितीत अशी मागणी मी करतो. ऑन सावली बार रद्द मी याच्यावरती बोलण्यापेक्षा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावरती स्पष्ट भूमिका मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर ठेवली. त्याच्यावरती मी आणखीन टिप्पणी करणं योग्य वाटत नाही. ऑन रोहित पवार फेसबुक पोस्ट बार्शी मारहाण प्रकरण रोहित पवारांनी काय स्टेटमेंट केलं याला काही महत्त्व नाही. राजाभाऊ राऊत यांच्याशी मी बोलतो. मला त्यांचा फोन आला होता. मी त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर बोलतो. मला या विषयाची अजिबात माहिती नाही. बाईट- गोपीचंद पडळकर भाजप आमदार
12
Report
JJJAYESH JAGAD
Aug 01, 2025 10:53:10
Akola, Maharashtra:
1 फाईल आहे..AVB Anchor : रोहित पवार यांच्या कोकाटे यांच्यावरील केलेल्या ट्विट नंतर राष्ट्रवादीचे आमदार यांनी त्याला उत्तर दिलंय, रोहित पवार हे पक्षातील उच्च पदावरील असल्याने त्यांचं ट्विट करणं आणि मीडियावर बातम्या चालवणं त्यांचा नित्यक्रम असल्याचं म्हणत मिटकरींनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असलेल्या बाबतचा अहवाल अजून आलेला नाही. माणिकराव कोकाटे रांगड्या स्वभावाचे असल्याने त्यांच्याकडून काही वक्तव्य झाली असतील अशी कबुली मिटकरींनी दिली आहे. आमच्या पक्षाचं आम्ही पाहू तुमच्या पक्षाचं तुम्ही पहा, असा सल्ला मिटकरींनी रोहित पवारांना दिलाय. क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे चांगला न्याय देतील असा विश्वास मिटकरींनी दाखवलाय. Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.
9
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 01, 2025 10:33:50
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या वणी तालुक्यातील बेलोरा ते घुग्गुसला जोडणा-या वर्धा नदीच्या पुलावरून कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक नदीपात्रात कोसळला. सुमारे 100 फूट खाली कोसळल्याने ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा 18 चाकी ट्रक घुग्गुसहून वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात होता. दरम्यान पुलाचे कठडे तोडून ट्रक 100 फूट खाली नदी पात्रात कोसळला. या ठिकाणी बघ यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे बरच का पुलावरून वाहतूक ठप्प झाली.
12
Report
YKYOGESH KHARE
Aug 01, 2025 10:31:50
Nashik, Maharashtra:
nsk_pikvima feed by 2C video 5 Anchor राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा ही योजना बंद केल्यानंतर शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभाग घटलाहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी केवळ ३ लाख ५९ हजार ४८४ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याच समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या ५ लाख ९१ हजार ३६८ शेतकऱ्यांच्या तुलनेत ही संख्या तब्बल ३९ टक्क्यांनी कमी झाली आहे. खरिपासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती. एक रुपयात विमा या योजनेतून भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने ही योजना बंद केली. नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना स्वतःचा हिश्शा भरावा लागत असल्याने अनेकांनी विमा काढणे टाळले आहे. राज्य शासनाच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पीकविमा योजनेत पुन्हा सुधारणा व्हाव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
12
Report
Advertisement
Back to top