Back
पैनगंगा कालव्याची 'मुक्ती', पण शेतकऱ्यांचा 'विकास' वाहून गेला!
MNMAYUR NIKAM
Jun 27, 2025 13:34:29
Buldhana, Maharashtra
पैनगंगेच्या कालव्याला 'मुक्ती' मिळाली, पण शेतकऱ्यांचा 'विकास' वाहून गेला!
Anchor - मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या मुख्य कालव्याने आज प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा अक्षरशः पाणउतारा केला. कालवा फुटल्याने शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांची नासाडी झाली असून, या भीषण नुकसानीला कारण ठरला आहे एक बंद नाला! शेतकऱ्यांच्या मते, कालव्यातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी असलेला नाला बंद असल्याने हा जलप्रलय ओढवला. म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे दावे करणाऱ्या प्रशासनाला एक साधा नाला मोकळा ठेवता येत नाही, यावर आता हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे. या अनास्थेमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, दुबार पेरणीची शक्यता आता शून्य आहे. एकीकडे सरकार 'आत्मनिर्भर' भारताचे नारे देते, तर दुसरीकडे त्यांच्याच बेफिकिरीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. पेरणीसाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
विशेष म्हणजे, हा अनर्थ टळू शकला असता. शेतकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संभाव्य धोक्याची कल्पना दिली होती. पण, नेहमीप्रमाणे 'ऐकतोय, करतोय' अशा आश्वासनांच्या पलीकडे काहीच झाले नाही. 'साहेबांना मोठे कामे असतात, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला वेळ कुठाय?' अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. आज उशिरा, जेव्हा पाणी बांधावरून नाही तर डोक्यावरून गेले, तेव्हा अधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बांधावर अवतरले. अर्थात, ही केवळ औपचारिकता होती. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "आता काय पाहणी करायला आलात? जेव्हा वेळ होती, तेव्हा साधा फोन पण उचलला नाहीत!" असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे 'चौकशी करू' आणि 'सरकार मदत करेल' यांसारखी पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 18:01:3810
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 17:31:4311
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 16:33:099
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 16:32:528
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 16:31:126
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 16:30:314
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 16:30:182
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 16:02:155
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 18, 2025 15:07:0011
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 15:00:225
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 14:20:568
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 14:18:335
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:576
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:175
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:468
Report