Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

बार्शी तालुक्य में अतिवृष्टि और कर्जबाजारी: दो किसानों ने दी जान

AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 06:16:41
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल *अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल* 24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गवसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय तर कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली बाईट : मृत शरद गंभीर यांचे कुटुंबीय
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Sept 26, 2025 08:23:30
Yavatmal, Maharashtra:राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात नऊ दिवस विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी, दिव्यांग व्यक्ती, उद्योजिका, आधुनिक शेतकरी, पत्रकार, वाहतूक क्षेत्रातील कामगार, शिक्षिका, लेखिका, कलावंत, समाजप्रबोधिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रातील महिला या सन्मानास पात्र ठरल्या. पोलीस अधिकारी शुभांगी गुल्हाने, उद्योजिका जोशना भाटपुरे, सामाजिक कार्यकर्त्या सुधा खडके, अधिकारी प्रतिभा पवार, शिक्षिका मीनाक्षी काळे, आधुनिक शेतकरी अनुजा देशमुख यांना सन्मानित करण्यात आले
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 26, 2025 08:16:26
Raigad, Maharashtra:स्लग - राज्यातील अंगणवाडी ताईंना दिवाळीपूर्वीच मिळणार भाऊबीज भेट ...... नवरात्र काळात प्रस्तावाला मान्यता घेणार ...... महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती ....... अँकर - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना यंदाही राज्य सरकारकडून दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे आणि ही भेट दिवाळी पूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. अनेकदा दिवाळी नंतर ही बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते परंतु नवरात्र उत्सव काळातच त्याला मान्यता घेऊन दिवाळी पूर्वीच ही रक्कम जमा केली जाईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. बाईट - आदिती तटकरे, मंत्री
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 08:16:09
Washim, Maharashtra:वाशिम: File:2609ZT_WSM_SCHOOL_VAN_ACCIDENT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशीमच्या कारंजा शहरातील सहारा कॉलनी गायकवाड, भारत नगर येथून आर.जे. कॉन्व्हर्टच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक स्कूल व्हॅन ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून कारंजा मानोरा रोडच्या बाजूच्या खड्ड्यातील चिखलात पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने १३ मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि मानव सेवा हेल्पलाइनचे कार्यकर्ते घटनास्थळी धावून जात सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले.मात्र घटनेची गंभीर बाब म्हणजे शहरातील सिंधी कॅम्प, खान पेट्रोल पंप समोरील रोड आणि स्मशानभूमीच्या आसपास मोठमोठे ट्रक महिनो महीने रस्त्याच्या साईडला उभे राहतात, त्यामुळे याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनाची फिटनेस तपासणे, ड्रायव्हरचा अनुभव आणि स्कूल व्हॅनमध्ये किती मुलं आहेत याची संपूर्ण तपासणी करून मुलांचे पालक ,स्थानिक रहिवाशांकडून पोलिस आणि महामार्ग परिवहन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 26, 2025 08:02:10
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_SENA_HELP उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदे च्या शिवसेनेने केली थेट मदत. किराणा भांडीकुंडी जीवनावश्यक वस्तूचा किट मदत म्हणून दिल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फोन करून कुटुंबाला दिला धीर. उद्धव ठाकरे च्या टीकेला शिंदे सेनेचं मदतीतून प्रत्युत्तर Anchor धाराशिव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव जिल्ह्यातील ईटकुर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं .आज या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट मदत केली. किराणा, चादर, सतरंजी भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूचे किट शिरसाट कुटुंबाला भेट दिल. उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन सांत्वन केलं पण एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष मदत केली अशी भावना या कुटुंबांना व्यक्त केली. धाराशिव चे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कुटुंबांना फोन करून सांत्वन केलं. एवढंच नाही तर तुम्हाला लागेल तेवढी मदत करू असा आश्वासन दिल. मदतीच्या किटवर फोटो लावण्या वरून उद्धव ठाकरे सेना शिवसेनेला सध्या चांगलंच टार्गेट करत आहे या परिस्थितीत शिंदेने उद्धव ठाकरे यांनी भेट दिलेल्या कुटुंबांना थेट मदत करून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे दिसतय. याचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यानी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 26, 2025 08:01:40
Vasai-Virar, Maharashtra:Date-26sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI PROTEST Feed send by 2c Type-AV Slug- वसईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन बहुजन विकास आघाडीचे टाळे मारो आंदोलन अँकर - वसई रोड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बहुजन विकास आघाडीने “टाळे मारो आंदोलन” छेडले. अर्नाळा–वसई राज्य मार्गासह परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, प्रचंड खड्डे, वाढते अपघात आणि प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेविरोधात हे आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, PWD चे उपअभियंता संजय यादव यांनी महापालिकेच्या पाइपलाईन खोदकामामुळे खड्डे तयार झाल्याचे सांगितले आणि येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले. बाईट , मार्शल लोपीस, माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडी बाईट- संजय जाधव, उपअभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 26, 2025 08:01:28
Nashik, Maharashtra:Nashik breaking मंत्री छगन भुजबळ Points - *28 तारखेला बीड मध्ये आमची रॅली आणि सभा होणार आहे* - मागे जे आमच्या रॅली झाले तसेच ही पण सभा होणार आहे - *महात्मा समता परिषेदेच्या वतीने ही रॅली होणार आहे* - *प्रकाश शेंडगे,धनंजय मुंडे सह काही जण येणार आहेत* - पाऊस आणि शेतीचे अडचणी सध्या सुरू आहे - *रोज काही ठिकाणी ओबीसी समाजातील मुलांचे आत्महत्या होत आहेत* - *काही काळजी करू नका आत्महत्या करू नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि विजय मिळवू* - हे संदेश आम्ही रॅली तुन देण्याचा प्रयत्न करणार आहे - अनेक याचिका देखील कोर्टात दाखल झाले आहेत - यात आम्हाला यश मिळणार आहे असे वकील देखील सांगतात - जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही सभा घेऊ - या लढाईत मागासवर्गीय समाजाचा देखील आम्हाला पाठिंबा आहे - बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधान चा सौरक्षण आम्हाला आहे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून लढण्याची इतिहास आहे On मराठवाडा पूर परिस्थिती - मला याबाबत कल्पना नाही ( जिल्हाधिकारी viral विडिओ) - जिल्हाधिकारी प्रमुख चेहरा असतो हे भान ठेवून वागले पाहिजे - शेतकरी आणि त्यांचे कुटुंब रडत आहे On उद्धव ठाकरे ( नरेंद मोदी पाहणी) - देशात अनेक ठिकाणी आशा गोष्टी घडत आहेत - पंजाब मध्ये देखील भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे - पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे - ज्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत भारत सरकार मदत करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे पत्र दिले आहे - मुख्यमंत्री देखील आज दिल्ली ला गेले आहेत 50 हजार हेक्टरी मदत मागणी - प्रत्येक जणांना सारख मदत मिळेल असे नाही - काही ठिकाणी जास्त मदत देण्याची देखील गरज आहे On लाडकी बहीण योजना - जे यात बसत नाही त्यांनी स्वतः हुन यातून नाव काढले पाहिजे - सरकार याबत विचार करेल On नाशिक गुन्हेगारी - मी प्रत्येक्ष याबत पोलीस अधिकारी सोबत बोलेन - सरन्यायाधीश आज येणार आहेत त्यामुळे अनेक जण आज व्यस्त आहेत - त्यामुळे उद्या याबाबत मी चर्चा करणार आहे On मदत - सरकार तुम्हाला मदत करणार आहे धीर सोडू नका - देशात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे - सरकार नाही तर जनता देखील तुमच्या पाठिशी उभे राहील On बनावट रेशीन कार्ड - मी आता अधिकाऱ्यांना बोलावले आहे - या मागे काय कारण आहे त्याची चौकशी करू
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 26, 2025 07:49:41
Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ gfx जोडले आहे ----- नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात शनिवारी उद्या ऐतिहासिक पथसंलन होतेय..*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरातील आतापर्यंतच हे सगळ्यात मोठे पथसंचलन असणार*... 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्याऔचित्याने या पथसंचलनाच आयोजन करण्यात आलेय...तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील.. *या तिन्ही पथसंचलनाचा मार्ग आणि नागपूर महानगरातील कोणत्या भागातील स्वयंसेवक कोणत्या मार्गावरून पथसंचलन करतील याचा विस्तृत आणि आणि Exclusive माहिती आणि मार्ग आपण झी 24 तास वर पाहू शकतो* *पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल*... *या पथकाचे 2.5 किलोमीटरचे पथसंचलन असेल*.. *यामध्ये त्रिमूर्ती नगर, धरमपेठ, गिट्टीखदान आणि सोमलवाडा भागाचे स्वयंसेवक सहभागी होतील* आणि *दुसरे पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचन सुरु करेल... या पथकाचे पथसंचलन 2.9 किलोमीटरचे असेल... मोहिते शाखा, लालगंज, बिनाकी आणि सदर येथील स्वयंसेवक या पथकात सहभागी होतील*... तर *तिसरे पथक यशवंत* *स्टेडियम येथून पथसंचलन सुरु करतील*... *यामध्ये *इतवारी,अजनी,अयोध्यानगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील* *ते पथसंचलन करतील 2.9 किलोमीटरचे पथसंंचलन करतील*... *व्हेरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ तिन्ही पथक एकत्रीत दिसतील* ... *यावेळी सरसंघचालक तिथे तिन्ही पथसंचालनाचे अवलोकन करणार*.. महत्त्वाचे म्हणजे देशाचे केंद्र स्थळ असलेल्या झिरो माइलजवळून हे पथसंंचलन जाणार आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 07:49:14
Navi Mumbai, Maharashtra:story slug - मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा जोडण्याचा प्रस्ताव navi mumbai airport conect bullet train FTP slug -nm bullet train conect nm airport shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पर्यंत एका विशेष मार्गाने जोडण्यात येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भातील एक प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास हा मार्ग देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडेल ज्यामुळे नवी मुंबई आणि गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होण्याची शक्यता आहे. gf बुलेट ट्रेन स्टोक शॉट्स वापरणे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 26, 2025 07:49:05
Nanded, Maharashtra:Slug - Ned_Drone_Shots Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीची पुर परिस्थिती आजही कायम आहे. जायकवाडीसह वरच्या धारणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. काल सायंकाळी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्या पाच दिवसापासून सतत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुर कायम कायम आहे. गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नायगाव तालुक्यातल्या बरबडा, पाटोदा, वजीरगाव, अंतरगाव या गावात गोदावरी नदीचे बॅकवॉटर शिरल्याने या गावात मोठी पूरस्थिती निर्माण झालीये. पुरामुळे शेकडो हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराचे ड्रोन दृश्य टिपले आहेत ड्रोन पायलट भगवान शेवाळे यांनी. --------------
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 26, 2025 07:47:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn marathwada loss over all गेल्या 5 दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि त्यात मोठं नुकसान झालाय मात्र या वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यात एकूणच मोठं नुकसान झालाय, जुन महिन्यापासून सुरू झालेला पाऊस हा मराठवाड्यासाठी नुकसानी चाच ठरला आहे, मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने यंदा च्या पावसाळ्यात आतापर्यंत किती नुकसान झाले याचा एक अहवाल तयार केलाय आणि तो राज्य सरकारला सादर करण्यात आलाय यात नुकसानीचा सर्व समावेशक आढावा घेण्यात आलाय या द्वारे राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार आहे पाहुयात काय आहे अहवालात... अतिवृष्टी आणि पुरामुळे एकूण  86 जणांचा बळी  गेलाय तर 13 लोक जखमी आहेत... शेतकऱ्यांचे एकूण 1725 जनावरांचा मृत्यू झालाय.... तर एकूण मराठवाड्यात कच्ची पक्की घर मिळून 5795 घरांना पूर आणि अतीवृष्टी चा फटका बसला आहे... एकूण 89  गोठे  वाहून गेले आहेत... शेतीपिक नुकसानीचा विचार केला तर एकूण 5893 गावांना याचा फटका बसला, 29 लाख 36 हजार 668 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे...23 लाख 96 हजार 162 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे... यात  जिरायत 2376640 हेक्टर बागायत  6401 हेक्टर तर  12821 हेक्टरवरील फळबागांना झळ बसली आहे... यापैकी 18 लाख 20 हजार 32 हेक्टर चे पंचनामे  पूर्ण झाल्याची शासनाची माहिती आहे , एकूण नुकसान झालेल्या पिकांपैकी 76 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची अहवालात नमूद करण्यात आले आहे....
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 26, 2025 07:35:30
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_CON_VS_BJP पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावतीच्या पंचवटी चौकात काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या मोर्चा; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत मोठा जल्लोष भाजपा आणि काँग्रेस आमने सामने, दोन्ही पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी अँकर :– अमरावतीच्या पंचवटी चौकात काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तर त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे भाजपाच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आसपास असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 07:18:43
Navi Mumbai, Maharashtra:story slug -नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त अखेर ठरला ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतून विमानोड्डाणाचे संकेत navi mumbai airport opening 8 October ? FTP slug - nm airport opening shots- airport work reporter- swati naik navi mumbai Anchor: नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्यासाठी सिडकोसोबत एनएमआयएएलची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाची नवी मुंबईकरांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. Vo1- पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टफ्फ्यात असून सिडकोसह एमएमआरडीए व्यवस्थापन आपआपल्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या तयारीला लागले आहेत. त्याकरिता बैठकांचे सत्र गुरुवारपासून सुरु झाले आहे. विशेष म्हणजे एअर इंडिया समुहाने नवी मुंबई विमानतळावरुन एअर इंडिया एक्सप्रेसची २० उड्डाणे होणार असल्याचे नुकतीच जाहीर केले आहे. देशातील १५ शहरांना या विमानतसेवेद्वारे जोडले जाणार आहे. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरुन ५५ ते ६० उड्डाणे करण्याचा मानस आहे. दरम्यान, नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मुहूर्ताची गत ९ महिन्यांपासून तारीख पे तारीख पडत होती. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-१चे काम वॉर फुटींगवर सुरू असून तब्बल १३ हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत. त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान उडवण्याऐवजी परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवा देखील एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी सुमूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जाते. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी व या देशासाठी निर्माण होणार आहेत. देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून नावारुपास येणार आहे. यासाठी ३७मेगा वॅट ग्रीन एनर्जीचा वापर केला जाणार आहे. तसेच चारी बाजूने या विमानतळाला कनेक्टिव्हीटी प्राफ्त असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापेक्षा या विमानतळाची जास्त क्षमता आहे. विमानतळाच्या २ रनवेचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाकाठी २ कोटी प्रवासी येथून ये-जा करु शकणार आहेत. gf Vo2 - दरम्यान, येत्या ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सदर विमानतळ परिसर सीआयएसएफ च्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यानंतर तब्बल ४५ दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून सदर परिसर सीआयएसएफद्वारा सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून कमर्शियल फ्लाईटसच्या उड्डाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 26, 2025 07:05:55
Ratnagiri, Maharashtra:तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील विवाहिता अपेक्षा अमोल चव्हाण हिचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरेकाशी येथे वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चिपळूण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोन दिवस राबवलेल्या शोधमोहिमेत मृतदेह सापडला. अपेक्षा यांच्याबाबत नेमका काय प्रकार घडला, हे मात्र अजूनही पुढे आलेले नाही. धामापूर येथील अपेक्षा चव्हाण ही घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर अपेक्षा चव्हाण हिच्या मोबाइलचे लोकेशन चिपळूणमध्ये दिसून आले. शहरातील गांधारेश्वर येथील पुलावर तिचा मोबाइल, पर्स व चप्पल आढळल्याने गोंधळ उडाला होता. चिपळूण पोलिसांनी ती बेपत्ता झाल्याची नोंद करून तातडीने शोधमोहीम सुरू केली. गोवळकोट परिसरात वाशिष्ठी नदीपात्रात शोधमोहीम सुरू असतानाच मजरेकाशीच्या किनाऱ्यावर तिचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दिली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top