Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेर पूर्ण, राहुल कुल यांची महत्त्वाची माहिती!

PPINEWZ
Jun 25, 2025 18:51:48
Navi Mumbai, Maharashtra
story slug - सप्टेंबर अखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाच काम पूर्ण होईल - राहुल कुल यांची माहीती FTP slug -navi mumbai airport september byet- rahul kul shots- reporter- swati naik navi mumbai anchor - विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल , मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली.. काही महिन्यातच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने हालचाली वाढल्या आहेत.. सध्या विमानतळाचं काम सुरू आहे.. त्यामुळे विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली.. यावेळी बोलताना विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनी माहिती देताना म्हटल की सप्टेंबरमध्ये विमानतळाचं काम पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळाच्या नावा संदर्भातील अंतिम निर्णय हा शासन स्थरावर होईल.. तर सप्टेंबर अखेर पर्यंत विमानतळाच काम पूर्ण होईल.. बाईट- राहुल कुल , विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Sept 23, 2025 02:48:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_R4_FLOOD धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं – दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार! खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं असून, दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीचा हाहाकार कायम आहे. आठही तालुक्यांत रात्रभर तुफान पाऊस झाला. विशेषत: कळंब तालुक्यात पावसाचा कहर झाला. मांजरा नदीला महापूर आला तर तेरणा नदीनं पात्र सोडून गावात पाणी शिरलं. कळंब तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. तब्बल ९२ गावांवर संकट कोसळलंय. ६० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. प्रशासनाला मात्र मोठं यश आलं – पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. पिकं नाहीत, जनावरे नाहीत… आता नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. न भूतो न भविष्यते अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, पाऊस पुन्हा आल्यास परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. आज सकाळी १० वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पुरस्थिती गंभीर – प्रशासन आणि बचाव पथकांची मोठी कसोटी सुरूच.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 23, 2025 02:46:33
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात मध्यरात्री दमदार पाऊस अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील महाविद्यालय शाळांना सुट्टी Anc: काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील बिंदुसरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. तर अनेक भागात पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या मदतीने बाहेर काढण्यास यश आले आहे. तर पूर परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळा महाविद्यालय सुट्टी जाहीर केली आहे..
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 23, 2025 02:46:19
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 02:46:05
Akola, Maharashtra:Anchor : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय शिवार फेरीचा उत्साहात समारोप झाला. या शिवार फेरीचे यंदाचे हे ४३वे वर्ष होते.विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांमधून सुमारे १ लाख शेतकऱ्यांनी या शिवार फेरीला उपस्थिती लावली, ही बाब लक्षणीय ठरली. या फेरीत शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती मिळाली, तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.यासोबतच, आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत उपयुक्त ठरणाऱ्या माहितीचा फायदा झाला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ गेल्या ४३ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ही शिवार फेरी आयोजित करत असून, ही परंपरा शेतकऱ्यांच्या शेतीत नवीन परिवर्तन घडवून आणणारी आणि माहितीचा खजिना उघडणारी ठरत आहे.शिवार फेरी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक आणि वरदान ठरते आहे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.शिवारफेरीचे हे ड्रॉन दृश्य आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत आमचे प्रेक्षक पप्पू मोहोड यांनी..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 02:45:49
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 02:45:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:33:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn flight start av Feed attached छत्रपती संभाजी नगर शहरातून हैदराबादसाठी  सकाळच्या सत्रातील विमानसेवा रद्द करण्यात आली होती. मात्र १ ऑक्टोंबरपासून सकाळची सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात आली आहे. तिकीट विक्रीस प्रारंभ झाला असून दसरा-दिवाळीच्या पूर्वसंध्येवर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली आहे. यापूर्वी चिकलठाणा विमानतळावरून दिवसाला दोन विमाने हैदराबादसाठी चालविली जात होती. विमानाला चांगला प्रतिसाद मिळत असून ९४ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी दोन्ही सत्रात आहेत. अचानक बंद केलेली सेवा सुरू करताना सकाळच्या सत्रात केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच विमानसेवा सुरू राहणार आणि प्रतिसाद पाहून नियमित होणार असे विमान कंपन्यांनी सांगितले आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:32:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn car firing av Feed attached छत्रपती संभाजीनगर मध्ये  कार समोर लघुशंका केल्यावरून वाद झाला त्यात स्कुटीवर आलेल्या तिघांनी कार मधील  दोघांवर गोळीबार केला  मात्र गोळी काचेवर लागल्याने अनर्थ टळला या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय... जेवण करून मित्रासोबत बाहेर पडल्यानंतर कारसमोर एकाने लघुशंका केली. यातून वाद होऊन शाब्दिक चकमक झाली. त्यातून या दोन मित्रांवर स्कुटी वरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. प्रसंगावधान राखत दोघे कार घेऊन पुढे निघाल्याने गोळी कारच्या काचेवर लागली. यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना कलाग्राम ते प्रोझोन मॉल मार्गावर घडली. याप्रकरणी वाळुज येथील  प्लॉटिंग व्यावसायिक तोफिक शफिक पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघां विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वाद कशामुळे झाला? गोळीबार करणाऱ्यांचा उद्देश काय होता? याचा तपास  पोलीस करीत आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 23, 2025 02:16:15
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:15:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn marathwada loss av Use file footage मराठवाड्यात खरीप पीक पूर्णतः वाया गेले असल्याचे चित्र आहे,  सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिक उध्वस्त केली, . २२ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९, जालन्यातील १०, बीडमधील २९, लातूरमधील ३, धाराशिवमधील २१ तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.  तर १३ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. पैठण तालुक्यातील आपेगाव मंडळात १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये एकाच दिवसात ७५ मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ६७९ मि.मी. पाऊस झालेला तर यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२ सप्टेंबरपर्यंत ७६९ मि.मी. म्हणजे ११७ टक्के पाऊस झाला होता. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील २२ तारखेपर्यंत मिळून २० लाख ९९ हजार ३०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ४ लाख ९१ हजार हेक्टरवरील पिके मागील नऊ दिवसांत हातून गेली आहेत. तीन महिन्यांतील नुकसानीच्या तुलनेत विभागीय प्रशासनाने शासनाकडे २,३०० कोटींची नुकसान भरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील ५० टक्के म्हणजेच ७०० कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी मिळाली. मात्र तुलनेत नुकसानीचे आकडे मोठे आहेत, या 3 दिवसात नुकसानीत झपाट्याने वाढ झाली आहे... गेल्या नऊ दिवसांतील अतिवृष्टीने सुमारे ५,३२० गावांतील खरीप हंगामातील पिके संपविली. २६६ मंडळांत अतिवृष्टीने थैमान घातले
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 02:01:48
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 01:01:27
4
comment0
Report
Advertisement
Back to top