Back
शेतकऱ्यांचा महामार्ग विरोध: औरंगाबाद-लातूर मार्ग ठप्प!
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 01, 2025 07:01:41
Beed, Maharashtra
बीड : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; औरंगाबाद-लातूर मार्ग ठप्प.. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात...!
Anc : बर्दापूर फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत औरंगाबाद-लातूर महामार्ग बंद केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं. या महामार्गामुळे आमच्या शेतजमिनी जाणार आहेत. यामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होईल, असा आरोप करत आंदोलक शेतकरी आक्रमक झाले. एका तासापेक्षा जास्त वेळ आंदोलन सुरूच असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowJul 18, 2025 06:35:36Pune, Maharashtra:
pimpri action
kailas puri Pune 16-7-25
feed by 2c
हिंजवडी, पुणे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना टायर मध्ये घालून मारा त्यांच्यावर 353 दाखल करा असा इशारा गेल्या रविवारी केलेल्या पाहणीत केला होता..अजित पवार यांच्या या इशाऱ्याचा परिणाम हिंजवडी मध्ये पाहायला मिळू लागला आहे पीएमआरडीएने कारवाई करण्यापूर्वीच हिंजवडी मधल्या वाहतूक कोंडी होणाऱ्या लक्ष्मी चौकात दुकानदारांनी साहित्य काढायला सुरुवात केली आहे त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....
kailas wkt+ vis
1
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 18, 2025 06:35:26Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_TULJA_PASS
धाराशिव -दोन महिन्यात 886 वर्ग 1 च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निशुल्क दर्शनाचा प्रसाद
सामान्य भाविक दर्शना साठी त्रस्त असताना अधिकाऱ्यांना मात्र व्हीआयपी पास देत दर्शनाची खैरात
मंदिर संस्थांचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार उघड
गेल्या दोन महिन्यात तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत सव्वा दोन कोटी रुपये व्हीआयपी दर्शनातून मंदिर संस्थांनाला मिळाले
दोन महिन्यात 18 लाख भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
एकीकडे व्हीआयपी दर्शनातून उत्पन्नात भर मात्र याचाच आधार घेत शासकीय अधिकाऱ्यांना मात्र मोफत दर्शन दिल्याने तुळजापुरातील भाविकात नाराजी
व्हीआयपी दर्शन पास च्या तक्रारी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोफत दर्शन देणाऱ्या
अधिकाऱ्यावर कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा
Byte जयकुमार पांढरे
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 06:35:03Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_DEHU
Total files : 02
Headline -देहू नगरपंचायतीची स्वच्छतेच्या दिशेने राष्ट्रीय क्रमांकात झेप
717 क्रमांकावरून थेट 368 व्या क्रमांकावर
Anchor:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये संत तुकोबांच्या देहू नगरपंचायतने उल्लेखनीय यश मिळवले असून "छोट्या शहरां" वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटात देशात 368 वा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी 2023 ला देहू नगरपंचायतीचा क्रमांक 717 होता. विशेष म्हणजे 2022 साली हाच क्रमांक 1937 हा होता. सलग 2 वर्षात स्वच्छतेत मोठी प्रगती करणाऱ्या संस्थेमध्ये देहू अव्वल स्थानी आहे. ही गरुड झेप म्हणजे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरअध्यक्षा पूजा दिवटे, यांच्या कार्यप्रवणतेची, तसेच कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमांची आणि नागरिकांच्या सहकार्याची साथ लाभल्यामुळे देहू नगर पंचायतीने हा पल्ला गाठला.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 18, 2025 06:33:22Shirdi, Maharashtra:
Anc - श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती राम मंदिर चौकात पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी रामभाऊ सोपान नागरे यांच्या मालकीचे सराफी दुकान फोडून लाखों रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केला आहे.
V/O - श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती चौकात ही धाडसी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी २४ जुलै रोजी शहरातील भगतसिंग चौकात पोलीस मदत केंद्रासमोर असलेले एक सराफी दुकान फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला होता.विशेष म्हणजे , सराफ दुकान हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिला असून एकाच महिन्यात शहर मध्यवर्ती ठिकाणी दोन सराफी दुकाने फुटल्याने पोलीस करतात काय असा सवाल नागरिक करीत आहेत.
Bite - रोहित नागरे , दुकान मालक
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 18, 2025 06:30:16Beed, Maharashtra:
बीड: ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केला होता आत्महत्येचा प्रयत्न..
Anc : महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास गतीने व्हावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणात त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात तो दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आता बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे..
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 17, 2025 16:31:51kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
-------
नागपुरातील लकडगंज परिसरातील एका वाईन शॉप मध्ये काही जणांनी वाद घालत शस्त्र फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना cctv त चित्रित झाली आहे...काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.. वाईन शॉप काऊंटर जवळ वाद घालत सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारी सुरु असल्याच दिसतेय.... दरम्यान एका आरोपीने शस्त्र काढत धमकवतानाही दिसत आहे... याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे.. तर एक आरोपी अल्पवयिन आहे
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 17, 2025 16:03:59Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1707ZT_WSM_VBA_ANJALI_AMBEDKAR
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने बांधणी सुरू आहे.अंजली आंबेडकर ह्या आज वाशिम दौऱ्यात आल्या असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.भाजप किंवा त्यांच्यासोबत असलेल्या कोणत्याही पक्षाशी युती न करण्याचा पुनरुच्चार करत त्यांनी म्हटलं, “आमची लढाई भाजपच्या कट्टर हिंदुत्वविरोधात आहे.” त्यांनी सरकारच्या जनसुरक्षा विधेयकावरही टीका करत, हे विधेयक दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजांमध्ये असुरक्षितता वाढवणारे असल्याचे मत व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिकेत सातत्य ठेवले आहे. निवडणूक आली म्हणून आम्ही भूमिका बदलत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.आनंदराज आंबेडकर यांच्याशी युतीबाबत पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट असून, यावर पुढील टिप्पणी न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
**‘एमडी ड्रग प्रकरणात पक्षाचं नाव चुकीनं जोडलं जातंय’**
अकोला एमडी ड्रग्स प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचा संबंध जोडला जात असल्याच्या आरोपांवर त्यांनी स्पष्ट केलं की, संबंधित आरोपी पक्षाच्या अधिकृत यादीत नाही आणि त्यांना वैयक्तिकरीत्या ओळखतही नाही. अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडलेले असले, तरी त्यांच्या वैयक्तिक वर्तनाबद्दल पक्ष जबाबदार नसतो, असं त्यांनी नमूद केलं.
बाईट: अंजली आंबेडकर,वंचित बहुजन आघाडी
14
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 17, 2025 15:05:28Thane, Maharashtra:
खाजगी ठेकेदाराकडून बिल्डिंगच्या आवारात झाडांची छाटणी केल्यामुळे पक्ष्यांच्या घरट्यासोबत पक्षी खाली पडून अंदाजे ४५ पक्षांचा मृत्यू तर २८ पक्षी जखमी..
घोडबंदर रोड ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात खाजगी ठेकेदाराकडून झाडांची छाटणी केल्यामुळे अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले होते व झाडांच्या फांद्याखाली अडकून पडले होते.
*सदर घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी (WWA), माय पाल क्लबचे कर्मचारी(MYPALCLUB), वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ पिकअप वाहनासह उपस्थित होते.
*सदर घटनास्थळी अंदाजे गाय बगळा व बगळा प्रजातीचे ४५ पक्षांचा मृत्यू झाला आहे व पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये असलेली असंख्य अंडी देखील फुटली आहेत तसेच २८ जखमी पक्षांना झाडांच्या फांद्या खालून बाहेर काढून उपचारासाठी खाजगी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे...
सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधीत विभागाला लवकरात लवकर कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.
14
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 15:05:20Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_FAKE
सातारा - सातारा येथील पंकज चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही अनोळखी व्यक्तींनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव वापरून सिनेस्टार आमीर खान यांना फोन आणि मेसेज केले.ही बाब ८ जुलै २०२५ रोजी समोर आली, जेव्हा पाचगणीतील पंकज चव्हाण यांचे मित्र अमीन यांनी अमीर खान यांच्या भेटीसंदर्भात विचारणा केली. पंकज यांनी यासंदर्भात स्वतः खासदार उदयनराजे यांच्याशी संपर्क साधून खात्री केली. मात्र महाराजांनी अशी कोणतीही भेट मागितली नसल्याचे सांगितले.पुढे चौकशीत, अमीर खान यांच्याकडे खासदार उदयनराजे म्हणून 9422300607, 8999382890, 7775078680 या क्रमांकावरून कॉल आणि मेसेज झाले असल्याचे समोर आले. या नंबरवर "छत्रपती उदयनराजे भोसले" असे नाव Truecaller वर दिसत होते. त्यामुळे खोट्या नावाने व बनावट ओळख वापरून आमीर खान यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे स्पष्ट झाले.या तोतया व्यक्ती विरोधात पंकज चव्हाण यांनी खासदार उदयनराजे यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
byte -पंकज चव्हाण उदयनराजे समर्थक
13
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 17, 2025 15:03:15Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ पालिकेतच दोन ठेकेदारांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
ठेकेदारान मध्ये होता काही दिवसांपासून वाद
Amb beating
Anchor अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयात ठेकेदारांच्या दोन गटांमध्ये जबर मारहाण सुरू झाली. ही फ्री स्टाईल हाणामारी चक्क पोलिसांच्या समोरच सुरू होती. अंबरनाथ नगरपालिकेत लहान मोठी कामे करणारा ठेकेदार बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन या दोन ठेकेदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र आज पालिका कार्यालयात फेरीवाल्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच आणि पालिकेत चौक पोलीस बंदोबस्त असतानाच या दोन ठेकेदारांच्या गटांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत व्यंकटेश या ठेकेदाराच्या समर्थकांनी बॉस्को याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू असताना लागलीच पोलिसांनी आणि अंबरनाथ पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस हस्तक्षेप करीत असताना देखील दोन्ही गट एकमेकांवर अंगावर धावून जात होते. या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या गुंडांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
12
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 17, 2025 15:01:31Ambernath, Maharashtra:
बदलापूरात अनधिकृत कत्तलखान्यावर पालिकेची तोडक कारवाई
विधानसभेत उपस्थित करण्यात आली होती लक्षवेदी.
Bdl encroachments
Anchor बदलापूरात आज अनधिकृत सात कत्तलखान्यांवर पालिकेने तोडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले, गेल्या अनेक दिवसांपासून हे कत्तलखालखाने अनधिकृत रित्या सुरू होते, आज याबाबत विधानसभेत लक्षवेधी करण्यात आली होती . त्यानंतर पालिकेने आज ही तोडक कारवाई केली, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर गावातील कान्होर रोडवर हे सर्व कत्तलखाने अनधिकृत रित्या सुरू होते . प्रशासक मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या अतिक्रमण पथकाने ही तोडोक कारवाई केली.
byte मारुती गायकवाड ,प्रशासक, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपरिषद
चंद्रशेखर भुयार , बदलापुर
11
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 17, 2025 14:06:37Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - Breaking
मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात
संगमेश्वरमधील ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनीबसमध्ये भीषण अपघात
समोरासमोर धडक होऊन झाला अपघात
रत्नागिरीहून चिपळूणकडे जात होती एसटी बस, तर मिनीबस येत होती रत्नागिरीच्या दिशेने
अपघातग्रस्त दोन्ही गाड्या जेसिबीने काढल्या ओढून
दोन्ही गाडीतील काही प्रवासी जखमी
मिनिबसचा चालक गंभीर जखमी
जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दाखल
मिनीबसचा चालक गाडीच्या कॅबिनमध्ये अडकला, त्यांना अर्ध्या तासानंतर काढण्यात आलं बाहेर
जखमी चालकाला प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरीला हलवलं
अपघातामुळे वाहतूक काही काळ झाली होती विस्कळीत
12
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 17, 2025 14:03:19Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1707ZT_CHP_ABVP_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली जोरदार नारेबाजी आणि आंदोलन, ओडिशातील विद्यार्थिनीने जाळून घेतल्या प्रकरणाचा केला निषेध, ओडिशा सरकारने यात दखल देत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची केली मागणी
अँकर:-- चंद्रपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी आणि आंदोलन करत ओडिशातील घटनेचा निषेध केला. ओडिशातील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने विभाग प्रमुखाच्या लैंगिक छळांना कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख जटपूरा गेट परिसरात ओडिशा सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. सरकारने तातडीने यात दखल देत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी याप्रसंगी केली.
बाईट १) ,२) आंदोलक कार्यकर्ते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 17, 2025 13:38:22Mira Bhayandar, Maharashtra:
date-17july2025
rep-prathamesh tawade
loc-bhayander
slug-BHAYANDER MNS
feed send by 2c
type-AVB
अँकर- मीरा भाईंदर मध्ये उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे…मराठीच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद , मराठीसाठी काढलेला मोर्चा त्यानंतर राज ठाकरे यांची सभा त्यामुळे मीरा भाईंदर मधल राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे… ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांवर झेंडे व बॅनर बाजी करण्यात आली आहे…तिथल्या परिस्तगुचा आढावा घेतलाआहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी…
1
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 17, 2025 13:35:18Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये ठाकरे गटाचा गांधीगिरीतून ओला-उबेर बंद न मानणाऱ्यांना चालकाचा हार-श्रीफळ देत गांधीगिरी मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा
Anc..पंधरा तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबेर कंपनीच्या मनमानी विरोधात चालकांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलन दरम्यान ओला उबेर चालकानी राज्यभरात बंदचा इशारा देखील दिला आणि या आंदोलनात सर्व चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही चालकांनी या बंदला पाठिंबा दिला नाही आणि अधिक पैसे मिळतात म्हणून रस्त्यावर आपली वाहने चालवत आहे अशाच चालका विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाले असून , आज ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेने आगळ्यावेगळ्या प्रकारे आंदोलन केले. यावेळी ओला-उबेरच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना त्यांनी हार आणि श्रीफळ देऊन 'सत्कार' केला. मात्र हा सत्कार वाटत असला तरी, तो गांधीगिरीतून दिलेला एक कडक इशारा होता.उबेर चालकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते हा बंद तुमच्यासाठीच आहे आज हाल आणि श्रीपत देऊन आपले सत्कार करत आहोत उद्यापासून आमचा आंदोलन तीव्र होईल असा इशारा ओला चालकांना ठाकरे गटांनी दिलेला आहे त्याचबरोबर आज जरी गांधीगिरीने या चालकांचे 'स्वागत' झाले असले, तरी जर आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र होईल. या सर्व परिस्थितीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असा स्पष्ट इशाराही देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे .
Byte :- निलेश भोर ( गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष )
4
Share
Report